ETV Bharat / bharat

Same Sex Marriage : बिहारमध्ये दोन मैत्रिणींनी केले लग्न..अन् लगेच गाठले पोलीस ठाणे; जाणून घ्या काय आहे प्रकरण

author img

By

Published : Jul 14, 2023, 5:49 PM IST

बिहारमधील रोहतास येथे दोन मुलींनी एकमेकींशी लग्न केले. यानंतर दोघीही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या आणि संरक्षणाची मागणी केली. यापैकी एक मुलगी अल्पवयीन आहे. दोघींनाही नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Same Sex Marriage
समलिंगी विवाह

रोहतास (बिहार) : बिहारच्या रोहतासमध्ये समलिंगी विवाहाचे प्रकरण समोर आले आहे. येथे दोन मुलींनी एकमेकींशी लग्न केले आहे. मात्र यापैकी एक मुलगी अल्पवयीन आहे. या दोघींचा हा विवाह आता चर्चेचा विषय ठरला आहे. आश्चर्याचे म्हणजे, लग्न झाल्यानंतर दोघींनी पोलीस ठाणे गाठून संरक्षणाची मागणी केली.

पळून जाऊन लग्न केले : हे प्रकरण रोहतास जिल्ह्यातील सूर्यपुरा येथील आहे. या दोघींनी घरातून पळून जाऊन लग्न केले आहे. मुलींनी जेव्हा पोलिसांना त्यांच्या लग्नाची माहिती दिली तेव्हा पोलिसही चकित झाले. दोघींपैकी एक मुलगी बीए द्वितीय वर्षात शिकते आहे. तर दुसऱ्या मुलीने नुकतीच 2023 मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. दोघींमध्ये बऱ्याच दिवसांपासून संबंध होते. दरम्यान, त्यांचे प्रेम वाढत गेले. त्या सोबत ट्यूशनला जायच्या, एकत्र झोपायच्या आणि एकत्र जेवायच्या. त्यांना एकत्र राहायला आवडायचे. त्यांची घरेही एकमेकांसमोर असल्याने त्या सतत एकमेकांच्या घरी जात असत.

मंदिरात केले लग्न : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघींचे लहानपणापासूनच एकमेकींवर प्रेम होते. त्यांनी भालुनी भवानी धाम येथे सर्व धार्मिक विधींनुसार लग्न केले. आता आम्ही दोघीही एकत्र राहणार असल्याचे मुलींनी पोलिसांना सांगितले. मात्र घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला तर त्या इथून दुसरीकडे जाऊन एकत्र राहतील, असे त्या म्हणाल्या.

एक मुलगी अल्पवयीन आहे : पोलिसांनी सांगितले की, दोघांपैकी एक मुलगी अजूनही अल्पवयीन आहे. अशा स्थितीत हा विवाह वैध नाही. दोघींनाही नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मात्र, या मुलींनी पोलिसांना सांगितले की, आम्ही प्रौढ झाल्यावर एकमेकींसोबत राहू. सध्या त्यांच्या या लग्नाची चर्चा सर्वत्र आहे.

दोन्ही मुलींचे लग्न वैध नाही. दोघींच्या नातेवाइकांना पोलिस ठाण्यात बोलावून या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. मुलींना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे आश्वासन नातेवाईकांनी दिले आहे. - प्रिया कुमारी, स्टेशन प्रमुख, सूर्यपुरा पोलिस स्टेशन

हेही वाचा :

  1. Same Sex Marriage: समलिंगी विवाहावर सुप्रीम कोर्टात घमासान! समलिंगींच्या प्रश्नांसाठी सरकारचे प्रयत्न काय?, कोर्टाचा थेट प्रश्न
  2. Monks Opposition To Same-Sex Marriage : समलिंगी विवाहाला साधू-मुनींचा विरोध, पंतप्रधानांची घेणार भेट
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.