ETV Bharat / bharat

U-19 World Cup 2022 : 96 धावांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताची अंतिम फेरीत धडक

author img

By

Published : Feb 3, 2022, 2:20 AM IST

भारतीय अंडर-19 संघाने दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

भारत अंतिम फेरीत
भारत अंतिम फेरीत

ओसबोर्न - भारताने अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जिथे भारतीय संघ इंग्लंडशी भिडणार आहे. भारतीय अंडर-19 संघाने दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

कर्णधार यश धुल (110) शतक आणि उपकर्णधार शेख रशीद (94) याच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जात असलेल्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 बाद 290 अशी मोठी धावसंख्या उभारली. धावांचा पाठलाग करतांना ऑस्ट्रेलियन संघ 194 धावांवर गारद झाला. भारतीय डावादरम्यान धुल आणि रशीद यांनी संघाला पहिल्या दोन धक्क्यांपासून वाचवले आणि ही मजबूत धावसंख्या गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी तयार केली.

नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताने आठव्या षटकात फॉर्मात असलेला सलामीवीर अंककृष्ण रघुवंशी (06) याची विकेट 16 धावांत गमावली. विल्यम साल्झमनने (५७ धावांत २ बळी) रघुवंशीच्या बॅटची बाहेरचा धार घेत त्याचा स्टंप उडवला. दुसरा सलामीवीर हरनूर सिंग (16) ही फार काळ टिकू शकला नाही आणि 37 धावांवर भारताला दुसरा धक्का बसला.

धुल आणि रशीद यांनी मोठा संयम दाखवत भारताला मोठ्या धावसंख्येकडे नेले. यादरम्यान धुलने आपले शतक पूर्ण केले, पण रशीदचे सहा धावांनी शतक हुकले. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी केली होती. कर्णधार धुल धावचीत झाला. तो ४६ व्या षटकात बाद झाला. त्याने 110 चेंडूंत 10 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने तेवढ्याच धावा केल्या.

हेही वाचा -INDvWI Series: वनडे आणि टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडीज संघाचे भारतात आगमन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.