ETV Bharat / bharat

Gyanvapi Report : ज्ञानवापी मशिदीच्या भिंतींवर शेषनाग, देवी-देवतांच्या कलाकृती..? रिपोर्टमध्ये दावा..

author img

By

Published : May 19, 2022, 7:58 AM IST

तत्कालीन वकील आयुक्त अजय कुमार मिश्रा यांनी बुधवारी न्यायालयात अहवाल सादर केला ( gyanvapi case advocate commissioner report ) होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोगाच्या ६ आणि ७ मे रोजी झालेल्या कार्यवाहीच्या अहवालात हिंदू धार्मिक प्रतिकांचे फोटो आणि व्हिडिओग्राफीचा उल्लेख करण्यात आला आहे.

Gyanvapi
ज्ञानवापी

वाराणसी ( उत्तरप्रदेश ) : ज्ञानवापी येथे शृंगार गौरींची नियमित पूजा आणि इतर देवतांच्या रक्षणाच्या मागणीवर ६ आणि ७ मे रोजी झालेल्या आयोगाच्या कार्यवाहीचा अहवाल तत्कालीन वकील आयुक्त अजय कुमार मिश्रा यांनी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ यांच्या न्यायालयात बुधवारी सादर ( gyanvapi case advocate commissioner report ) केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अहवालात ज्ञानवापी मशिदीच्या मागील भिंतीवर शेषनाग आणि देवतांच्या कलाकृती असल्याचा फोटो आणि व्हिडिओग्राफीत उल्लेख दिसून येत आहे. अहवालानुसार, भिंतीच्या उत्तरेकडून पश्चिमेकडे दगडी पाटीवर भगव्या रंगाची नक्षीदार कलाकृती आहे. यामध्ये चार मुर्तींचा आकार देवतेच्या रूपात दिसत होता. हा अर्धवट अहवाल बुधवारी न्यायालयाने आपल्या रेकॉर्डवर घेतला.

दोन पानी अहवालात तत्कालीन वकिल आयुक्तांनी न्यायालयाला सांगितले की, 6 मे रोजी केलेल्या तपासात चौथी आकृती मूर्ती असल्याचे दिसते आणि त्यावर शेंदुराचा जाड थर आहे. त्याच्या पुढे दिवा लावण्यासाठी वापरल्या जाणार्‍या त्रिकोणी टाक्यात (गणुखा) फुले ठेवली होती. पूर्वेकडील बॅरिकेडिंगच्या आत आणि मशिदीच्या पश्चिमेकडील भिंतीमध्ये मोठा ढीग सापडला आहे. हा शिलालेखही त्यांचाच एक भाग असावा असे वाटते. त्यावर नक्षीकाम केलेल्या कलाकृती मशिदीच्या पश्चिम भिंतीवरील कलाकृतींशी जुळतात.

7 मे रोजी सुरू झालेल्या आयोगाचे कामकाज अंजुमन इनाझानिया मस्जिद कमिटी या एका पक्षाच्या अनुपस्थितीत सुरू झाले. खंडित देवता, मंदिराचा ढिगारा, हिंदू देवतांच्या कलाकृती, कमळाची आकृती, दगडी स्लॅब आदींची छायाचित्रे आणि व्हिडिओग्राफी करण्यात आल्याचे अहवालात सांगण्यात आले. कामकाजादरम्यान वादग्रस्त पश्चिमेकडील भिंतीच्या बाजूला शेंदूर लावलेल्या तीन कलाकृतींचे दगड आणि दाराची चौकट शृंगार गौरीचे प्रतीक म्हणून पुजली जात आहे का, या प्रश्नावर फिर्यादींनी घटनास्थळी सांगितले की, त्यांच्या मुख्य मंदिरात प्रवेश आणि बॅरिकेडिंगच्या आत असलेल्या अवशेषांना मनाई आहे.

हेही वाचा : Gyanvapi Case : ज्ञानवापी प्रकरण : न्यायालयात आज सादर होणार सर्व्हे रिपोर्ट.. सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.