ETV Bharat / bharat

Ukraine Russia Crisis Impact : युक्रेन आणि रशियामधील युद्धाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ शकतात 'हे' परिणाम?

author img

By

Published : Feb 24, 2022, 1:59 PM IST

Updated : Feb 24, 2022, 2:40 PM IST

रशियाने युक्रेनवर लष्करी कारवाई ( Ukraine Russia Crisis ) केल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा मोठ्या परिणाम ( Ukraine Russia Crisis Impact on Indian Economy ) होताना दिसत आहे. युद्धामुळे भारतीय शेअर मार्केट कोसळले ( Indian stock market collapse ) आहे. निर्देशांक तब्बल 1 हजार 428.34 अंकानी खाली ( Sensex ) आला आहे, तर तेलाच्या किमतीत प्रती बॅरल 7 डॉलरने वाढ ( Rising oil prices ) झाली आहे.

Ukraine Russia Crisis Impact
रशियामधील युद्धाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम

मुंबई - रशियाने युक्रेनवर लष्करी कारवाई ( Ukraine Russia Crisis ) केल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा मोठ्या परिणाम ( Ukraine Russia Crisis Impact on Indian Economy ) होताना दिसत आहे. युद्धामुळे भारतीय शेअर मार्केट कोसळले ( Indian stock market collapse ) आहे. निर्देशांक तब्बल 1 हजार 428.34 अंकानी खाली ( Sensex ) आला आहे, तर तेलाच्या किमतीत प्रती बॅरल 7 डॉलरने वाढ ( Rising oil prices ) झाली आहे.

दोन दिवसापूर्वी अर्थमंत्री म्हणाल्या होत्या -
अर्थसंकल्पानंतर मुंबईतील उद्योजक, व्यावसायिक आणि बँकर्स यांच्यासोबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन दिवसीय चर्चासत्र घेतले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या होत्या की, युक्रेन आणि रशियामधील परिस्थिती तणावाची आहे. शेअर बाजारामध्ये परिणाम दिसू लागले आहेत. मात्र अद्यापही त्याचा फारसा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला नाही. या सर्व परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.

युद्धाचा काय होणार भारतावर परिणाम, जाणून घ्या..

शेअर मार्केट गडगडला -
आज रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष टोकाला गेला असून रशियाने युद्धाची ( Russia-Ukraine Conflict ) घोषणा केली आहे. रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी युक्रेनने सैन्य माघारी घेण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा युद्ध अटळ असल्याची घोषणा त्यांनी केली. युक्रेन-रशियाच्या संघर्षाचे दुष्परिणाम भारतातही दिसू लागले आहे. भारतात शेअर बाजार गडगडला असून इंधनाचा देखील भडका उडाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याची दाट शक्यता आहे.

तेलाच्या किमतीत वाढ -
रशिया-युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति बॅरल 93 डॉलर असलेले तेलाचे दर वाढून 100 डॉलर प्रती बॅरल झाले आहे. भारतात महागाई वाढण्याची शक्यता आहे. भारताने 2021 मध्ये रशियाकडून 43,400 बीपीडी तेल आयात केले होते. भारताने एकूण आयात केलेल्या तेलाच्या 1 टक्का एवढे हे तेल होते. तसेच रशियाच्या नैसर्गिक वायूच्या निर्यातीत भारताचा वाटा 0.2 टक्के आहे. GAIL (इंडिया) लिमिटेडने Gazprom सोबत वार्षिक 2.5 दशलक्ष टन LNG खरेदी करण्यासाठी 20 वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केल्या आहे.


रशियातून भारताला मोठा शस्त्रपूरवठा -
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, की भारतीय सैन्यातील 60 टक्के शस्त्रांची पुर्तता रशियाकडून होते. यामध्ये रशियाकडून नुकत्याच मिळणाऱ्या एस-400 या एअर डिफेन्स सिस्टीमचाही समावेश आहे. रशिया-युक्रेन युद्ध झालेच तर रशियाकडून शस्त्रपुरवठा बंद होऊ शकतो. रशिया आणि चीन यांच्यात चांगले संबंध आहे. रशिया-युक्रेन युद्ध पेटले तर चीन रशियाला समर्थन करू शकतो. एकीकडे भारत चीन सीमेवर तणाव वाढलेला असताना अशा परिस्थितीचा फायदा चीन घेऊ शकतो. याहूनही महत्त्वाचे म्हणजे, भारत आणि रशियामध्ये चांगले संबंध असले तरी चीनची मदत मिळाल्यास रशिया भारताच्या विरोधात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेवटचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, या सर्व प्रकरणात अमेरिकेने युक्रेनचे समर्थन केले आहे. अशात भारताला रशिया आणि अमेरिका या दोन्ही देशांशी संबंध चांगले ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण ज्याप्रकारे भारत शस्त्रांसाठी रशियावर अवलंबून आहे त्याप्रकारे इतर क्षेत्रात भारत अमेरिका आणि युरोपीय देशांवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत भारताला मध्यम मार्ग काढावा लागणार आहे, असे आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - Russia-Ukraine crisis live updates : युक्रेनचं रशियाला जोरदार प्रत्युत्तर, पाच लष्करी विमानं अन् हेलिकॉप्टर पाडलं, वाचा प्रत्येक क्षणाचे अपडेट

Last Updated : Feb 24, 2022, 2:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.