ETV Bharat / bharat

Wrestler Protest : तर भारतीय कुस्ती परिषद निलंबित करू, कुस्तीपटूंना दिलेल्या वागणुकीची जागतिक कुस्ती संघटनेकडून दखल

author img

By

Published : May 31, 2023, 9:03 AM IST

भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र भारतीय कुस्तीपटूंना देण्यात आलेल्या वागणुकीचा जागतिक कुस्ती संघटनेने निषेध केला आहे. निवडणुक प्रक्रिया सुरु न केल्यास भारतीय कुस्ती संघ निलंबित करण्यात येईल, असा इशाराही यावेळी जागतिक कुस्ती संघटनेने दिला आहे.

Wrestler Protest
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात केलेल्या आंदोलनामुळे कुस्तीपटूंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुस्तीपटूंना दिलेली वागणूक अत्यंत निषेधार्ह होती. याप्रकरणाची दखल जागतिक कुस्ती संघटनेने घेतली आहे. कुस्तीपटूंना मिळालेल्या वागणुकीचा जागतिक कुस्ती संघटनेने निषेध केला आहे. जागतिक कुस्ती संघटनेने पत्रक जाहीर करत भारतीय कुस्ती संघटनेच्या निलंबनाचा इशारा दिला आहे. कुस्तीपटूंसोबत बैठक घेऊन त्यांच्या सुरक्षेविषयी चर्चा करण्यात येईल, असेही जागतिक कुस्ती संघटनेने जाहीर केले आहे.

जागतिक कुस्ती संघटना लक्ष ठेऊन : भारतीय कुस्ती परिषदेच्या अध्यक्ष असलेल्या ब्रिजभूषण सिह यांच्याविरोधात असलेल्या आरोपांची गंभीर दखल घेतली आहे. जागतिक कुस्ती संघटना या सगळ्या प्रकरणावर लक्ष्य ठेऊन असल्याचे संघटनेने यावेळा स्पष्ट केले आहे. कुस्तीपटूंची ज्या पद्धतीने धरपकड करण्यात आली, ती अत्यंत चुकीचे असल्याचे जागतिक कुस्ती संघटनेने स्पष्ट केले आहे.

भारतीय कुस्ती परिषद निलंबित करण्याचा इशारा : भारतीय कुस्ती परिषदेच्या अध्यक्ष असलेल्या ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मात्र सरकार कुस्ती परिषदेवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला आहे. याबाबत जागतिक कुस्ती संघटना खेळाडुंना देण्यात येणाऱ्या वागणुकीवर लक्ष्य ठेऊन आहे. याप्रकरणी तातडीने नव्या निवडणुकीची कार्यपद्धती राबवण्याची सूचनाही जागतिक कुस्ती परिषदेने दिली आहे. भारतीय क्रीडा मंत्रालयाने खेळाडूंच्या विरोधानंतर ही प्रक्रिया थांबवली होती.

पदक गंगेत अर्पण करण्याचा निर्धार : दिल्ली पोलिसांनी आंदोलन गुंडाळून गुन्हे दाखल केल्यामुळे कुस्तीपटू चांगलेच आक्रमक झाले. त्यामुळे कुस्तीपटूंनी आपली पदके गंगा नदीत अर्पण करण्याचा निर्धार केला. विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक आपली पदके गंगेत अरप्ण करण्यासाठी हरिद्वार येथे पोहोचले होते. मात्र शेतकरी नेत्यांनी त्यांना समजावले. मात्र त्यानंतरही आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कुस्तीपटूंनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा -

  1. Wrestlers Protest : तर गंगेत आपली पदकांचे करणार अर्पण, कुस्तीपटूंचा निर्धार; दिल्लीगेटवर करणार प्राणांतिक आंदोलन
  2. FIR On Wrestlers : जंतरमंतरवर आखाडा; ब्रिजभूषण सिंह विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर गुन्हा, आंदोलकांचे तंबूही उखडले
  3. Wresters Protest : जंतरमंतरवरील कुस्तीपटुंचे आंदोलन चिरडल्यानंतर कुस्तीपंढरीत उमटल्या संतप्त प्रतिक्रिया, तीव्र आंदोलन छेडण्याचा पैलवानांचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.