ETV Bharat / bharat

Kedarnath Temple Open : हर हर महादेव! सहा महिन्यांनंतर उघडले केदारनाथ मंदिराचे दार

author img

By

Published : May 6, 2022, 7:51 AM IST

Updated : May 6, 2022, 8:01 AM IST

जगप्रसिद्ध केदारनाथ धाममध्ये मे महिन्यातही बर्फवृष्टी ( Kedarnath Dham snowfall ) होत आहे. आज शुक्रवार (दि. 6 मे)रोजी सकाळी 7:30 वाजता मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी खुले करण्यात आले आहेत. दरम्यान, बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टीसह पावसामुळे प्रवाशांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, प्रशासनाने काही ठिकाणी महत्वाची कामही केली आहेत.

केदारनाथ मंदिर
केदारनाथ मंदिर

केदारनाथ - बाबा केदारनाथचे दरवाजे आज सकाळी 7:30 वाजता सर्वसामान्य भाविकांसाठी उघडण्यात आले आहेत. दरवाजे उघडण्याच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पुष्कर धामीही उपस्थित होते. ( Doors Of Kedarnath Temple Open ) केदारनाथ धामचे दरवाजे उघडल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पहिली पूजा करण्यात आली. भक्त आतुरतेने बाबांचे दरवाजे उघडण्याची वाट पाहत होते. केदारनाथ धामचे दरवाजे उघडताच भाविकांची सहा महिन्यांची प्रतीक्षा संपली. दरम्यान, हर हर महादेवच्या जयघोषाने धाम दुमदुमून गेला आहे.

केदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले


कडाक्याच्या थंडीत बाबांच्या दरबारात दरवाजे उघडताना भक्तांची साक्ष होती. सुमारे 20 हजार भाविक बाबांच्या दरबारात पोहोचले आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक धाममध्ये पोहोचले आहेत. ( Kedarnath Temple Open ) केदारनाथ रावल भीम शंकर लिंगाने पौराणिक परंपरा आणि विधीद्वारे भगवान केदारनाथचे दरवाजे उघडले. केदारनाथ धामचे दरवाजे उघडल्यावर पहिली पूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने करण्यात आली. यासह आजपासून केदारनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे.

  • Uttarakhand | The doors of Kedarnath Dham opened with rituals & vedic chanting. CM Pushkar Singh Dhami also participated in this. The temple is decorated with 15 quintal flowers. More than 10,000 pilgrims were present in Kedarnath Dham during opening of the doors. pic.twitter.com/csmlP8Rpu4

    — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
केदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले

६ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज बाबा केदार यांच्या भक्तांची इच्छा पूर्ण झाली आहे. ( Kedarnath temple open today) सकाळी 7:30 वाजता बाबा केदारचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. आज सकाळी केदारनाथच्या मुख्य पुजाऱ्याच्या घरातून बाबा केदार यांची डोली लष्करी बँड आणि स्थानिक वाद्यांसह मंदिर परिसरात आणण्यात आली. त्यानंतर जय बाबा केदारच्या घोषणांनी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले.

  • Uttarakhand Chief Minister Pushkar Singh Dhami along with his wife offered prayers at the Kedarnath temple

    The portals of the temple have been opened today pic.twitter.com/fG2TXYBNbd

    — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • #WATCH | The doors of Kedarnath Dham opened for devotees. Kedarnath's Rawal Bhimashankar Linga opened the doors of Baba Kedar. On the occasion of the opening of the doors thousands of devotees were present in the Dham. pic.twitter.com/NWS4jtGstb

    — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">


मंदिराचे दरवाजे उघडताच संपूर्ण केदारपुरी जय बाबा केदारच्या जयघोषाने दुमदुमून गेली. ( Uttarakhand Chief Minister Pushkar Singh Dhami ) दरवाजे उघडताच बाबा केदार यांच्या त्रिकोणी आकाराच्या स्वयंभू लिंगाला सहा महिन्यांपूर्वी दिलेली समाधी काढून विधिवत पूजा सुरू करण्यात आली. दरवाजे उघडण्याच्या प्रसंगी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी देखील उपस्थित होते. बाबांचे दर्शन घेण्यासाठी सुमारे वीस हजार भाविक आज धामवर पोहोचले आहेत.

हेही वाचा - Snowfall in Kedarnath : केदारनाथ धाममध्ये मे महिन्यातही बर्फवृष्टी; उद्या मंदिर भक्तांसाठी खुले होणार

Last Updated :May 6, 2022, 8:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.