ETV Bharat / bharat

News Today : आज 'या' घडामोडींवर असणार खास नजर

author img

By

Published : Feb 24, 2021, 6:36 AM IST

Updated : Feb 24, 2021, 6:43 AM IST

आज या घडामोडींवर असणार खास नजर

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

  • मंत्रिमंडळाची बैठक

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या समस्येवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच मागील बैठकीत वादग्रस्त वन मंत्री संजय राठोड उपस्थित नव्हते. या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

मंत्रालय
मंत्रालय
  • मुंबई महापालिकेची स्थायी समिती सभा

मुंबई महापालिकेची स्थायी समिती सभा आज होणार आहे. सभेत विविध विषयांव प्रस्ताव ठेवण्यात येणार असून भाजप सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.

बृहन्मुंबई महापालिका
बृहन्मुंबई महापालिका
  • मुंबईत काँग्रेसची बैठक

कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. याबाबत मुंबई काँग्रेस नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकीय कार्यक्रम व पक्षीय बैठका घेऊ नका, असे आवाहन केले आहे. त्यामुळे सत्तेत असलेला काँग्रेस पक्ष मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला बाजूला सारून बैठक करण्याची शक्यता आहे.

काँग्रेस
काँग्रेस
  • साई मंदिराच्या वेळेत आजपासून बदल

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अहमदनगर जिल्ह्यात रात्रची संचारबंदी करण्यात आली आहे. यामुळे शिर्डी येथील साई मंदिराची वेळ आजपासून बदलण्यात आली आहे. सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंतच आता भक्तांना साईंचे दर्शन घेता येणार आहे. आगाऊ बुकिंग करुनच साईंच्या दर्शनाला यावे, आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

साईबाबा
साईबाबा
  • दुसऱ्या दिवशीही पंढरीत संचारबंदी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंढरपुरातील माघी यात्रेनिमित्त प्रशासनाने पंढरपुरात मंगळवारी 24 तासांसाठी संचारबंदी लागू केली होती. मात्र, कालावधी वाढवून आजही संचारबंदी कायम ठेणवण्यात आली आहे. आषाढी व कार्तिकी यात्रेप्रमाणे यंदाही वारकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पंढरपुरातील मंदिर
पंढरपुरातील मंदिर
  • भाजप पदाधिकाऱ्याची पत्रकार परिषद

भाजप मध्य विभाग प्रमुख विश्वास पाठक यांची पत्रकार परिषद मुंबई येथे होणार आहे. आगामी अर्थसंकल्प अधिवेशन तसेच संजय राठोड मुद्यावर सरकारवर टीका करण्याची शक्यता आहे.

भाजप
भाजप
  • राजस्थानचे अर्थसंकल्प आज होणार सादर

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आज राज्याचे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यांनी मंगळवारी (दि. 23) आपल्या निवसास्थानी 2021-22 या आर्थिक वर्षासाठी विविध नेत्यांसह अर्थसंकल्पाबाबत चर्चा केली आहे. त्यानंतर आज ते अर्थसंकल्प मांडणार आहेत.

मुख्यमंत्री अशोक गहलोत
मुख्यमंत्री अशोक गहलोत
  • औरंगबादेत व्यापारी मंहासंघाची पत्रकार परिषद

औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघातर्फे आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध मागण्यांसाठी तसेच महापालिकेने लादलेल्या काही जाचक अटींच्या विरोधात शुक्रवारी शहरातील व्यापारी संप करण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पत्रकार परिषद घेणार आहेत.

औरंगाबाद महापालिका
औरंगाबाद महापालिका
  • खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले उदयनराजे भोसले यांचा आज जन्मदिन आहे. उदयन महाराज हे आपल्या अनोख्या स्टाईलमुळे व बिंधास्त स्वभावामुळे ओळखले जातात. ते खासदार आहेत. 2014 च्या निवडणुकीत सातारा लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून ते निवडून आले होते. मात्र, काही महिन्यांतच त्यांनी आपल्या खासदारकीचा व राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण, त्यांना भाजपने राज्यसभेचे खासदार केले आहे.

उदयनराजे भोसले
उदयनराजे भोसले
  • संजय लीला भन्साळींचा वाढदिवस

बॉलिवुडमधील प्रसिद्ध निर्देशक व निर्माता संजय लीला भन्साळी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांचे निर्देशन केले व काही चित्रपटांची निर्मितीही केली आहे. भन्साळी यांनी विधु विनोद चोपडांसह सहायक निर्देशक म्हणून सिनेसृष्टी काम सुरू केले. त्यांनी विधु यांच्यासह परिंदा व 1942 : अ लव्ह स्टोरी यांसारखे चित्रपट बनविले. 2002 साली भन्साळी यांनी निर्देशित केलेला देवदास ही फिल्म त्या वेळची सर्वात महागडी फिल्म होती. त्यावेळी देवदासच्या निर्मितीसाठी 50 कोटी खर्च आला होता तर चित्रपटाने तब्बल 100 कोटींचा गल्ला जमविला होता. त्यावेळी देवदासने 5 राष्ट्रीय पुरस्कार व 10 फिल्मफेअर पुरस्कार जिंकले होते.

संजय लीला भन्साळी
संजय लीला भन्साळी
Last Updated : Feb 24, 2021, 6:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.