ETV Bharat / bharat

Top News Today : दिवसभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर

author img

By

Published : Nov 20, 2022, 6:51 AM IST

आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा (Top News Today) घेवू. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या (Read Important top news) बातम्या वाचा.

Top News Today
आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

मुंबई : आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा (Top News Today) घेवू. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या (Read Important top news) बातम्या वाचा. आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सिनेट निवडणूक, मोदी यांची अमरेलीत सभा, फिफा विश्वचषकाचा आज पहिला सामना, अमित शाह आज पुणे दौऱ्यावर, आज दुसरा टी 20 सामना, आज मध्य रेल्वेचा पावर ब्लॉक या महत्त्वाच्या घडामोडी (News Today in Marathi) आहेत.

आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सिनेट निवडणूक (Sant Gadgebaba Amravati University Senate Election) : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट, विद्वत परिषद आणि अभ्यास मंडळ प्रतिनिधींसाठी आज निवडणूक होत आहे. तीन जागा अविरोध झाल्याने सिनेटच्या 36 तर दोन जागा अविरोध झाल्याने विद्वत परिषदेच्या सहा जागांसाठी ही निवडणूक होत असून त्यापैकी सिनेटमध्ये 12 तर विद्वत परिषदेमध्ये सर्व सहाही जागांसाठी एकास-एक लढत होत आहे.

मोदी यांची अमरेलीत सभा ( PM Modi meeting in Amreli) : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 नोव्हेंबरला अमरेली येथे सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे मोदी आणि राहुल गांधी दोघेही एकाच मैदानात, एकाच व्यासपीठावरुन सभेला संबोधित करणार आहेत.

अमित शाह आज पुणे दौऱ्यावर (Amit Shah Pune Visit) : करणार शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 20 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान नर्‍हे आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'शिव सृष्टी' या थीम पार्कच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पाची संकल्पना पद्मविभूषण पुरस्कार विजेते बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांची होती.

फिफा विश्वचषकाचा आज पहिला सामना ( FIFA World Cup) : आज फिफा विश्वचषकाचा पहिला सामना पार पडणार आहे. पोलंड फुटबॉल संघ गुरूवारी कतारला पोहोचला आहे. अंतिम सामना 18 डिसेंबरला होणार आहे.

आज दुसरा टी 20 सामना (Second T20 match today) : ऑस्ट्रेलियात झालेल्या T20 विश्वचषकानंतर भारतीय संघ शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्धच्या तीन T20 मालिकेतील पहिला सामना खेळण्यासाठी गेला होता, मात्र पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. दोन्ही संघांचे खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये फुटबॉल खेळून टाइमपास करताना दिसले. आता दुसरा टी-20 सामना 20 नोव्हेंबरला होणार आहे.

आज मध्य रेल्वेचा पावर ब्लॉक (Power Block of Central Railway) : मध्य रेल्वे मुंबई अप आणि डाउन धिम्या मार्गावर, अप आणि डाउन जलद मार्गांवर तसेच अप आणि डाउन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मस्जिद स्टेशन दरम्यान रोड क्रेन वापरून कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परीचालीत करणार आहे. यामुळे अप आणि डाउन धिम्या मार्गावर शनिवार, 19 नोव्हेंबर रात्री 11 वाजेपासून ते रविवार 20 नोव्हेंबर 5 वाजेपर्यंत 17 तासांचा ब्लॉक असणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.