ETV Bharat / bharat

12 ऑक्टोबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज मानसिक स्वास्थ्य लाभेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

author img

By

Published : Oct 12, 2021, 12:03 AM IST

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

12 ऑक्टोबर राशीभविष्य
12 ऑक्टोबर राशीभविष्य

मेष - चंद्र धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपणाला थकवा, आळस व व्यग्रता जाणवेल. उत्साह अजिबात वाटणार नाही. प्रत्येक गोष्टीचा राग आल्याने आपली कामे बिघडतील. नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घरात आपल्यामुळे कोणाचे मन दुखावणार नाही, ह्याची काळजी घ्यावी लागेल. एखाद्या धार्मिक किंवा मंगलकार्यात सहभागी होऊ शकाल.

वृषभ - चंद्र धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. अशा परिस्थितीत नवीन कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील. आज आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. शक्यतो प्रवास टाळावेत. आज नियोजीत वेळेत आपले काम पूर्ण होऊ शकणार नाही. मानसिक शांततेसाठी प्रयत्नशील राहावे.

मिथुन - चंद्र धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. शरीर व मन आनंदी राहील. कुटुंबीय व मित्र परिवार यांच्यासह एकाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. स्वादिष्ट भोजन मिळेल. नव्या कपड्यांची खरेदी होईल. वाहनसौख्य मिळेल. आपल्या मान - सन्मानात व लोकप्रियतेत वाढ होईल.

कर्क - चंद्र धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस व्यापार - व्यवसायात फायदा मिळवून देणारा आहे. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आज आपल्या सहवासात कुटुंबियांचा वेळ खूप आनंदात जाईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. शत्रूवर विजय मिळेल. चालू कामात यश मिळेल. खर्चाचे प्रमाण मात्र वाढेल.

सिंह - चंद्र धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस नवनिर्माण व कला ह्या साठी उत्तम आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासात अनुकूलता लाभेल. स्नेही व मित्र यांच्या गाठीभेटी होतील. प्रकृती उत्तम राहिली तरी सुद्धा रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य टिकेल.

कन्या - चंद्र धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. अनेक गोष्टींची काळजी लागून राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. आईची प्रकृती बिघडेल. कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करावी. अतिरिक्त पैसा खर्च होईल.

तूळ - चंद्र धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस आनंदात जाईल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. प्रत्येक कामात यश मिळेल. स्वकीय भेटतील. मन आनंदी राहील. एखाद्या प्रवासाने मनाला आनंद मिळेल. आपसातील संबंध सुधारतील.

वृश्चिक - चंद्र धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस साधारणच आहे. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबात वाद संभवतात. कुटुंबातील सदस्यांचे गैरसमज होण्याची शक्यता आहे. शारीरिक त्रास व मनात मरगळ राहील. नकारात्मक विचार येतील. अवैध कार्यापासून दूर राहणे हितावह राहील. विद्यार्थ्यांना अध्ययनात अडथळे येण्याची शक्यता आहे.

धनू - चंद्र धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आज निर्धारित केलेली सर्व कार्ये पूर्ण होतील. आर्थिक लाभ होतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य आपणाला आनंदी ठेवेल. एखादा प्रवास संभवतो. आपली माणसे भेटल्याचा आनंद होईल. स्नेहीजनांकडील मांगलिक प्रसंगात सहभागी व्हाल. यश - कीर्ती वाढीस लागेल.

मकर - चंद्र धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आज मन अस्वस्थ राहील. एखाद्या मांगलिक किंवा सामाजिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. स्वकीय व मित्रांशी मतभेद होतील. धनहानी व मानहानीची शक्यता आहे. आज एखाद्या गूढ विद्येकडे आपला कल होईल. कोर्ट- कचेरीच्या कामात अपयश येईल. वाणीवर ताबा ठेवावा लागेल.

कुंभ - चंद्र धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. नवीन कार्य सुरु करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. नोकरी - व्यवसायात फायदा संभवतो. एखाद्या स्त्रीमुळे आपली कामे होतील. आज मोठे आर्थिक लाभ होतील. सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. संततीशी सलोख्याचे संबंध राहतील. पत्नी व संतती ह्यांच्या कडून एखादी आनंददायी बातमी मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. एखाद्या सहलीचे आयोजन करू शकाल.

मीन - चंद्र धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आज नोकरी किंवा व्यवसायात यश मिळाल्याने तसेच वरिष्ठां कडून प्रोत्साहन मिळाल्याने आपणास अत्यंत प्रसन्नतेचा अनुभव येईल. व्यापार वृद्धी होईल. वसुलीची रक्कम प्राप्त होईल. वडील व वडीलधार्‍यां कडून लाभ होईल. उत्पन्नाचे प्रमाण वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान - सन्मान किंवा उच्चपद मिळेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.