ETV Bharat / bharat

Teachers Day २०२३ : शिक्षक दिनाचा काय आहे इतिहास? कोणत्या देशात कधी साजरा केला जातो? घ्या जाणून...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 11:37 AM IST

Updated : Sep 5, 2023, 6:55 AM IST

Teachers Day 2023 : देशाचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. देशाच्या कानाकोपऱ्यात हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस आपण दरवर्षी ५ सप्टेंबरला साजरा करतो.

Teachers Day 2023
शिक्षक दिन

हैदराबाद : Teachers Day २०२३ : आपल्या जीवनात शिक्षकांना खूप महत्त्व आहे. पालकांनंतर शिक्षकच आपल्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी महत्त्वाचं योगदान देत असतात. शिक्षकांच्या या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी 'शिक्षक दिन' साजरा केला जातो. तुम्हाला माहिती असेल की देशाचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी 'शिक्षक दिन' साजरा (Dr Sarvepalli Radhakrishnan Birthday) केला जातो. या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. जाणून घ्या या दिवसाचा (Teachers Day History in Marathi) इतिहास....

प्रत्येक देशात वेगवेगळ्या तारखांना साजरा होतो शिक्षक दिन : प्रत्येक देशात वेगवेगळ्या तारखांना शिक्षक दिन साजरा केला जातो. 'यूएस'मध्ये हा दिवस मे महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या पहिल्या मंगळवारी साजरा केला जातो. थायलंडमध्ये १६ जानेवारी, इराणमध्ये २ मे, तुर्कीमध्ये २४ नोव्हेंबर आणि मलेशियामध्ये १६ मे रोजी 'शिक्षक दिन' साजरा केला जातो. चीन 10 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करतो. जागतिक शिक्षक दिन 5 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. तर भारतात 5 सप्टेंबर रोजी 'शिक्षक दिन' साजरा केला जातो. खरंतर प्रत्येकाच्या जीवनात प्रगती करून जीवन यशस्वी करण्यात गुरूचा हातखंडा असतो. त्यामुळं हा दिवस महत्वाचा आहे.

काय आहे शिक्षक दिन? : शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखवतात आणि मार्गदर्शन करतात. शिक्षक आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञानाचीच ओळख करून देत नाहीत तर येणाऱ्या आव्हानांना प्रत्यक्ष व्यवहारात कसे सामोरे जायचं याचीही माहिती देतात. भारतात शिक्षक दिन हा शैक्षणिक संस्थांमध्ये एखाद्या सणासारखा साजरा केला जातो. आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे लोक असतात, ज्यांच्याकडून आपल्याला नेहमी काहीतरी शिकायला मिळत असते. घरात आई-वडील, वडीलधारी मंडळी, शेजारी, मित्रमंडळी हे देखील आपले चांगले शिक्षक असतात, कारण त्यांच्याकडून आपल्याला नेहमीच शिकायला मिळते.

5 सप्टेंबरलाच का साजरा केला जातो शिक्षक दिन? : अनेकांच्या मनात प्रश्न येतो की याच दिवशी शिक्षक दिन का साजरा केला जातो? 1888 मध्ये या दिवशी स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म तामिळनाडूच्या तिरुमणी गावात झाला. दुसरे राष्ट्रपती असण्याव्यतिरिक्त, ते पहिले उपराष्ट्रपती, तत्त्वज्ञ, भारतरत्न विभूषित, भारतीय संस्कृतीचे मार्गदर्शक आणि विद्वान शिक्षक होते. प्रत्येकाने शिक्षणासाठी वाहून घेतले पाहिजे, असे त्यांचे मत होते. यासोबतच सतत शिकण्याची प्रवृत्ती असायला हवी, असे ते सांगत.

अशी झाली सुरूवात : असे म्हणतात की एकदा त्यांच्या शिष्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावळी शिष्यांनी याबाबत डॉ. राधाकृष्णन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, माझा वाढदिवस वेगळा साजरा करण्याऐवजी तो 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला तर मला आवडेल. तेव्हापासून दरवर्षी ५ सप्टेंबरला 'शिक्षक दिन' साजरा केला जाऊ लागला. भारतात 1962 मध्ये पहिल्यांदा शिक्षक दिन साजरा करण्यात आला होता.

हेही वाचा :

  1. World Coconut Day 2023 : जागतिक नारळ दिवस 2023; जाणून घ्या कसे आहे नारळ शरीरासाठी उपयुक्त...
  2. National Nutrition Week २०२३ : राष्ट्रीय पोषण सप्ताह 2023; निरोगी राहण्यासाठी पोषण महत्वाचे, जाणून घ्या इतिहास
  3. World Coconut Day 2023 : जागतिक नारळ दिवस 2023; जाणून घ्या कसे आहे नारळ शरीरासाठी उपयुक्त...
Last Updated : Sep 5, 2023, 6:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.