ETV Bharat / bharat

हॉकी : पंजाबच्या संसारपूरने भारताला १४ ऑलंपिक विजेते खेळाडू दिले

author img

By

Published : Jan 7, 2021, 6:05 AM IST

संसापूर गाव हॉकीच्या मक्कारुपात ओळखलं जातं. या गावाला गौरवशाली इतिहास लाभलाय. जो व्यक्ती या गावाचा इतिहास ऐकतो त्याला या गावाबद्दल नक्कीच गर्व वाटायला लागतो. कारण संसापूर हे एक असं गाव आहे, ज्या गावानं आत्तापर्यंत १४ ऑलंपिक खेळाडू दिले आहेत.

हॉकी
हॉकी

चंदीगड - पंजाबच्या जालंधरमधील संसापूर गाव हॉकीच्या मक्कारुपात ओळखलं जातं. या गावाला गौरवशाली इतिहास लाभलाय. जो व्यक्ती या गावाचा इतिहास ऐकतो त्याला या गावाबद्दल नक्कीच गर्व वाटायला लागतो. कारण संसापूर हे एक असं गाव आहे, ज्या गावानं आत्तापर्यंत १४ ऑलंपिक खेळाडू दिले आहेत. या खेळाडूंनी मोठ-मोठ्या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत २७ पदकं जिंकलीयेत.

हॉकी

सुरुवातीला येथील लोक इंग्रजांसोबत हॉकी खेळायचे. खेळता खेळता लोकांची हॉकीत रुची वाढली आणि खेळात सुधारणाही होऊ लागली. आत्तापर्यंत संसारपूरने भारताला १४ ऑलंपिक विजेते खेळाडू दिले आहेत, असे ऑलंपिक विजेते गुरदेव सिंह यांचे भाचे अरविंदर सिंह म्हणाले.

या गावातील सहा खेळाडू एकाचवेळी भारतीय हॉकी संघात

एक वेळ होती जेव्हा या गावातील मैदानांनी भारतीय हॉकीला एका नव्या उंचीवर पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. मात्र, आता ही मैदाने सरकारच्या बेफिकरीची शिकार बनली आहेत. जगात हॉकीचा स्तर उंचावणाऱ्या या गावाला आता विशेष सुविधांची गरज आहे. हॉकी प्रेमींसाठी आजही या गावातील मैदाने आकर्षणाचा केंद्र आहेत. कारण एकेकाळी या गावातील सहा खेळाडू एकाचवेळी भारतीय हॉकी संघात खेळत होते. या गावाला आंतराष्ट्रीय सुविधा दिल्या तर या गावातील मुले ना केवळ गावाची परंपरा पुढे नेतील तर हॉकीत देशासाठी पदकेही जिंकून आणतील.

इथे एक चांगला स्पोर्ट्स हब बनवण्याची गरज आहे. गावाजवळ भारतीय सेनेचे मैदान आहे. या मैदानावरच खेळून गावातील मुलांनी विविध यशांना गवसणी घातली आहे. जर आमच्या गावात एक चांगलं मैदान तयार झालं तर आम्ही भविष्यात भारताला सर्वश्रेष्ठ खेळाडू देऊ शकतो, असेही अरविंद सिंह म्हणाले. या मैदानाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन पंजाब सरकारने नवीन खेळाडूंसाठी एक पुरुष आणि एक महिला प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे. या व्यतिरिक्त मुलांना इतरही काही सुविधा पुरवल्या जात आहेत.

छोट्या मैदानामुळे मुले नीट खेळाचा सराव करू शकत नाहीत

मुले या ठिकाणी येण्याचे एकमेव कारण म्हणजे या गावाचा इतिहास. त्यांना गर्व आहे की, एकेकाळी त्यांच्या गावातील ६ खेळाडू एकाचवेळी भारताच्या हॉकी संघात खेळत होते. खेळाडूंना कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवू नये, यासाठी सरकार वेळोवेळी प्रयत्न करत असते. पण, या गावात सुविधायुक्त असे हॉकीचे मैदान बनवलेले नाही. या गावात एक छोटे मैदान आहे. जिथं लहान मुले हॉकीचा सराव करतात आणि अन्य खेळही खेळतात, असे येथील प्रशिक्षक गुरप्रीत सिंह म्हणाले.

सध्या जवळपास ६० ते ७० मुले या मैदानावर हॉकीचा सराव करण्यासाठी येतात. ज्यांची देशासाठी पदक जिंकण्याची इच्छा आहे. आम्हाला शिकवणारे प्रशिक्षक खूप चांगले आहेत. जर आम्हाला एखादी गोष्ट समजली नाही तर ते आम्हाला चांगल्या पद्धतीने समजावून सांगतात असे हॉकी खेळाडू सिमरन म्हणाली.

इथली मुलं मोठ्या उंचीवर खेळावीत असे मला वाटते. मात्र, या छोट्या मैदानामुळे मुले नीट खेळाचा सराव करू शकत नाहीत. त्यामुळे आम्हाला एका मोठ्या आणि सुविधायुक्त मैदानाची गरज आहे, असे हॉकी खेळाडू तनू म्हणाली. सध्या गावात सुविधायुक्त हॉकीचे मैदान नाही. मात्र, या लहान मैदानावरही मुलं जीवतोड मेहनत करत हॉकी शिकत आहेत आणि ही गोष्ट त्यांच्यासाठी गौरवास्पद आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.