ETV Bharat / bharat

MP Urinating Case : आदिवासी तरुणावर लघवी केल्याचे प्रकरण, भाजप नेत्याच्या घरावर चालला बुलडोझर!

author img

By

Published : Jul 5, 2023, 8:24 PM IST

मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यात भाजप नेत्याने एका आदिवासी तरुणावर लघवी केल्याप्रकरणी राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून विरोधी पक्ष भाजपवर सातत्याने निशाणा साधत आहे. आज सीधी जिल्हा प्रशासनाने आरोपी भाजप नेत्याच्या घरावर बुलडोजरने कारवाई केली.

MP Urinating Case
लघवी करणाऱ्या भाजप नेत्याच्या घरावर बुलडोझर

भाजप नेत्याच्या घरावर चालला बुलडोझर

सीधी (मध्य प्रदेश) : भाजपच्या नेत्याने आदिवासी तरुणावर लघवी केल्या प्रकरणी आता प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. या प्रकरणी सिधी जिल्हा पोलिस आणि महसूल विभागाचे पथकाने आरोपी भाजप नेत्याच्या घरावर बुलडोझर चालवले आहे. प्रशासनाची टीम घरी पोहोचताच भाजप नेत्याची आई बेशुद्ध पडली. घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

MP Urinating Case
भाजप नेत्याच्या घरावर चालला बुलडोझर

आरोपीची आई बेशुद्ध पडली : प्रशासनाचे पथक जेसीबीसह पोहोचताच परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाच्या पथकात सुमारे 100 पोलीस कर्मचारी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. बुलडोझर सुरू होताच आरोपीची आई बेशुद्ध पडली. प्रशासनाच्या या कारवाईवरून आरोपीच्या कुटुंबीयांनी रोष व्यक्त केला आहे. आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, मात्र यात आमचा काय दोष आहे? असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. आरोपीच्या कुटुंबियांनी हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.

MP Urinating Case
भाजप नेत्याच्या घरावर चालला बुलडोझर

राहुल गांधी यांचे ट्विट : सीधी येथे आदिवासी तरुणावर भाजप नेत्याने लघवी केल्याच्या प्रकरणाने चांगलाच पेट घेतला आहे. यावरून काँग्रेसने भाजपवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले की, 'भाजपच्या राजवटीत आदिवासी बांधवांवर अत्याचार वाढत आहेत. मध्य प्रदेशातील एका भाजप नेत्याच्या अमानुष वागणुकीने संपूर्ण मानवतेला काळीमा फासला आहे. ही भाजपची आदिवासी आणि दलितांबद्दलची वृत्ती आहे'.

MP Urinating Case
भाजप नेत्याच्या घरावर चालला बुलडोझर

पीडित व्यक्तीने म्हटले - 'व्हिडिओत मी नाही' : सीधी मधील या घटनेमध्ये आता एक नवा ट्विस्ट आला आहे. पीडित व्यक्तीने हा व्हिडिओ आपला नसल्याचे म्हटले आहे. तर आरोपी भाजप नेत्याचे नातेवाईक हा व्हिडिओ खोटा ठरवत आहेत. आदल्या दिवशी भाजप आमदाराने आरोपी प्रवेश शुक्ला याला आपला प्रतिनिधी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र आरोपीच्या नातेवाईकांनी तो भाजपचा प्रतिनिधी असल्याची पुष्टी केली आहे.

काय आहे प्रकरण? : मंगळवारी काँग्रेसने एक व्हिडिओ जारी करताना भाजपवर आरोप केले होते. या व्हिडिओमध्ये भाजप आमदाराचा प्रतिनिधी प्रवेश शुक्ला एका आदिवासी तरुणावर लघवी करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना काँग्रेसने याला भाजपचे लज्जास्पद कृत्य असे म्हटले होते. हा व्हिडीओ मंगळवारी समोर आल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. काँग्रेसचे नेते भाजपवर निशाणा साधत आरोपीवर कारवाईची मागणी करत आहेत. तसेच त्यांनी इतर आरोपींची घरे जशी पाडली तशीच प्रवेश शुक्ला याच्या घरावरही बुलडोझर चालवण्याची मागणी केली होती.

हेही वाचा :

  1. MP Urinating Case : आदिवासी तरुणाच्या चेहऱ्यावर भाजपनेत्याने केली लघवी, पोलिसांनी आवळल्या नराधमाच्या मुसक्या
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.