ETV Bharat / bharat

Surat Crime News : आश्रमशाळेतील विद्यार्थिनींची छेड काढणारा शिक्षक गजाआड, असा झाला भांडाफोड

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2023, 3:42 PM IST

Surat Crime News : गुजरातच्या कच्छमध्ये एक अत्यंत लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे. येथील एका आश्रमशाळेत एक शिक्षक शाळेतील विद्यार्थिनींची अश्लील व्हिडिओ दाखवून छेड काढायचा. एका विद्यार्थिनीनं तिच्या घरी हे सर्व सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला.

Surat Crime News
Surat Crime News

सुरत (गुजरात) Surat Crime News : कच्छच्या मांडवी तालुक्यातील एका आश्रमशाळेत शिक्षकाच्या वासनांधपणाचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. हा शिक्षक इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांची छेड काढायचा. एका विद्यार्थिनीनं तिच्या घरी हा प्रकार सांगितल्यानंतर या शिक्षकाचा भांडाफोड झाला. त्यानंतर पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

असं उघडकीस आलं कांड : हा शिक्षक गेल्या तीन-चार महिन्यांपासून आश्रमशाळेत शिकणाऱ्या निष्पाप अल्पवयीन विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करत होता. तो मुलींच्या एकटेपणाचा फायदा घेत त्यांना मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवत असे. आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीनं तिच्या घरी तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर या मुलीच्या कुटुंबीयांनी शाळेत जाऊन शिक्षकाची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी मांडवी पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली.

मोबाईलच्या सर्च हिस्ट्रीमध्ये अश्लील वेबसाईट : मांडवी तालुक्यातील एका गावात ही आश्रमशाळा आहे. यानंतर तक्रारीनुसार तपास करण्यात आला. आश्रमशाळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. हा वासनांध शिक्षक तक्रारदार विद्यार्थिनीबरोबरच अन्य तीन विद्यार्थिनींसोबत अशा प्रकारचं कृत्य करत असल्याचं पोलीस तपासात उघड झालं. मुलींच्या जबानीनंतर पोलिसांनी शिक्षकाचा मोबाईल जप्त केला. मोबाईलच्या सर्च हिस्ट्रीमध्ये शिक्षकानं अश्लील वेबसाईट सर्च केल्याचं उघडकीस आलंय.

मुख्याध्यापिकेनं कारवाई केली नाही : हा शिक्षक सुमारे दीड वर्षांपूर्वी या आश्रमशाळेत रुजू झाला होता. तो जुलै महिन्यापासून हे कृत्य करत होता. गेल्या १५ ऑगस्ट रोजी आश्रमशाळेतील महिला स्वयंपाक कर्मचाऱ्यानं या शिक्षकाच्या दुष्कृत्याची माहिती शाळेच्या महिला मुख्याध्यापिकेला दिली होती. मात्र मुख्याध्यापिकेनं या शिक्षकाविरोधात पोलिसांकडे तक्रार केली नाही. अखेर विद्यार्थिनीनं हिंमत दाखवल्यानं हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा :

  1. Mumbai Crime News : स्कूल व्हॅन चालकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा निर्जनस्थळी विनयभंग, नराधमाला बेड्या
  2. Minor Girl Rape Case : बाप लेकीच्या नात्याला काळिमा, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून बापाची आत्महत्या
  3. Daughter in law molestation Case: सुनेशी लगट करत सासरा करायचा विनयभंग, तर पतीचेही परस्त्रीशी संबध, पीडितेची पोलिसात धाव
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.