ETV Bharat / bharat

Mahashivratri : महाशिवरात्रीला 'हे' पदार्थ करा भगवान शिवाला अर्पण, त्याशिवाय पूजा आहे अपूर्ण

author img

By

Published : Feb 4, 2023, 7:35 PM IST

Updated : Feb 16, 2023, 7:37 PM IST

Mahashivratri
महाशिवरात्री भोग

महाशिवरात्रीला भगवान शिवाला अभिषेकासोबतच त्यांना विशेष नैवेद्य अर्पण करण्याचे देखील महत्व आहे. भगवान शंकराला बेलपत्र अर्पण केल्यानंतर भोग म्हणून अनेक प्रकारचे पदार्थही अर्पण केले जातात.

'महाशिवरात्री'चा पवित्र सण माता गौरी आणि भगवान शंकर यांचा विवाहसोहळा दिन म्हणून साजरा केला जातो. महाशिवरात्रीला भक्त भगवान शंकराच्या पूजेसोबत उपवासही करतात. महाशिवरात्रीचे व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. याशिवाय लोकांचे कार्यातील अडथळे दूर होतात, अशी मान्यता आहे. या दिवशी स्नान करून भक्त स्वत: भगवान शिवाला दूध, दही, तूप, मध, चंदनाचा अभिषेक करतात. यानंतर महाशिवरात्रीला बेलपत्र, भांग, धतुरा, मदार फूल, पांढरे चंदन, पांढरी फुले, हंगामी फळे, गंगेचे पाणी, गाईच्या दुधाने भगवान शंकराची विधिवत पूजा केली जाते. यानंतर शिवाला विविध प्रकारचे भोग अर्पण केले जातात.

शिव पार्वतीची पूजा : महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा माता पार्वतीच्या पूजेशिवाय अपूर्ण आहे असे मानले जाते. दोघांची पूजा केल्याने धन-धान्य, सुख-समृद्धीचे वरदान मिळते. अशी आख्यायिका आहे की, एकदा माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले की, असे कोणते व्रत आहे, ज्याद्वारे मरणभूमीतील प्राणी सहज तुमचे आशीर्वाद प्राप्त करू शकतात? ज्याच्या प्रत्युत्तरात भगवान शिवाने पार्वतीला 'शिवरात्री' व्रताचा उपाय सांगितला. तेव्हापासून महाशिवरात्रीला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते.

विविध गोष्टींचा सहभाग : काही ठिकाणी या दिवशी शंकराची मिरवणूकही काढली जाते. लहान मुलांना भगवान शिव आणि माता पार्वतीचे रूप दिले जाते. या मिरवणुकीत हजारो लोक सहभागी होऊन भगवान शंकराचा आशीर्वाद घेतात. जाणून घेऊया भगवान महादेवाला कश्याप्रकारचा नैवेद्य अर्पण करु शकतो ते.

साबुदाणा : असे मानले जाते की, या दिवशी भाविक उपवास करतात. महाराष्ट्रात उपवासाला साबुदाणा खिचडी आणि भगर देखील खाल्ल्या जातो. विविध पध्दतीने तयार केलेल्या या साबुदाणा खिचडीचा नैवेद्य देखील भगवान शिवाला अर्पण केल्या जातो.

रताळ्याची पुरी : थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात भरपूर प्रमाणात रताळी मिळतात. या रताळ्यापासुन उपवासाला पुरी तयार केली जाते. जे भाविक कुठल्याही प्रकारचे मीठ न खाता उपवास करतात, ते रताळ्याच्या पुरीचा नैवेद्य भगवान शिवाला अर्पण करतात. आणि त्याचा प्रसाद स्वत:ही खातात.

बटाट्याचा शिरा : या दिवशी बटाट्याचा शिरा केला जातो. आणि त्याचा नैवेद्य भगवान शिवाला दिल्या जातो. उपवासाला देखील हा शिरा खाल्ल्या जातो. तुपात केलेला बटाट्याचा शिरा हा सगळ्यांना आवडणारा असतो. तसेच विविध प्रकारच्या फळांचा भोग देखील भगवान शंकाराला दाखविल्या जातो.

हेही वाचा : Mahashivratri 2023 : यंदा महाशिवरात्रीला जुळून येतोय विशेष योग, जाणून घ्या कधी आहे महाशिवरात्री

Last Updated :Feb 16, 2023, 7:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.