ETV Bharat / bharat

Top News Today : दिवसभरात कुठे काय घडणार, या महत्त्वाच्या बातम्यांवर असणार नजर

author img

By

Published : Nov 21, 2022, 6:54 AM IST

आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा (Top News Today) घेवू. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या (Read Important top news) बातम्या वाचा.

Top News Today
महत्त्वाच्या घडामोडीं

मुंबई : आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या काय घडामोडी असतील याचा थोडक्यात आढावा (Top News Today) घेवू. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याविरोधात रविवारी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी टीका केली आहे. राज्यात ठिकठिकाणी आजही आंदोलने केली जाणार आहेत. याबरोबरच कांग्रेस नेते राहुल गांधी ( Congress leader Rahul Gandhi ) आज गुजरातच्या राजकोट और सूरतमध्ये 2 जनसभांना संबोधित करणार आहेत. भारत जोडो यात्रेत ( Bharat Jodo Yatra ) विश्रांती घेऊन राहुल गांधी या सभांना उपस्थिती लावणार आहेत. मुंबई- शिवडी बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी आवश्यक असणारे धोरण सरकार राबवत नसल्याच्या आरोपावरुन शिवसेनेकडून लाक्षणिक साखळी उपोषण करण्यात येणार आहे.

  • राज्यपालांविरोधात राज्यभर आंदोलन : राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याविरोधात काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी टीका केली आहे. राज्यात ठिकठिकाणी आजही आंदोलने केली जाणार आहेत. राज्यपालांच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीकडून सकाळी दहा आंदोलन करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या वतीने मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे. याबरोबरच उस्मानाबादमध्ये राज्यपालांविरोधात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोलीत राष्ट्रादीच्या मेहबूब शेख यांच्या नेत्तृत्वात राज्यपालांविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. याबरोबरच अहमदनगरमध्ये देखील जामखेडच्या खर्डा चौकात सकल मराठा समाजाच्यावतीने निदर्शने केली जाणार आहेत.
  • सीमाप्रश्नांसंबंधी उच्चस्तरीय समितीची आज मुंबईत बैठक : महाराष्ट्र सरकारच्या उच्च स्तरीय समितीची सीमाप्रश्नांसंबंधी आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक होणार आहे. सीमाप्रश्नाची सर्वोच्च न्यायालयात 23 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असून त्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
  • राहुल गांधी आज गुजरात निवडणुकीसाठी प्रचारात उतरणार : कांग्रेस नेते राहुल गांधी आज गुजरातच्या राजकोट और सूरतमध्ये 2 जनसभांना संबोधित करणार आहेत. भारत जोडो यात्रेत विश्रांती घेऊन राहुल गांधी या सभांना उपस्थिती लावणार आहेत.
  • नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात सुषमा अंधारेंची सभा : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेत आज कणकवलीत राणेंच्या बालेकिल्ल्यात जाहीर सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर ही जाहीर सभा आहे.
  • आदिवासी नागरिकांच्या समस्येवरील याचिकेवर सुनावणी : मेळघाट आणि अन्य आदिवासी भागातील मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू ओढवत आहे. तसेच तेथील नागरिकांना इतरही समस्या भेडसावत आहेत. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात डॉ. राजेंद्र बर्माआणि सामाजिक कार्यकर्ते बंडू साने यांच्यासह विविध जनहित याचिका दाखल करण्यात आल्या असून या याचिकांवर मुख्य न्या. दीपांकर दत्ता यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
  • शिवसेनेचे लाक्षणिक साखळी उपोषण : मुंबई- शिवडी बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी आवश्यक असणारे धोरण सरकार राबवत नसल्याच्या आरोपावरुन शिवसेनेकडून लाक्षणिक साखळी उपोषण करण्यात येणार आहे. यावेळी आदित्य ठाकरे, अरविंद सावंत उपस्थित राहणार आहेत.
  • मुंबईत आम आदमी पक्षाचं आंदोलन : गोखले ब्रीज बंद झाल्यामुळे नागरिकांना होणारा वाहतूक कोंडीच्या त्रासामुळे आम आदमी पार्टीकडून आंदोलन केले् जाणार आहे.
  • PM मोदींचा आज गुजरात निवडणुकीसाठी प्रचार : प्रधानमंत्री मोदींच्या आज सुरेंद्रनगर आणि जंबूसर येथे सभा होणार आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.