ETV Bharat / bharat

Shraddha Murder Case : आफताब पूनावालाने जामीन अर्ज मागे घेतला

author img

By

Published : Dec 22, 2022, 3:43 PM IST

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा हत्याकांडातील (Shraddha Murder Case) आरोपी आफताब पूनावालाने (Aftab Poonawalla) त्याचा जामीन अर्ज आज मागे घेतला. (Aftab Poonawalla withdraws bail plea). तो आज सकाळी 10.10 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश वृंदा कुमारी यांच्या न्यायालयात हजर झाला होता.

Aftab Poonawalla
Aftab Poonawalla

नवी दिल्ली : श्रद्धा हत्याकांडातील (Shraddha Murder Case) आरोपी आफताब पूनावालाच्या (Aftab Poonawalla) जामीन अर्जावर साकेत न्यायालयात सुनावणी होणार आहे. गुरुवारी सकाळी 10.10 वाजता आफताबला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी आफताबने जामीन अर्ज मागे घेतला. (Aftab Poonawalla withdraws bail plea). आफताबच्या वकिलाने सांगितले की, तुरुंगात गेल्यावर आफताबशी 50 मिनिटे बोलणे झाले. त्यानंतर आज पुन्हा न्यायालयात पेशी झाली. या दरम्यान आफताबने न्यायाधीशांना याचिका मागे घ्यायची असल्याचे सांगितले.

न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर : आपल्या लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरचा गळा दाबून खून केल्याचा आरोप असलेल्या आफताबने 17 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान दिल्ली न्यायालयाला सांगितले होते की त्याने वकलतनामावर स्वाक्षरी केली आहे. परंतु त्याच्या वतीने जामीन अर्ज दाखल केला जाईल याची माहिती नव्हती. आज सकाळी 10.10 वाजता आफताब व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश वृंदा कुमारी यांच्या न्यायालयात हजर झाला. यानंतर न्यायाधीशांनी त्याला सकाळी 11 वाजता पुन्हा व्हीसीमध्ये हजर राहण्यास सांगितले आहे, त्यानंतर सुनावणी होईल.

नार्को चाचणी देखील झाली : तत्पूर्वी, आरोपी आफताबला दिल्लीच्या तिहार तुरुंगातून रोहिणी येथील आंबेडकर रुग्णालयात 1 डिसेंबर रोजी नार्को चाचणीसाठी आणण्यात आले होते, तेथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली दोन तास नार्को चाचणी करण्यात आली. या आधी आफताबची रोहिणीच्या एफएसएल कार्यालयात पाच वेळा पॉलीग्राफ चाचणी झाली आहे. या दरम्यान आफताबवर हल्ला होण्याची भीती असल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

खून करण्यापूर्वी अनेक क्राईम शो पाहिले : मीडिया रिपोर्ट्सनुसार, हत्येनंतर आफताब संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत घरी यायचा आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवलेले मृतदेहाचे तुकडे विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन जायचा. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेपूर्वी आफताबने अमेरिकन क्राईम शो डेक्सटरसह अनेक गुन्हेगारी चित्रपट आणि शो पाहिले होते. पुरावे पुसण्यासाठी आफताबने गुगलवर रक्त साफ करण्याचा मार्गही शोधला होता. त्यानंतरच त्याने श्रद्धाची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे करवतीने 35 तुकडे केले. त्यानंतर त्याने फ्रीज विकत घेतला व वास दाबण्यासाठी अगरबत्तीचा वापर केला. त्याने सलग 18 दिवस रोज रात्री 2 वाजता श्रद्धाचे तुकडे जंगलात नेऊन टाकले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.