ETV Bharat / bharat

देशात एम्सच्या डॉक्टरांचे कोविड विरोधात बूस्टर डोसवर संशोधन सुरू

author img

By

Published : Jun 15, 2021, 11:09 AM IST

कोरोनाच्या लसींची अधिक कार्यक्षमता टिकविण्यासाठी बूस्टर डोसची गरज आहे का हे पाहण्यासाठी भारत, अमेरिका आणि इतर अनेक देशांमध्ये संशोधन चालू आहे, असे एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले आहे.

corona booster dose
corona booster dose

नवी दिल्ली - कोरोनाच्या लसींची अधिक कार्यक्षमता टिकविण्यासाठी बूस्टर डोसची गरज आहे का हे पाहण्यासाठी भारत, अमेरिका आणि इतर अनेक देशांमध्ये संशोधन चालू आहे, असे एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले आहे.

" देशात गेल्या पाच महिन्यापासून लसीकरणास सुरूवात झाली आहे. सर्वजण डॉक्टर्स, सरकार तसेच संशोधक हा बूस्टर डोस सुरक्षित आहे का अथवा याचे परिणामाबाबत चाचपणी सुरू आहे. अमेरिका, युरोपियन देश आणि भारतात याबाबत मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे, असे एम्स दिल्ली मधील औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजीव सिन्हा यांनी सांगितले.

पुढील दोन ते तीन महिन्यात याबाबतची माहिती उपलब्ध असेल. त्यानंतर बूस्टर डोसबाबत निर्णय घेण्यात येईल. हे सर्व संशोधनावरच अवलंबून असेल. एम्समध्येही बूसेटर डोसबाबत काम सुरू असल्याचेही ते पुढे म्हणाले. देशात कोव्हीशिल्ड, कोव्हॅक्सिन, आणि स्फुटनिक व्ही या तीन लसींना मान्यता देण्यात आली आहे.

एका प्रसिध्द वैद्यकीय मासिकात अहवाल प्रसिध्द झाल्यावर कोव्हीशिल्ड मधील दोन लशींच्या डोस दरम्यान कालावधीमध्ये वाढ करण्याचा विचार करत आहे. डॉ. सिन्हा यांनी नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास मदत होईल.

हा खूपच कठीण काळ आहे. सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करायला पाहिजे. आणि गरज असल्यासच त्यांनी घराबाहेर पडावे. घरीच काम करण्यास प्राधान्य द्यायला पाहिजे. ऑफिसला जात असल्यास एकत्र जेवण करणे टाळा,असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा - कोरोनाचा 'डेल्टा प्लस' स्ट्रेन आहे घातक; औषधांच्या परिणामाबाबतही साशंकता..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.