ETV Bharat / bharat

Today's Top News in Marathi : आजच्या टॉप न्यूज, वाचा एका क्लिकवर

author img

By

Published : Dec 29, 2021, 6:15 AM IST

Today's Top News in Marathi
आजच्या टॉप न्यूज

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

  • आज दिवसभरात -
  1. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आज बैठक होणार आहे. या बैठकीत ओमायक्रॉन परिस्थितीवर चर्चा होणार आहे.
  2. आसाम बुक फेअरला आजपासून सुरुवात होत आहे. 12 दिवस हा बुक फेअर चालणार आहे. गुवाहटीतील चांदमारी येथे 9 जानेवारीपर्यंत हा बुकफेअर चालणार आहे.
  3. पंजाब लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून निरीक्षक पदासाठी जाहिरात निघाली आहे. 320 पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. ppsc.gov.in. या संकेतस्थळावर जाऊन उमेदवार अर्ज करु शकतो.
  4. अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिचा वाढदिवस. आजच्याच दिवशी 1974 मध्ये ट्विंकल खन्ना हिचा जन्म झाला आहे.

काल दिवसभरात -

  1. मुंबई - राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप आज वाजले. या अधिवेशनात अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. अशातच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी 'राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ४ दिवसात राज्य विकतील', असा टोमणा पवार कुटुंबियांना लगावला होता. पडळकर यांच्या टीकेला अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. ( Deputy CM Ajit Pawar Reply to Gopichand Padalkar ) सविस्तर वाचा-
  2. मुंबई - हिवाळी अधिवेशन मंगळवारी संपले. यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ( Devendra Fadnavis and Sudhir Mungantiwar Press Over University Reform Bill ) सविस्तर वाचा -

3. मुंबई - कोरोनाची तिसरी लाट आणि ओमायक्रोनच्या सावटात राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे मंगळवारी सूप वाजले. २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर या पाच दिवसांच्या अधिवेशनात ४६ तास ५० मिनिटांचे कामकाज झाले. तर ४९ मिनिटांचा वेळ वाया गेला. सभागृहात २८ विधयके मांडण्यात आली. पैकी २३ विधेयक मंजूर केली. ( MH Assembly Winter Session 2021 Over ) दरम्यान, येत्या २८ फेब्रुवारीला नागपूर येथे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असल्याची घोषणा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केली. ( MH Budget session in Nagpur on 28th February 2022 ) सविस्तर वाचा -

4. मुंबई - मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात 2008 मालेगाव ब्लास्ट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. आज झालेल्या सुनावणीत एका साक्षीदाराने धक्कादायक खुलासा केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Cm Yogi Adityanath ) यांना या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा साक्षीदाराने न्यायालयात केला आहे. सविस्तर वाचा -

5. मुंबई - कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांची शेवटची संधी हुकली. त्यामुळे, वय मर्यादा ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांना एक संधी मिळावी म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 2 जानेवारी 2022 ला होणारी पूर्व परीक्षा ( MPSC pre exam postponed ) पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेला आहे. लवकरच नवे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. सविस्तर वाचा -

  • वाचा आजचे राशीभविष्य -

29 डिसेंबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज मित्रांकडून फायदा होण्याची शक्यता; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.