ETV Bharat / bharat

नुपूर शर्माच्या अटकेच्या मागणीकरिता जमाव हिंसक, रांचीमध्ये पोलिसांवर दगडफेक, ११ जूनला सकाळी ६ पर्यंत इंटरनेट राहणार बंद

author img

By

Published : Jun 10, 2022, 6:30 PM IST

Updated : Jun 10, 2022, 9:45 PM IST

रांचीमध्ये पोलिसांवर दगडफेक
रांचीमध्ये पोलिसांवर दगडफेक

डेली मार्केटचे स्टेशन प्रभारी अवधेश ठाकूर यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. रांची एसएसपी सुरेंद्र कुमार झा ( Ranchi SSP Surendra Kumar Jha ) यांच्याही डोक्याला दुखापत झाली आहे. झॅप 3 चे जवान अखिलेश कुमार यांना तरूणांनी केलेल्या गोळीबारात गोळी लागली आहे

रांची - राजधानी रांचीमधील वातावरण तापले आहे. प्रशासनाने रांचीमध्ये 11जूनला सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हिंसक झालेल्या जमावाने वाहने पेटविली आहेत. तर पोलिसांवर दगडफेक केली आहे.

मुख्य रस्त्यावर नमाज झाल्यानंतर लोकांनी ( violance in Ranchi ) एकच गोंधळ घातला. आंदोलक नुपूर शर्माच्या अटकेची मागणी करत होते. यानंतर जमाव हातात काळा व धार्मिक झेंडा घेऊन डेली मार्केटसमोरील अल्बर्ट एक्का चौकाकडे धावू लागला. त्यांना रोखण्यासाठी पोलीसही धावले. दरम्यान, डेला मार्केटजवळ पोलिसांशी झटापट झाली. अचानक जमाव संतप्त झाला आणि प्रचंड दगडफेक ( stone pelting at Della Market ) झाली.

  • #WATCH | Jharkhand: Protest over the controversial remarks by suspended BJP leader Nupur Sharma turned violent in Ranchi. Vehicles were torched and vandalised and stone-pelting occurred. Injuries reported. pic.twitter.com/Z5FIndjZzf

    — ANI (@ANI) June 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पोलिसांनी हल्लेखोरांचा पाठलाग केला असता एकरा मशिदीच्या रस्त्यावरून दगडफेक करण्यात आली. सध्या सुजाता चौक आणि एकरा मशिदीजवळ बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. वाहतूक वळवण्यात आली आहे. संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात आयआरबी, झेडपी आणि जिल्हा पोलीस तैनात करण्यात ( Stone pelting on police in Ranchi ) आले आहेत.

नुपूर शर्माच्या अटकेच्या मागणीकरिता जमाव हिंसक

डेली मार्केटचे स्टेशन प्रभारी अवधेश ठाकूर यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. रांची एसएसपी सुरेंद्र कुमार झा ( Ranchi SSP Surendra Kumar Jha ) यांच्याही डोक्याला दुखापत झाली आहे. झॅप 3 चे जवान अखिलेश कुमार यांना तरूणांनी केलेल्या गोळीबारात गोळी लागली आहे. त्याला रिम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्या पायाला गोळी लागली आहे. पोलिसांवर बेकायदेशीर शस्त्रांनी गोळीबार सुरू केल्यावर प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आणि जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी हवेत गोळीबार केला.

नुपूर शर्माच्या अटकेच्या मागणीकरिता जमाव हिंसक

हेही वाचा-चक्क 200 किलो वजनाचा माणूस! किती लागते खायला; पहा व्हिडीओ

हेही वाचा-Rajyasabha Election 2022 : राजस्थानमध्ये चालली अशोक गेहलोतांची 'जादू'; काँग्रेसचा 4 पैकी 3 जागांवर विजय

हेही वाचा-अंधश्रद्धेतून महिलेची हत्या! मृतदेह डोंगरावरून दिला फेकून

Last Updated :Jun 10, 2022, 9:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.