ETV Bharat / bharat

तुलसी विवाह 2023 : तुलसी विवाह कसा करावा? जाणून घ्या शुभ वेळ, साहित्याची यादी आणि उपासनेची सोपी पद्धत

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 22, 2023, 10:16 AM IST

Tulsi Vivah Puja Vidhi : तुलसी विवाहाचं आयोजन हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानलं जातं. असं केल्यानं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होऊन सुख आणि सौभाग्य प्रदान करतात, असं पूराणानुसार मानलं जातं.

Tulsi vivah 2023
तुलसी विवाह 2023

हैदराबाद : हिंदू धर्मात कार्तिक महिन्यातील एकादशीला देवूठाणी एकादशी साजरी केली जाते. या दिवशी तुळशी आणि शालिग्राम यांचा विवाह लावला जातो. काही लोक कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशीविवाह करतात. त्यामुळं 2023 मध्ये 23 नोव्हेंबर आणि 24 नोव्हेंबर असे दोन दिवस तुळशी विवाहाचं आयोजन करता येणार आहे. हिंदू धर्मात तुळशी विवाहाला खूप महत्त्व आहे. असं केल्यानं कन्यादानासारखे पुण्य मिळतं आणि घरात सुख, समृद्धी येते असं मानलं जातं. जाणून घेऊया तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त, साहित्य सूची आणि पूजा पद्धती...

तुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त:

  • देवूठाणी एकादशीच्या दिवशी तुळशीविवाहाचा शुभ मुहूर्त: या वर्षी 22 नोव्हेंबरला कार्तिक महिन्याच्या एकादशीला रात्री 11:03 वाजता सुरूवात होईल आणि 23 नोव्हेंबरला रात्री 9 वाजता समाप्त होईल. त्यामुळे उदयतिथीप्रमाणे 23 नोव्हेंबरला देवूठाणी एकादशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सायंकाळच्या पूजेची वेळ संध्याकाळी 6.50 वाजता सुरू होईल आणि रात्री 8.09 वाजता संपेल.
  • द्वादशी तिथीला तुळशीविवाहाचं आयोजन : कार्तिक महिन्यातील द्वादशी तिथीला बहुतेक लोक तुळशी विवाहाचं आयोजन करतात. यावर्षी कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी 23 नोव्हेंबर रोजी रात्री 9.01 वाजता सुरू होईल आणि 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.06 वाजता समाप्त होईल. या दिवशी प्रदोष कालचा शुभ मुहूर्त संध्याकाळी ५.२५ ते ६.०४ पर्यंत आहे.
  • तुळशी विवाहाच्या साहित्याची यादी : हळद, शालीग्राम, गणेशमूर्ती, श्रृंगाराचं साहित्य, विष्णूजी मूर्ती, बताशा, फळे, फुले, धूप-दीप, हळद, हवन साहित्य, ऊस, लाल ओढणी, अक्षता, रोळी, कुमकुम, तीळ. तूप, आवळा, मिठाई, तुळस यासह पूजेसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी नक्की गोळा करा.

तुळशी विवाहाची सोपी पद्धत:

  1. तुळशी विवाहाच्या दिवशी सकाळी लवकर उठा. आंघोळीनंतर स्वच्छ कपडे घाला.
  2. तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करा. तुळशी विवाहात कन्यादान करणाऱ्यांनी उपवास करावा.
  3. प्रदोष काळात तुळशीविवाह केला जातो. संध्याकाळी पूजेला स्वच्छ कपडे परिधान करा.
  4. तुळशीचं रोप एका लहान पाटावर ठेवा. मडक्यावर उसाचा मंडप करावा.
  5. यानंतर दुसऱ्या पाटावर शालिग्राम जीची प्रतिष्ठापना करा. पाटाजवळ कलश ठेवा.
  6. कलशावर स्वस्तिक काढा आणि शक्य असल्यास तुळशीपाशी रांगोळी काढा.
  7. यानंतर तुळशीच्या रोपासमोर तुपाचा दिवा लावावा.
  8. तुळशी आणि शालिग्रामवर फुलांनी गंगाजल शिंपडा.
  9. तुळशीमातेला रोळी आणि शालिग्रामला चंदनाचा तिलक लावावा.
  10. आता तुळशीच्या रोपावर लाल ओढणी अर्पण करा आणि तिला मेकअपचं साहित्य ठेवा.
  11. शालिग्रामला पंचामृतानं स्नान घालून पिवळं वस्त्र अर्पण करावं.
  12. तुळशीला आणि शालिग्रामला हळद लावावी.
  13. शालिग्राम जी हातात घ्या आणि तुळशीच्या रोपाला ७ वेळा प्रदक्षिणा घाला.
  14. शालिग्रामजींचे पद फक्त पुरुषानं उचलावं असं मानलं जातं.
  15. तुळशीविवाहाचे सर्व विधी योग्य पद्धतीनं पार पाडावेत.
  16. यानंतर तुळशीमाता आणि शालिग्रामजींची आरती करावी.
  17. लग्न पूर्ण झाल्यावर त्यांना नैवेद्य द्यावा आणि लोकांमध्ये प्रसादाचं वाटपही करावं.

डिस्क्लेमर : आम्ही असा दावा करत नाही की या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला जरूर घ्या.

हेही वाचा :

  1. सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग
  2. 'या' राशीच्या व्यक्तींना भेटतील मित्र व नातलग; वाचा राशीभविष्य
  3. कधी आहे देवउठनी एकादशीचे व्रत? पूजेचं महत्त्व, वेळ आणि शुभ मुहूर्त काय, वाचा सविस्तर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.