ETV Bharat / bharat

Ukraine-Russia war : युक्रेन रशिया युद्धामुळे गोव्याला येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली

author img

By

Published : Mar 3, 2022, 10:42 AM IST

गोव्यात येणाऱ्या चार्टडर्ड विमानाच्या संख्यात लक्षणीय घट झाली होती. मात्र, मागच्या दोन ते तीन महिन्यात पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पर्यटन सुरू झाल्यामुळें पर्यटन व्यवसायाला बरे दिवस आले होते. (Ukraine-Russia war ) मात्र, युद्धामुळे पर्यटनावर पुन्हा एकदा मंदीची झळ दिसून येत आहे. (tourists visiting Goa) राशियातून दर महिन्याला 3 ते 4 चार्टर्ड विमाने गोव्यात दाखल होत असत तेही आत्ता बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

d
d

सिंधुदुर्ग - कोरोना महामारीनंतर गोव्यात येणाऱ्या चार्टडर्ड विमानाच्या संख्यात लक्षणीय घट झाली होती. मात्र, मागच्या दोन ते तीन महिन्यात पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पर्यटन सुरू झाल्यामुळें पर्यटन व्यवसायाला बरे दिवस आले होते. मात्र, युद्धामुळे पर्यटनावर पुन्हा एकदा मंदीची झळ दिसून येत आहे. राशियातून दर महिन्याला 3 ते 4 चार्टर्ड विमाने गोव्यात दाखल होत असत तेही आत्ता बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

e
e

दोन्ही देशातून पर्यटकांना घेऊन येणारी चार्टर्ड विमाने बंद झाली

रशिया आणि युक्रेन युद्धाचे थेट परिणाम आत्ता गोव्याच्या पर्यटनावर होऊ लागले आहेत. दोन्ही देशातून पर्यटकांना घेऊन येणारी चार्टर्ड विमाने बंद झाली आहेत. याचाच परिणाम म्हणजे पूर्व युरोप आणि मध्य आशियातुन गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. याचा थेट परिणाम गोव्यातील 4हजाराहून अधिक असणाऱ्या लहान आणि मध्यम हॉटेल्सवर होऊ लागला आहे. तसेच शाक्स व्यवसायालाही मंदीची झळ बसली आहे.

कोविड नंतर पुन्हा एकदा संकट

कोविड महामारीनंतर गोव्यात येणाऱ्या येणाऱ्या चार्टडर्ड विमानाच्या संख्यात लक्षणीय घट झाली होती, मात्र मागच्या दोन ते तीन महिन्यात पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पर्यटन सुरू झाल्यामुळें पर्यटन व्यवसायाला बरे दिवस आले होते, मात्र युद्धामुळे पर्यटनावर पुन्हा एकदा मंदीची झळ दिसून येत आहे. राशियातून दर महिन्याला 3 ते 4 चार्टर्ड विमाने गोव्यात दाखल होत असत तेही आत्ता बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

e
e

युक्रेन चे नागरिक गोव्यात अडकले

गोव्यात कझाकिस्तान मधून बऱ्यापैकी चार्टर्ड विमाने येत असत , पण या मोसमात तीही आली नाहीत त्यातच युद्धामुळे युक्रेन मधून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या फारच मंदावली आहे. प्रत्येक पर्यटन मोसमात या देशातून 50 ते 60 चार्टर्ड विमाने गोव्यात दाखल होत असतात, मात्र आत्ता त्या येण्याच्या शक्यताही धूसर झाल्या आहेत.
त्यातच पर्यटनासाठी गोव्यात आलेले अनेक पर्यटक युद्धामुळे सध्या तरी गोव्यात अडकले आहेत. आणि हे युद्ध टाळले जावे अशी ते मागणी करत आहेत.

हॉटेल व्यावसायिक चिंतेत- टीटीजीए

गोव्यातील जी लहान आणि मध्यम हॉटेल्स आहेत ती प्रामुख्याने परदेशी पर्यटकांवर चालतात, त्यांच्या व्यवसायवर संक्रात ओढविली जात आहे. तसेच याचे परिणाम समुद्र किनाऱ्यावर उभारल्या जाणाऱ्या शाक्स वर देखील होत आहेत, या युद्धाचे परिणाम थेट गोव्याच्या पर्यटनावर होत असल्याचं टूर अँड ट्रॅव्हल असोसिएशन गोवा चे अध्यक्ष निलेश शहा यांनी सांगितले.

हेही वाचा - Kharkiv in Blast : असा दिवस कुणाच्या आयुष्यात येऊ नये; खार्कीव्हमधील ब्लास्टनंतर ठाणेकर विध्यार्थ्याचे शब्द

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.