ETV Bharat / bharat

Top News Today : दिवसभरात कोठे काय असणार वाचा, एका क्लिकवर

author img

By

Published : Dec 5, 2022, 6:53 AM IST

Top News Today
महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

आज दिवसभरात कोठे काय असणार, आजच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया या माध्यमातून. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर. (Read Top News Today )

मुंबई : गुजरात विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील आज मतदान ( Gujarat Assembly Polls ) आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्यासह अनेक व्हीव्हीआयपी आज मतदान करणार आहेत. याबरोबरच आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांची पहिली बैठक होणार आहे. तर अधिवेशनात मांडायच्या महत्वाच्या मुद्द्यांवर आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. आज दिवसभरात कोठे काय असणार, आजच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया या माध्यमातून. (Read Top News Today )

  • गुजरात विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्याचे मतदान : गुजरात विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील आज मतदान ( Gujarat Assembly Polls )आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्यासह अनेक व्हीव्हीआयपी आज मतदान करणार आहेत.
  • जी 20 समिटसाठी केंद्र सरकारची सर्व पक्षीय बैठक : जी 20 समिटसाठी आज केंद्र सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. राष्ट्रपती भवन कल्चरल सेंटर येथे संध्याकाळी पाच वाजता ही बैठक होईल. संसदेत प्रतिनिधित्व असणाऱ्या पक्षाच्या प्रमुखांना या बैठकीला बोलावण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एका शस्त्रक्रियेमुळे या बैठकीला हजर राहू शकणार नाहीत.
  • दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीचे उद्घाटन करतील आणि बैठकीला संबोधित करतील.
  • शिवशक्ती- भीमशक्तीची पहिली बैठक : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पहिली बैठक आज होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे.
  • अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक : अधिवेशनात मांडायच्या महत्वाच्या मुद्द्यांवर आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 19 तारखेला होणाऱ्या राष्ट्रवादीच्या शेतकरी मोर्चाबाबत देखील बैठकीत चर्चा होणार आहे.
  • एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर : जी 20 समिटच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची देशभरातील सर्वपक्षीय महत्वाच्या नेत्यांसोबत आज बैठक घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीत सहभागी होणार आहेत.
  • उदय सामंत जत दौऱ्यावर : उद्योगमंत्री उदय सामंत जत तालुक्यातील सीमावर्ती भागाचा दौरा करुन या भागात सुरु असलेल्या घडामोडी व समस्यांचा आढावा घेणार आहेत.
  • धनगर आरक्षणावर बैठक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणाबाबत तातडीची बैठक बोलवली आहे. धनगर ऐक्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत उपमुख्यमत्र्यांसोबत बैठक होणार आहे.
  • पुण्यात धरणे आंदोलन : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात पुणे शहरातील विरोधी पक्षाचे सगळे माजी महापौर धरणे आंदोलन करणार आहेत.
  • नंदूरबारमध्ये रस्ता रोको आंदोलन : तळोदा येथे बोगस आदिवासींना राज्य सरकार संरक्षण देत असल्याचा आरोप करत बिरसा फायटर संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.