ETV Bharat / bharat

आजचा रविवार खास! मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी दिवस कसा असेल?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 17, 2023, 8:08 AM IST

Horoscope Today 17 December 2023 : कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. चला तर मग जाणून घेवूया आजचे राशीभविष्य.

Horoscope Today 17 December 2023
17 डिसेंबर 2023 राशी भविष्य

मेष : 17 डिसेंबर 2023 रविवारीच्या दिवशी आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दहाव्या भावात असणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर आहे. व्यवसायातही अपेक्षित यश मिळण्याची अधिक शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. मजेशीर आणि मनोरंजक कार्यक्रमात तुम्ही दिवसभर व्यस्त राहू शकता. घराच्या सजावटीमध्ये आज पैसे खर्च होतील. एखाद्या रम्य स्थळी सहलीला जाण्याचा बेत ठरवू शकाल.

वृषभ: 17 डिसेंबर 2023 रविवारीच्या दिवशी आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र नवव्या भावात असणार आहे. आज तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या विकासाकडं अधिक लक्ष द्याल. व्यवसायात नवीन योजनांचा फायदा होईल. तथापि, यशास विलंब होऊ शकतो. दुपारनंतर व्यवसायासाठी अनुकूल वातावरण राहील. पदोन्नती होऊ शकते. अधिकारीही तुमच्या कामाच्या पद्धतीवर खूश होतील. वडील आणि वडीलधाऱ्यांकडून लाभ होईल. जोडीदारासोबत सुरू असलेले जुने वाद मिटतील.

मिथुन : 17 डिसेंबर 2023 रविवारीच्या दिवशी आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र आठव्या भावात असणार आहे. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. खाण्याच्या सवयींबाबत काळजी घ्या. आज वाहन चालवताना दक्षता द्यावी लागेल. अनपेक्षितपणे पैसे खर्च होऊ शकतात. काही कारणास्तव बाहेर जाण्याची योजना बनू शकते. दुपारनंतर साहित्यिक कार्यात रस वाढेल. मात्र, मनात थोडी चिंता राहील.

कर्क : 17 डिसेंबर 2023 रविवारीच्या दिवशी आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातव्या भावात असणार आहे. रुचकर आणि चांगले जेवण मिळाल्यानं आज तुमचं मन प्रसन्न राहील. नवीन कपडे खरेदी करण्याची बेत ठरवू शकता. आर्थिक बाबतीत तुमचा दिवस चांगला जाईल. दुपारनंतर कोणत्याही विषयावर निर्णय घेणं टाळा. पैसे अचानक खर्च होतील. भागीदारीच्या कामात मतभेद वाढतील. नोकरीत परिस्थिती अनुकूल राहील. रागावर नियंत्रण ठेवा. आज नवीन काम सुरू करू नका.

सिंह : 17 डिसेंबर 2023 रविवारीच्या दिवशी आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहाव्या भावात असणार आहे. आज तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात आर्थिक योजना पूर्ण करू शकाल. योग्य कारणांसाठी पैसा खर्च होईल. परदेशातील कामातून लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढल्याने पैशाची कमतरता भासणार नाही. कुटुंबातील सदस्यांशी काही विषयावर वाद होऊ शकतात.भागीदारीच्या कामात अंतर्गत मतभेद होतील, तरीही परिस्थिती अनुकूल राहील.

कन्या : 17 डिसेंबर 2023 रविवारीच्या दिवशी आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचव्या भावात असणार आहे. आज तुमचा दिवस आनंदात आणि शांततेत जाईल. दागिन्यांची खरेदी होईल. आज कला आणि संगीतात रुची राहील. व्यवसायासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. घरात सुख-शांती नांदेल. आरोग्य चांगले राहील. व्यवसायात तुम्हाला फायदा होऊ शकतो. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.

तूळ : 17 डिसेंबर 2023 रविवारीच्या दिवशी आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक ताजेपणा आणि मानसिक आनंदाचा अभाव राहील. कुटुंबात हिंसक वातावरण असू शकते. समाजजीवनात मानहानीची घटना घडू शकते. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. दुपारनंतर तुमची शारीरिक आणि मानसिक स्थिती सुधारेल. तुम्ही सर्जनशील कामात व्यस्त असाल.

वृश्चिक : 17 डिसेंबर 2023 रविवारीच्या दिवशी आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसऱ्या भावात असणार आहे. मालमत्तेसंदर्भात काळजी घ्यावी लागेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. भावा-बहिणींचे वर्तन सहकार्याचे राहील. विरोधक पराभूत होतील. दुपारनंतर शारीरिक व मानसिक अनुकूलता राहील. मात्र, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. अतिउत्साहामुळे कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतात. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रेमप्रकरणात असंतोषाची भावना राहील.

धनू : 17 डिसेंबर 2023 रविवारीच्या दिवशी आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसऱ्या भावात असणार आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे आणि लोकांशी असलेले मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करावा. आज तुमचे लक्ष आध्यात्मिक गोष्टींवर असेल. विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करण्यात अडचण येईल. दुपारनंतर तुमची चिंता दूर होणार असल्याने तुम्ही आनंदी असाल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहाल. विरोधकांना वेळीच प्रत्युत्तर देऊ शकाल.

मकर : 17 डिसेंबर 2023 रविवारीच्या दिवशी आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. व्यवसायात तुम्हाला अनुकूल नफा मिळेल. आज प्रत्येक काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल. घरगुती जीवनात वादाचे वातावरण राहील. आध्यात्मिक प्रवृत्तींमध्ये तुमची आवड वाढेल. कार्यालयात तुमचा प्रभाव कायम राहील. दुपारनंतर तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ शकतात. तुम्ही निर्णय घेण्याच्या स्थितीत राहणार नाही. घरच्या कामात पैसा खर्च होईल. भांडवली गुंतवणूक आणि शेअर बाजारातील कामातून तुम्हाला फायदा होऊ शकतो.

कुंभ : 17 डिसेंबर 2023 रविवारीच्या दिवशी आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बाराव्या भावात असणार आहे. आज मानसिकदृष्ट्या धार्मिक भावना अधिक वाढतील. धार्मिक कार्य किंवा धार्मिक प्रवासात पैसा खर्च होईल. कोर्टाच्या कामात यश मिळू शकते. देवाची आराधना केल्याने मनाला शांती लाभेल. दुपारनंतर तुमची सर्व कामे सहज पूर्ण होतील. घरगुती जीवनात वाद होऊ शकतात. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. यावेळी तुम्ही कामाच्या ठिकाणी सर्व कामे सहजतेने करू शकाल.

मीन : 17 डिसेंबर 2023 रविवारीच्या दिवशी आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अकराव्या भावात असणार आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करून आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. विवाहासाठी पात्र लोकांचे नाते कायमस्वरूपी होऊ शकते. व्यवसायात लाभ होईल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. पर्यटन स्थळाला भेट देण्याची योजना बनू शकते. दुपारनंतर काही कारणाने मानसिक चिंता राहील. धार्मिक कार्यात पैसा खर्च होईल. उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण जास्त असेल. कुटुंबात शांततापूर्ण वातावरण राहील. प्रेम जीवनात असंतोष असू शकतो.

हेही वाचा -

  1. 'या' राशीच्या व्यक्तीं रमणीय स्थळाला भेट देतील; वाचा राशीभविष्य
  2. Weekly Horoscope : 'या' राशींच्या व्यक्तींना चालू आठवड्यात कामात नक्कीच यश मिळेल; वाचा, साप्ताहिक राशीभविष्य
  3. 'या' राशीच्या व्यक्तींना गूढ विषयांचे आकर्षण वाटेल; वाचा राशीभविष्य
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.