ETV Bharat / bharat

Top News Today : आजच्या महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

author img

By

Published : Dec 23, 2022, 7:18 AM IST

आज दिवसभरात आजच्या महत्त्वाच्या घटना काय असतील ते जाणून घेवू (Top News Today in Marathi) या. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर (Top News Today ) वाचा. आज हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे, तसेच राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर (Marathi news) आहेत.

Top News Today
आजच्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : आज हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. महाराष्ट्र राज्य किसान सभेची पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर (Raj Thackeray Nagpur visit) आहेत. यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेतले जाणार (Marathi news) आहेत. पुण्यात आमदार मुक्ता टिळकांवर अंतिम संस्कार होणार आहे. आजपासून मराठा सेवा संघाच्या महाअधिवेशनाला सुरुवात होत आहे. शेतकरी संघटना कृषी कार्यालयावर मोर्चा विविध मागण्यांसाठी मोर्चा घेऊन जाणार (Top news Today in Marathi) आहे.

आज हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस : आज हिवाळी अधिवेशनाचा (Winter session 2022) पाचवा दिवस आहे. सोमवारपासून अधिवेशनाला सुरूवात झाली आहे.

आज महाराष्ट्र राज्य किसान सभेची पदयात्रा : वर्ध्यात महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या (March of Maharashtra State Kisan Sabha) वतीने वणी ते नागपूर पदयात्रा करत शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांकरिता संघर्ष दिंडी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज वर्धा जिल्ह्यातील बरबट्टी येथून निघत ही पदयात्रा नागपूर विधानभवनावर जाणार आहे. या पदयात्रेत अनेक शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत.

आज राज ठाकरेंचा नागपूर दौरा : आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर (Raj Thackeray Nagpur visit) आहेत. संघटनात्मक बांधणी आणि पदाधिकाऱ्यांची नेमणूक असे त्यांच्या दौऱ्याचे उद्दिष्ट आहे. सकाळी 11 वाजतापासून संध्याकाळपर्यंत वसंतराव देशपांडे सभागृहात त्यांच्या पक्षीय बैठका पार पडणार आहेत.

आज आमदार मुक्ता टिळकांवर अंतिम संस्कार : आज पुण्यात आमदार मुक्ता टिळकांवर ( MLA Mukta Tilak) अंतिम संस्कार होणार आहेत. आमदार मुक्ता टिळक यांचे पार्थिव सकाळी 9 ते 11 या कालावधीत पुण्यातील केसरी वाड्यात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार विधी होणार आहे.

आजपासून मराठा सेवा संघाच्या महाअधिवेशनाला सुरुवात : परभणी- मराठा सेवा संघाच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनाला (General Conference of Maratha Seva Sangh) आजपासून सुरुवात होत आहे. आज शोभायात्रा व ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 3 वा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून शोभा यात्रेला सुरूवात होणार आहे.

आज शेतकरी संघटनेचा कृषी कार्यालयावर मोर्चा : आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (March of Farmers Association on Agriculture Office) वतीने कृषी अध्यक्ष कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. पिक विमासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.