ETV Bharat / bharat

Cyclone Tauktae LIVE : चक्रीवादळाचा गुजरातला तडाखा, तीव्रता झाली कमी

author img

By

Published : May 18, 2021, 6:40 AM IST

Updated : May 18, 2021, 6:22 PM IST

Tauktae Cyclone LIVE updates
Cyclone Tauktae LIVE Updates : चक्रीवादळ गुजरातला धडकले; जमीनीवर आल्यानंतर तीव्रता कमी..

18:20 May 18

वांद्रे वरळी सी लिंक वाहतुकीसाठी सुरू

मुंबई - तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेला मुंबईतील सुप्रसिद्ध वरळी- वांद्रे सी लिंक वाहतुकीसाठी आज खुला करण्यात आला आहे. वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना यामुळे दिलासा मिळाला आहे. मुंबई महापालिकेने यासंदर्भातील माहिती ट्विटवरून दिली.  

17:32 May 18

बार्ज गॅल जहाजावरील सर्व नागरिकांना वाचवण्यात यश; भारतीय नौदलाची माहिती

मुंबई - बार्ज गॅल कन्सट्रक्शन येथे अडकलेल्या 137 लोकांना वाचवण्यात भारतीय नौदलाला यश आले आहे. आता याठिकाणी कोणीही अडकलेले नसल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे. या लोकांना वाचवण्यासाठी 'आयएनएस कोची' आणि 'आयएनएस कोलकाता'  हे जहाजं रात्रीपासून मेहनत घेत होते. 'एनर्जी स्टार' आणि 'अहल्या' जहाजानेही या बचावकार्यात सहभाग घेतला. इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे 'गॅल कन्स्ट्रक्टर' हे जहाज वादळाच्या तीव्रतेने समुद्रात वाहून गेले होते. या जहाजावर एकूण १३७ लोकं होते. 

17:17 May 18

मुंबईतील मोनो सेवा सुरू

मुंबई -  ट्रॅकवर फांदी पडल्याने मोनो सेवा बंद झाली होती. आता ट्रॅकवरील फांदी हटवल्यानंतर मोनो पुन्हा सुरू झाली आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत ठिकठिकाणी झाडे पडली आहेत. याचा फटका वाहतुकीला बसला आहे. 

17:16 May 18

नागपुरात जोरदार पावसाला सुरुवात

नागपूर - शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा देखील सुटला आहे. अचानक वातावरणात बदल झाला आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.  

16:29 May 18

गेट वे ऑफ इंडिया परिसराची महापौर पेडणेकर यांच्याकडून पाहणी

गेट वे ऑफ इंडिया परिसराची महापौर पेडणेकर यांच्याकडून पाहणी

मुंबई - तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. तर ऐतिहासिक वास्तू असलेल्या गेट वे ऑफ इंडिया परिसरात असलेला कठडाही तुटला आहे. याची पाहणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली. यावेळी मुंबईत झालेल्या झाडांच्या पडझडीमुळे दोन मुंबईकरांचा मृत्यू झाल्याची माहिती महापौरांकडून देण्यात आली. तसेच गेट वे ऑफ इंडिया परिसरात झालेली पडझड आणि मुंबईत इतर ठिकाणी झालेले नुकसान याची पाहणी करून लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात येईल, अशी माहिती महापौरांनी दिली आहे.  

15:24 May 18

पालघरमधील वडराई समुद्रात जहाज खडकात अडकले; हेलिकॉप्टरने रेस्क्यू ऑपरेशन सुरू

हेलिकॉप्टरने रेस्क्यू ऑपरेशन सुरू

पालघर - वडराई समुद्रात एक जहाज खडकात अडकले आहे. सध्या भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.  

13:58 May 18

सूरतमधील परिस्थितीचा आढावा..

सूरतमधील परिस्थितीचा आढावा..

तौक्ते चक्रीवादळ सध्या अहमदाबादपासून काही किलोमीटर अंतरावर आले आहे. यात सूरतमध्ये काय परिस्थिती आहे, याचा आढावा घेतलाय ईटीव्ही भारत गुजरातच्या प्रतिनिधी श्वेता सिंह यांनी..

13:55 May 18

मुंबईमधील महिला थोडक्यात बचावली..

  • #WATCH | Mumbai: A woman had a narrow escape when she managed to move away from the spot just in time as a tree uprooted and fell there. (17.05.2021)

    Mumbai received heavy rain and wind yesterday in wake of #CycloneTauktae

    (Source: CCTV footage) pic.twitter.com/hsYidntG7F

    — ANI (@ANI) May 18, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबईमध्ये सोमवारी वादळामुळे अनेक झाडे कोसळली. अशाच एका घटनेमध्ये एका महिलेचा थोडक्यात जीव वाचल्याचे समोर आले आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हे थरारक दृश्य कैद झाले..

13:10 May 18

मुंबईमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची महापौरांची माहिती..

तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे मुंबईत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

12:44 May 18

तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गेटवे ऑफ इंडिया येथील कठडा तुटला

Tauktae Cyclone LIVE updates
तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गेटवे ऑफ इंडिया येथील कठडा तुटला
  • तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गेटवे ऑफ इंडिया येथील कठडा तुटला..
  • परिसरात मोठी पडझड..
  • महानगर पालिका कर्मचाऱ्यांना कडून सफाईचे काम सुरू..
  • मुंबईच्या महापौर करणार गेटवे ऑफ इंडिया परिसराची पाहणी..

12:31 May 18

चेतक हेलिकॉप्टर्सनी दहा जणांना केले एअरलिफ्ट..

भारतीय कोस्ट गार्डच्या दोन चेतक हेलिकॉप्टर्सनी दमणहून दहा जणांना एअरलिफ्ट केले. हे सर्व बार्ज गॅल कॉन्स्ट्रक्टरवर अडकले होते. याठिकाणचे बचावकार्य अजूनही सुरू असल्याची माहिती कोस्ट गार्डने दिली आहे.

12:00 May 18

गुजरातमध्ये एकही बळी नाही..

गुजरातमध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे एकाही बळीची नोंद झाली नसल्याची माहिती एनडीआरएफचे प्रमुख एस.एन. प्रधान यांनी दिली. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने (एसईओसी) याबाबत अहवाल दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

11:58 May 18

तौक्तेची तीव्रता आणखी कमी..

तौक्ते चक्रीवादळ हे तीव्र चक्रीवादळ या प्रकारातून आता केवळ 'चक्रीवादळ' या प्रकारात आले आहे. पुढील काही तासांमध्ये या वादळाची तीव्रता आणखी कमी होत जाईल, आणि गुजरातच्या सीमेवर पोहोचेपर्यंत ते जवळपास नाहीसे होईल, असा अंदाज एनडीआरएफचे प्रमुख एस.एन. प्रधान यांनी व्यक्त केला आहे.

11:54 May 18

दीवमध्ये बचावकार्यासाठी लष्कराची सहा पथके तैनात..

दीवमध्ये तौक्तेच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू होते. त्यातच आता लष्कराच्या सहा पथकांनाही याठिकाणी तैनात करण्यात आले आहे. बोताड, अमरेली आणि भावनगरमध्ये ही पथके पाठवण्यात आली आहेत.

11:53 May 18

दिल्लीमध्येही दिसणार तौक्तेचा प्रभाव..

उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह दिल्लीमध्येही तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव दिसणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राजधानीमध्ये पावसाच्या सरींसह सोसाट्याचा वारा जाणवणार आहे.

11:40 May 18

वादळ ओसरल्यानंतर मुंबईतील परिस्थितीचा आढावा..

वादळ ओसरल्यानंतर मुंबईतील परिस्थितीचा आढावा..

तौक्ते वादळ पुढे गेले असले, तरी सोमवारी बसलेल्या तडाख्याने मुंबईतील जनजीवन बऱ्यापैकी विस्कळीत झाले होते. परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मुंबईमधील परिस्थितीचा आढावा घेतलाय, आमचे प्रतिनिधी केदार शिंत्रे यांनी..

11:38 May 18

अहमदाबादपासून काही तासांच्या अंतरावर तौक्ते; पाहा ग्राऊंड रिपोर्ट..

अहमदाबादपासून काही तासांच्या अंतरावर तौक्ते; पाहा ग्राऊंड रिपोर्ट..

गुजरातच्या अहमदाबादपासून काही अंतरावर तौक्ते चक्रीवादळ पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कालपासूनच पाऊस सुरू आहे. शहरातील परिस्थितीचा आढावा घेतलाय, ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधी अंजली दवे यांनी...

11:32 May 18

तौक्ते चक्रीवादळाचा कर्जतमधील अति दुर्गम भागाला मोठा फटका..

कोकण किनाऱ्यावर धडकलेल्या तौकते चक्रीवादळाने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला अक्षरशः झोडपुन काढल्यानंतर दोन दिवस थैमान घातले. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, घरावरील छप्पर देखील उडून गेली, याचा परिणाम रायगड जिल्ह्यावर देखील झाला. सुरुवातीला पावसाच्या हलक्या सरी बरोबर सुरू झालेल्या वादळी वाऱ्याने रात्री धुमाकूळ घालत घरांचे नुकसान केले असून जिल्ह्यात चार जणांचा चक्रीवादळाने बळी घेतला तर सहा जण जखमी झाले.

11:30 May 18

मुंबईजवळच्या समुद्रात अडकलेल्या १७७ जणांना नौदलाने वाचवले..

मुंबईजवळच्या समुद्रात अडकलेल्या 1७७ जणांना नौदलाने वाचवले..

बार्ज पी३०५ या हिरा ऑइल फिल्ड्सच्या परिसरात लोकांना वाचवण्यासाठी 'आयएनएस कोची' आणि 'आयएनएस कोलकाता'ने आतापर्यंत १७७ लोकांना वाचवले असल्याची माहिती समोर आली आहे. 

11:30 May 18

तोक्ते चक्रीवादळामुळे मुंबईतील तब्बल 400 ते 500 झाडं उन्मळून पडली; कित्येक वाहनांचे नुकसान..

काल दिवसभर संपूर्ण तोक्ते चक्रीवादळाचा फटका हा मुंबईला बसलेला आहे. मुंबईमध्ये जवळपास चारशे ते पाचशे झाड ही उन्मळून पडलेली असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेली आहे. त्यातली कित्येक झाड ही वाहनांवर ती पडलेली आहेत त्यामुळे वाहनांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल आहे. काल दिवसभर मुंबईमध्ये मुसळधार पावसासह जोरदार वादळी वारा होता त्यामुळे ही झाडं रस्त्यावरती उन्मळून पडल्यामुळे मुंबईतल्या वाहतूक व्यवस्थेवर सुद्धा काही प्रमाणात परिणाम झालेला आहे. खास करून मुंबईच्या उपनगरीय विभागा मधील आत मधील रस्त्यांमध्ये ही झाडं उन्मळून पडलेली आहेत त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. अद्याप मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही झाडं रस्त्यावरून उचललेली नाही आहेत त्यामुळे वाहतुकी वरती परिणाम होत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.
 

10:35 May 18

तौक्ते अहमदाबादपासून २१० किलोमीटरवर..

Tauktae Cyclone LIVE updates
तौक्ते अहमदाबादपासून २१० किलोमीटरवर..

तौक्ते चक्रीवादळ हे सकाळी ८.३० वाजता अहमदाबादपासून २१० किलोमीटर दूर होते. तसेच, ते सुरेंद्रनगरपासून १३० किलोमीटर दूर होते. येत्या तीन तासात याची तीव्रता हळूहळू कमी होत जाईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 

10:30 May 18

दोन जहाजांवरील लोकांच्या बचावासाठी 'आयएनएस तलवार' रवाना..

समुद्रात वाहून गेलेल्या दोन जहाजांच्या मदतीसाठी आयएनएस तलवार रवाना झाले आहे. सागर भूषण या ऑइल रिगवर १०१ जण उपस्थित होते, तसेच बार्ज एसएस-३ या जहाजावर १९६ लोक उपस्थित होते. तौक्ते वादळामुळे ही दोन्ही जहाजे समुद्रामध्ये वाहून गेली. सध्या ती पिपावाव बंदरापासून ५० समुद्री किलोमीटर दूर आहेत.

10:20 May 18

मुंबईच्या समुद्रात अजूनही मोठ्या लाटा आणि पाऊस..

तौक्ते पुढे गेले असले, तरी मुंबईच्या समुद्रामध्ये अजूनही मोठ्या लाटा दिसून येत आहेत.

10:16 May 18

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा..

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यामध्ये राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश होता. तसेच, दादरा आणि नगर हवेलीच्या प्रशासनाशीही चर्चा करुन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

10:15 May 18

Tauktae Cyclone LIVE updates
बचाव पथकातील कर्मचारी रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करताना..

बचाव पथकातील कर्मचारी रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करताना..

10:02 May 18

गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस..

गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस..

09:28 May 18

रायगड 5,244 घराचे अंशतः तर पाच घरांचे पूर्ण नुकसान

रायगड : अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यात 4 जणांचा बळी गेला आहे. उरणमध्ये दोघा भाजी विक्रेत्या महिलांचा मंदिराची भिंत कोसळून मृत्यू झाला आहे. पेण गागोदे इथं रामा कातकरी या आदिवासी वृद्धाचा तर रोह्यात रमेश साबळे या व्यक्तीच्या अंगावर झाड कोसलूम आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशतः तर 5 घरांचे पूर्णपणे नुकसान झाल आहे. चक्रीवादळाने जिल्ह्यातील 500 हुन अधिक विजेचे खांब कोसळले आहेत. अलिबाग आणि मुरुडमधील वीजपुरवठा अद्यापही खंडित असून तो पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नुकसानीच्या पंचनाम्याचे आज पासून सुरु करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. आपद्ग्रस्ताना सरकारी नियमानुसार मदत दिली जाईल असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.

09:26 May 18

मुंबईजवळच्या समुद्रात अडकलेल्या 146 जणांना नौदलाने वाचवले..

तौक्ते वादळाचा प्रभाव पहाता मुंबई जवळ असलेल्या अरबी समुद्रातील बॉम्बे हाय जवळ असलेल्या बार्ज पी305 हिरा ऑइल फिल्ड्सच्या परिसरात काम करणाऱ्या 273 कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी भारतीय नौदलाच्या आयएनएस कोची या नौकेला मदत कार्यासाठी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत आयएनएस कोची वरून 146 जणांना वाचविण्यात आलेले आहे.

दरम्यान वादळाची तीव्रता ही अधिक असून यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे येत असले तरी आयएनएस कोची व आयएनएस तलवार या दोन्ही जहाजांकडून बचावकार्य हाती घेण्यात आल्याचं नौदलाकडून स्पष्ट करण्यात आलेला आहे.

08:28 May 18

ओएनजीसीच्या तीन साइट्सना वादळाचा फटका..

ऑइल अँड गॅस कॉर्परेशन (ओएनजीसी)च्या तीन साइट्सना या वादळाचा फटका बसला आहे. मुंबईजवळ असलेल्या काही ड्रिलिंग रिग्जची मोडतोड झाली आहे. याठिकाणी ओएडीजी आणि एमआरसीसीच्या मदतीने बचावकार्य सुरू असल्याची माहिती ओएनजीसीने दिली.

08:27 May 18

चक्रीवादळाचे केंद्र सौराष्ट्रामध्ये..

चक्रीवादळाचे केंद्र सध्या दीवपासून ९५ किलोमीटर उत्तरेकडे, आणि अमरेलीपासून दहा किलोमीटर दक्षिणेकडे असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

06:46 May 18

बार्ज पी३०५ जवळील १३२ जणांना वाचवण्यात यश..

बार्ज पी३०५ या हिरा ऑइल फिल्ड्सच्या परिसरात लोकांना वाचवण्यासाठी 'आयएनएस कोची' आणि 'आयएनएस कोलकाता'ने रात्रभर मेहनत घेतली. या दोन्ही बोटींवरील पथकांनी सोमवारी रात्री ११ वाजेपर्यंत ६० लोकांना वाचवले होते. त्यानंतर 'एनर्जी स्टार' आणि 'अहल्या' जहाजानेही या बचावकार्यात सहभाग घेतला. मंगळवारी सकाळी सात वाजेपर्यंत १३२ जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती भारतीय नौदलाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे 'गॅल कन्ट्रक्टर' हे जहाज वादळाच्या तीव्रतेने समुद्रात वाहून गेले होते. या जहाजावर एकूण १३७ लोक होते. अजूनही बाकी लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

06:35 May 18

तौक्तेची वाटचाल सुरू; सध्या ११ किलोमीटर प्रतितास वेग..

गेल्या सहा तासांपासून तौक्तेची ११ किलोमीटर प्रतितास या वेगाने उत्तरेकडे वाटचाल सुरू असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.

06:33 May 18

गुजरात : कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवले..

गुजरातच्या वडोदऱ्यामध्ये असणाऱ्या एका कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. तौक्तेच्या पार्श्वभूमीवर या रुग्णांना शहरातील विविध रुग्णालयांमध्ये नेण्यात आले.

06:32 May 18

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी रात्री घेतली आढावा बैठक..

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी सोमवारी रात्री उशीरा अधिकाऱ्यांची बैठक घेतली. किनाऱ्यावरील जिल्हे, वलसाड आणि गीर सोमनाथ या जिल्ह्यांमधील अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

06:29 May 18

उत्तर भारतात जाणवणार तौक्तेचा प्रभाव..

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद, टुंडला, आग्रा, सिकंदराराव, जुजाऊ; आणि राजस्थानच्या बयाना, मेंढीपूर, महावा, लाचमनगढ, राजगड, अलवार, नागौर, विराटनगर, नदबई या परिसरामध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

06:27 May 18

तौक्तेची तीव्रता कमी..

अतीतीव्र प्रकारात मोडणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ते दीवच्या पुढे सुमारे तीस किलोमीटर, सौराष्ट्राजवळ पोहोचले होते. जमीनीवर आल्यामुळे या वादळाची तीव्रता कमी झाल्याचे हवामान विभागाने सांगितले.

06:21 May 18

तौक्ते चक्रीवादळ गुजरातला धडकले..

तौक्ते चक्रीवादळ हे गुजरातच्या समुद्री सीमेतून पूर्णपणे जमीनीवर पोहोचले आहे. आज दिवसभरात ते गुजरात ओलांडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

06:19 May 18

चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकले; मुंबईवरील धोका टळला..

मुंबई - अरबी समुद्रात निर्माण झालेले तौक्ते चक्रीवादळ आता संथपणे गुजरातच्या दिशेने सरकत आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागाला या चक्रीवादळाचा चांगलाच तडाखा बसला आहे. चक्रीवादळामुळे एकूण ६ जणांचा मृत्यू झाला, तर ९ जण जखमी झाले आहेत. काल (सोमवार) दिवसभर मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले होते. या चक्रीवादळामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये मोठे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी झाडे कोसळली आहेत. त्यामुळे घरांचे देखील नुकसान झाले आहे. तर रायगडमध्ये या चक्रीवादळाने तीन जणांचा बळी घेतला आहे. दरम्यान, निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला असून, मदतकार्य वेगाने करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

चक्रीवादळाने सोमवारी मुंबईलाही तडाखा दिला. चक्रीवादळाच्या प्रभावाने मुंबईसह उपनगराला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्माळून पडली आहेत. रस्त्यात ठिकठिकाणी पाणी साचल्याने, तसेच रेल्वे मार्गावर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी १० वाजल्यानंतर वरळी- वांद्रे सी-लिंक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मुंबई विमानतळावरील सर्व विमानांची उड्डाने रात्री 8 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसरीकडे मुंबईतील ३ कोविड केंद्रातील रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले.  

रत्नागिरीत घरांचे नुकसान, पंचनामे सुरू..

रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. काही ठिकाणी घरांवर झाडे पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. सध्या या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. तर, काही ठिकाणी नागरिकांनी स्वतः उन्मळून पडलेली झाडे बाजूला केली आहेत. जिल्ह्यात वीजपुरवठा देखील खंडीत असून, पूर्वपदावर आणण्याचे काम सध्या सुरू आहे.  

सिंधुदुर्गात दोन बोटी वाहून गेल्या..

तौक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्गच्या किनाऱ्याला मोठा फटका बसला आहे. देवगडच्या आनंदवाडी बंदरात नांगरून ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्या आहेत. या अपघातात एका खलाशाचा मृत्यू झाला आहे. तर, तीन खलाशांचे या घटनेत प्राण वाचले आहेत. किनारी भागात झाडे कोसळल्याने खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 748 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. किनारपट्टीवरच्या एकूण 144 कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले होते. तर 447 घरांचे नुकसान झाले आहे.  

रायगडमध्ये चक्रीवादळाने घेतला तिघांचा जीव..

रायगड जिल्ह्यात 17 मेच्या मध्यरात्रीपासून तौक्ते चक्रीवादळ समुद्रात येऊन धडकले होते. चक्रीवादळामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याबरोबरच 1,886 घरांचे अंशतः तर पाच घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे. तसेच दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे. काही ठिकाणी महावितरणच्या पोलचे व एका ट्रान्सफॉर्मरचे नुकसान झाले आहे. दरम्यान, चक्रीवादळ काळात कोविड रुग्णांच्या उपचारावर कोणतीही अडचण निर्माण झाली नाही.

Last Updated : May 18, 2021, 6:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.