Uttarkashi Tunnel Collapsed: बोगद्यातं अडकलेल्या 40 मजुरांना बाहेर काढण्याचे 50 तासांपासून प्रयत्न सुरू, पाईपद्वारे अन्नाचा होतोय पुरवठा

author img

By ETV Bharat Marathi Desk

Published : Nov 14, 2023, 10:09 AM IST

Updated : Nov 14, 2023, 10:23 AM IST

Efforts are underway to evacuate 40 laborers trapped in the Uttarkashi tunnel accident

Uttarkashi Tunnel Collapsed : उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या 40 मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कामगारांना लवकर बाहेर काढता येईल या अनुषंगानं सर्व बचाव पथकं युद्धपातळीवर काम करत आहेत. तर बचावकार्यासाठी ह्यूम पाईप्सही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

उत्तरकाशी (उत्तराखंड) Uttarkashi Tunnel Collapsed : उत्तरकाशीतील यमुनोत्री महामार्गावरील सिलक्यारा बोगदा दुर्घटनेकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून फोनवरून माहिती घेत आहेत. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मजुरांना वाचवण्यासाठी ह्यूम पाईप घटनास्थळी पोहोचले आहेत. तसंच बोगद्यात अडकलेल्या मजुरांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.

 • #WATCH | Uttarkashi tunnel accident: Trucks loaded with 900 mm diameter pipes reach Silkyara. A platform is being prepared for the auger machine for horizontal drilling to rescue the trapped labourers by inserting large diameter MS pipes in the part of the Silkyara tunnel blocked… pic.twitter.com/KcGcVB2z55

  — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
 • ह्युम पाईप्स घटनास्थळी पोहोचले : बांधकामाधीन सिलक्यारा बोगद्यात ह्यूम पाईपचा वापर केला जात असला तरी ज्या दिवशी ही दुर्घटना घडली त्या दिवशी बोगद्याच्या संवेदनशील भागात ह्युम पाईप टाकण्यात आले नव्हते. बोगद्याच्या आत ह्यूम पाईप टाकले असते, तर आतापर्यंत कामगारांना पाईपमधून बाहेर काढण्यात आलं असतं.
 • #WATCH | Uttarkashi tunnel accident: Latest visuals of rescue operation that is underway. 40 labourers are trapped inside due to a part of the tunnel breaking and debris falling. pic.twitter.com/3h1jIn9Hxd

  — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बोगद्याजवळ बांधले तात्पुरते रुग्णालय : सिलक्यारा बोगद्यामध्ये दरड कोसळल्याच्या घटनेनंतर आरोग्य विभागानं येथे सहा खाटांचे तात्पुरते रुग्णालय तयार केले. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.आरसीएस पनवार यांनी सांगितलं की, घटनास्थळाजवळ तात्पुरतं रुग्णालय उभारण्यात आलं आहे. याध्ये ऑक्सिजन सिलिंडरही बसवण्यात आलेत. या रुग्णालयात 10 रुग्णवाहिकांसह 24 तास वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आले आहे.

 • जाणून घ्या कसा झाला अपघात : रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. यमुनोत्री महामार्गावर निर्माणाधीन बोगद्याच्या सिल्क्यरा तोंडात 230 मीटर आत ढिगारा पडला. काही वेळातच 30 ते 35 मीटर परिसरात पहिला हलका ढिगारा पडला, त्यानंतर अचानक मोठा ढिगारा आणि दगड पडू लागले. त्यामुळे बोगद्यात काम करणारे 40 मजूर आत अडकले.

पीएम आणि सीएम घटनेवर लक्ष ठेवून : अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामींकडून घटनेसंदर्भात माहिती घेतली. तसंच पंतप्रधान मोदींनी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही दिलंय. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामीदेखील या अपघाताची क्षणोक्षणी माहिती घेत आहेत. त्याचबरोबर बोगद्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचाव कार्यात सहकार्य करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी केंद्रीय यंत्रणांना दिले आहेत.


 • बांधकामाधीन बोगद्यात अडकले 40 मजूर : बोगद्यात अडकलेल्या मजुरांमध्ये उत्तराखंडमधील कोटद्वार आणि पिथौरागढमधील 2, बिहारमधील 4, पश्चिम बंगालमधील 3, आसाममधील 2, झारखंडमधील 15, उत्तर प्रदेशमधील 8, हिमाचलमधील 1 आणि ओडिशातील 5 मजुरांचा समावेश आहे.

हेही वाचा -

 1. Landslide in Uttarakhand : उत्तराखंडात निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन झाल्यानंतर 36 मजूर अडकले, बचावकार्य सुरू
 2. landslide in Uttarkashi : गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली, रस्त्यावरुन जाणारा टेम्पो उलटला
 3. उत्तरकाशी हिस्खलन! आतापर्यंत 16 मृतदेह बाहेर काढले, खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे आले
Last Updated :Nov 14, 2023, 10:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.