ETV Bharat / bharat

राम रहीमच्या शिक्षेची सुनावणी, इंडियाबुल्स रियल इस्टेटचा आयपीओसह विविध टॉप न्यूज, वाचा एका क्लिकवर

author img

By

Published : Oct 12, 2021, 4:56 AM IST

राम रहीम
राम रहीम

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

आज दिवसभरात या महत्त्वाच्या घडामोडींवर असणार नजर

  • औरंगाबादेत भाजपतर्फे १२ ऑक्टोबरला ओबीसींचा विभागीय मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यातून ओबीसी आरक्षणात सरकार कसे अपयशी ठरले यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. मेळाव्यास माजी मंत्री संजय कुटे, ओबीसी मोर्चाचे योगेश टिळेकर यांच्यासह देवेंद्र फडणवीस व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
  • गेल्या वर्षी 12 ऑक्टोबर रोजी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अचानक वीजपुरवठा खंडीत झाला होता. अचानक विजपुरवठा खंडीत झाल्यानं घडाळ्याच्या काट्यावर धावणारी मुंबई ठप्प झाली होती. याचा परिणाम मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलवरही झाला होता. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहेत. मुंबईतील ब्लॅकआऊटमागे चीनचा हात असल्याचा दावा अमेरिकेतील एका माध्यमाने केला होता.
  • दोन साध्वींवर केलेल्या बलात्कार आणि एका पत्रकाराची हत्या केल्याप्रकरणी हरियाणातील रोहतक तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला मोठा दणका बसला आहे. रणजीत सिंह हत्याकांड प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने राम रहीम याच्यासह पाच आरोपिंना दोषी ठरवले आहे. न्यायालय सर्व दोषींची 12 ऑक्टोबरला शिक्षा ठोठावणार आहे.
  • इंडियाबुल्स रियल इस्टेट कंपनीची सहकारी कंपनी असलेल्या इंडियाबुल्स पावर लिमिटेडचा आयपीओ 12 ऑक्टोबर रोजी बाजारात येणार आहे. 15 तारखेपर्यंत हा आयपीओ सुरू राहणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनी मध्य भारतात 6600 मेगावॉट क्षमतेचे तीन प्रकल्प विकसीत करणार असून, आयपीओतून जमा करण्यात येणाऱ्या निधीचा वापर या प्रकल्पांसाठी केला जाणार आहे.
  • मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबईतील माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना नोटीस बजावली आहे. खंडणी प्रकरणी परमबीर सिंह यांना 12 ऑक्टोबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे नोटीसमध्ये उल्लेख आहे. हरियाणाच्या निवासस्थान सोबतच मुंबईतील नीलिमा येथील परमबीर सिंह यांच्या निवासस्थानी नोटीस देण्यात आली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात परमबीर सिंह, सचिन वाझे आणि इतरांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी आज होणार आहे. ईडीतर्फे जारी समन्स रद्द करण्यासाठी अनिल देशमुखांनी ही याचिका दाखल केली आहे.

कालच्या महत्त्वाच्या बातम्या-

  • महाराष्ट्रात सर्वत्र आयकर विभागाचे छापे सुरू असतानाच आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तेलंगानाच्या राजधानीतही छापा टाकला आहे. आयकर विभाग हैदराबादमधील हेटेरो ग्रुपच्या कार्यालयावर 6 ऑक्टोबर रोजी छापा टाकला होता. यावेळी त्यांनी विविध ठिकाणाहून 133 कोटी रुपये व एकूण 550 कोटी रुपये बेहिशेबी मालमत्ता जप्त केली आहे.

सविस्तर वाचा-आयकर विभागाने कारवाईत 550 कोटींची मालमत्ता जप्त

  • बॉलिवूड शहंशहा अमिताभ बच्चन यांचा सोमवारी 79 वा वाढदिवस होता. हा दिवस अमिताभ यांचे फॅन्स मोठ्या उत्साहात साजरा करतात. सकाळी जलसा या बंगल्यासमोर फॅन्सने मोठी गर्दी केली होती. अमिताभ यांनीही बंगल्याबाहेर येऊन फॅन्सला धन्यवाद दिले. पण अमिताभ यांचा यंदाचा वाढदिवस जरा खास आहे. त्यांनी या खास दिवशी अमिताभ यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी 'कमला पसंद'सोबतचा करार संपुष्टात आणला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ब्लॉगवर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.

सविस्तर वाचा-अमिताभ बच्चन यांना ''कमला ना-पसंद'', कराराचे सर्व पैसे केले परत

  • आयकर विभागाच्या टीमने राजधानी जयपूरमधील एका मोठ्या हॉटेल ग्रुपवर छापा टाकला आहे. हे प्रकरण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. मुंबई आयकर विभागाच्या पथकाने मुंबई तसेच जयपूर येथील हॉटेल समूहाच्या परिसरात छापे टाकले आहेत.

सविस्तर वाचा-अजित पवारांशी संबंधित ठिकाणावर छापे; जयपूरमध्ये पोहचली आयकर विभागाची मुंबई टीम

  • महाविकास आघाडीने ११ ऑक्टोबरला राज्यभरात बंद पुकारला. लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला होता. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिक येथे प्रतिक्रिया दिली. राज्यात महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद आहे. अतिशय तुरळक घटना कुठे घडल्या असतील, त्याचा परिणाम होणार नाही. हा बंद शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आहे. यावर पंतप्रधान एक शब्दही बोलायला तयार नाहीत, हे दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.

सविस्तर वाचा- लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक, वाचा सर्व अपडेट एका क्लिकवर

  • भाजपला सत्तेची मस्ती आहे बाकी काही नाही ! अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर शरसंधान साधले. आज लखीमपूर हत्याकांड प्रकरणी निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने 'महाराष्ट्र बंद' चे आवाहन केले होते. त्यानुसार हुतात्मा चौकात राष्ट्रवादीच्यावतीने मोदी व योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

सविस्तर वाचा- भाजपाला सत्तेची मस्ती, अद्यापही केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही - सुप्रिया सुळे

जाणून घ्या, आजचे राशीभविष्य-

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.