ETV Bharat / bharat

Top News Today : एका क्लिकवर वाचा, दिवसभरातील आजच्या महत्त्वाच्या बातम्या

author img

By

Published : Nov 3, 2022, 6:46 AM IST

आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा (Top News Today) घेवू. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या (Read Important top news) बातम्या वाचा.

Top News Today
आजच्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा (Top News Today) वाचा. आज अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आज विशेष बैठक, आज पुण्यात रोजगार मेळावा, आज दिल्लीत संसद मार्चा , बैलगाडा शर्यत लढ्यासाठी पुण्यात बैठक, या घटना दिवसभरात महत्त्वाच्या असणार आहेत.

आज अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान (Andheri By Election 2022) : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. या पोटनिवडणुकीत एकूण 7 उमेदवार रिंगणात आहेत. दिवगंत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आज विशेष बैठक (meeting of Reserve Bank of India) : सलग नऊ महिने महागाई 2% ते 6% च्या श्रेणीत ठेवण्यात अयशस्वी ठरल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज अतिरिक्त चलनविषयक धोरण बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत आरबीआय महागाई नियंत्रणात न येण्याच्या कारणांशी संबंधित अहवाल सरकारला सादर करणार आहे. सहा वर्षांपूर्वी महागाई-लक्ष्यित चलनविषयक धोरणाचा अवलंब केल्यानंतर ही पहिलीच बैठक होणार आहे.

आज पुण्यात रोजगार मेळावा (Guardian Minister Chandrakant Patil) : पुणे विभागस्तरीय रोजगार मेळाव्याचे पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये शासनाच्या अधिपत्याखालील पुणे विभागातील कार्यालयात निवडीने पात्र ठरलेल्या सुमारे 316 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत. अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

आज दिल्लीत संसद मार्चा (Parliament march in Delhi) : देशात मोदी सरकार सतेत आल्यापासून तरुणाईची घोर निराशा झाली आहे. नोकरीच्या संधी देऊ,प्रत्येक युवकांच्या हाताला रोजगार देऊ, अशा पोकळ गप्पा मारणाऱ्या इव्हेंटबाज आणि जाहिरातबाज सरकारचा हा डाव रोखणे नितांत गरजेचे आहे. याच अनुषंगाने डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया केंद्रीय समितीच्या वतीने आज दिल्ली येथे संसद मार्चाचे आयोजन करण्यात आले आहे.


बैलगाडा शर्यत लढ्यासाठी पुण्यात बैठक (Meeting for bullock cart race) : राज्यातील बैलगाडा शर्यतीवर सुरू राहण्याबाबत न्यायालयीन लढा द्यावा लागणार आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि बैलगाडा संघटना प्रतिनिधी यांची पुण्यातील विधानभवन येथे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार आहे. राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे आज त्यावर मार्गदर्शन करणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.