ETV Bharat / bharat

'या' राशीच्या व्यक्ती प्रिय व्यक्तीच्या सहवासानं होतील आनंदित; वाचा राशीभविष्य

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2024, 5:16 AM IST

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 08 जानेवारी 2024 च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Today Horoscope
राशीभविष्य

मेष : आज चंद्र रास बदलून 08 जानेवारी 2024 रविवारी च्या दिवशी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरुवात आनंदात होईल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपार नंतर नवीन कार्यारंभ करण्यात अडचणी येतील. आपल्या कृती संयमित ठेवणे हितावह राहील. राग, द्वेष यांपासून दूर राहावे लागेल. शत्रूंचा उपद्रव वाढेल. तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल. गूढ विद्येत आवड निर्माण होईल.

वृषभ : आज चंद्र रास बदलून 08 जानेवारी 2024 रविवारी च्या दिवशी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. व्यापार - व्यवसायात यश प्राप्ती होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. आर्थिक लाभ संभवतात. प्रतिस्पर्ध्यांना चकवा देऊ शकाल. दुपार नंतर चांगले मनोरंजन होईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल. वस्त्र व गृहोपयोगी वस्तू ह्यांच्या खरेदीवर खर्च होईल. सामाजिक मान- सम्मान होतील.

मिथुन : आज चंद्र रास बदलून 08 जानेवारी 2024 रविवारी च्या दिवशी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा आपला दिवस बौद्धिक कामे व चर्चा करण्यात जाईल. आपल्या कल्पनाशक्तिस वाव मिळेल. शारीरिक व मानसिक आरोग्यास मात्र जपावे लागेल. दुपार नंतर व्यवसायात लाभ संभवतो. कुटुंबात शांतता नांदेल.

कर्क : आज चंद्र रास बदलून 08 जानेवारी 2024 रविवारी च्या दिवशी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवासात त्रास संभवतो. जमीन व वाहन या विषयीच्या समस्या भेडसावतील दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. शांतता लाभेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. शारीरिक उत्साह वाढेल. अती विचाराने मन विचलित होण्याची शक्यता आहे.

सिंह : आज चंद्र रास बदलून 08 जानेवारी 2024 रविवारी च्या दिवशी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस प्रवासास अनुकूल आहे. परदेशस्थ नातेवाईकां कडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. धनलाभ संभवतो. नवीन कार्य हाती घेऊ शकाल. दुपार नंतर आपली सहनशीलता दिसून येईल. नैराश्य येण्याची शक्यता आहे. आरोग्य नरम गरम राहील. कौटुंबिक किंवा संपत्ती संबंधी एखादी समस्या उदभवेल.

कन्या : आज चंद्र रास बदलून 08 जानेवारी 2024 रविवारी च्या दिवशी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपली मानसिक स्थिती द्विधा असल्याने नवीन कार्याचा आरंभ करण्यात त्रास होईल. कुटुंबियांशी वाद होऊन आपले मन दुखावले जाण्याची शक्यता असल्याने आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. दुपार नंतर मात्र अनुकूल वातावरण निर्माण होईल. भावंडांशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करू शकाल. प्रवासासाठी दिवस अनुकूल आहे. नशिबाची साथ लाभेल.

तूळ : आज चंद्र रास बदलून 08 जानेवारी 2024 रविवारी च्या दिवशी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दृढ विचार व वैचारिक संतुलन ह्यामुळे हाती घेतलेले काम सहजपणे पूर्ण करू शकाल. वस्त्रालंकार व मनोरंजन ह्यासाठी पैसा खर्च होईल. दुपारनंतर द्विधा मनःस्थिती होईल. त्यामुळे निर्णय घेणे अवघड होईल. शक्यतो कुटुंबियांशी मतभेद टाळावेत. आपला अहंपणा बाजूला ठेवून व्यावहारिक निर्णय घेणे हितावह राहील.

वृश्चिक : आज चंद्र रास बदलून 08 जानेवारी 2024 रविवारी च्या दिवशी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपला संतापीपणा व अविचारीपणा ह्यामुळे आपण अडचणीत येण्याची शक्यता आहे. एखादी अप्रिय घटना संभवते. दुपार नंतर शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक बाबींचे योग्य नियोजन करू शकाल. आपला आत्मविश्वास वाढीस लागेल.

धनू : आज चंद्र रास बदलून 08 जानेवारी 2024 रविवारी च्या दिवशी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरीत बढती संभवते. मित्रांसह सहलीस जाऊ शकाल. व्यापारात लाभ होईल. दुपार नंतर मात्र प्रकृतीस त्रास संभवतो. विचार पूर्वक कामे न केल्यास आपण अडचणीत येऊ शकाल. व्यावसायिक क्षेत्रात वावरताना आपले वक्तव्य संयमित ठेवावे.

मकर : आज चंद्र रास बदलून 08 जानेवारी 2024 रविवारी च्या दिवशी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टिने आजचा दिवस आनंददायी आहे. व्यापार -व्यवसायात वृद्धी संभवते. व्यवसायात अनुकूलता जाणवेल. सहकारी उत्तम सहकार्य करतील. दुपार नंतर मित्रांसह सहलीस जाऊ शकाल. प्राप्तीत वाढ संभवते. व्यापारात लाभ होतील.

कुंभ : आज चंद्र रास बदलून 08 जानेवारी 2024 रविवारी च्या दिवशी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपण बौद्धिक काम, नवनिर्मिती व लेखनकार्यात व्यस्त राहाल. नवीन काम सुरू करू शकाल. एखाद्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. व्यापारात लाभाच्या संधी लाभतील मात्र त्या फसव्या असण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. दुपार नंतर मात्र कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. माते कडून एखादा लाभ संभवतो. उत्तम सौख्य लाभेल. शासकीय कामात यश प्राप्ती होईल.

मीन : आज चंद्र रास बदलून 08 जानेवारी 2024 रविवारी च्या दिवशी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपणाला आपल्या कृतीवर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. गूढ विद्येची आवड निर्माण होईल. दुपार नंतर परदेशात वास्तव्यास असणार्‍या मित्र परिवाराकडून एखादी चांगली बातमी मिळेल. व्यापार -व्यवसायात अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. शक्यतो आज वाद टाळावेत.

हेही वाचा :

  1. सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग
  2. 'या' राशीच्या व्यक्तींना मित्रांसह सहलीस जाण्याचा योग; वाचा राशीभविष्य
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.