ETV Bharat / bharat

Top News Today : आजच्या महत्त्वाच्या बातम्या, वाचा एका क्लिकवर

author img

By

Published : Dec 19, 2022, 7:33 AM IST

Updated : Dec 19, 2022, 7:49 AM IST

आज दिवसभरात कोठे काय असणार, आजच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊ (Top News Today in Marathi) या. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर (Read Top News Today ) वाचा.

Top News
महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : राज्याचे हिवाळी अधिवेशन ( State Winter Session ) आजपासून सुर होणार आहे. लोकायुक्त कायद्याचं बील अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. महापुरुषांच्या अपमानाच्या निषेधार्थ आज पंढरपूर बंद असणार आहे. तेसच रिक्षा चालक मालकांचे पुण्यात आंदोलन होणार आहे. तसेच राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर (Read Top News Today ) वाचा.

  • हिवाळी अधिवेशन सुरू : राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुर होणार आहे. लोकायुक्त कायद्याचं बील अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.
  • मविआच्या आमदारांची बैठक : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मविआच्या आमदारांची आज बैठक होणार आहे. नागपूर विधान भवनात सकाळी 10 आणि दुपारी चार वाजता ही बैठक होईल.
  • हिवाळी अधिवेशनात सहा मोर्चे निघणार : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज सहा मोर्चे निघणार आहेत. त्यामध्ये धनगर समाजाचा मोर्चा, विदर्भ जन आंदोलन समितीचा मोर्चा तसेच आशा गटप्रवर्तकांचा मोर्चा महत्त्वाचा ठरणार आहे.
  • आज पंढरपूर बंद : महापुरुषांच्या अपमानाच्या निषेधार्थ आज पंढरपूर बंद असणार. आजा मार्गशीर्ष वद्य एकादशी असून या बंद मुळे भाविकांचे हाल होण्याची शक्यता आहे.
  • होमिओपॅथी डॉक्टर्स अँड विद्यार्थ्यांचा मोर्चा : अंबड चौफुली ते कलेक्टर ऑफिस होमिओपॅथी डॉक्टर्स अँड स्टुडंट्स असोसिएशन पायी मोर्चा काढणार आहेत. सी एच ओ पदभरती प्रक्रियात होमिओपॅथिक डॉक्टरांना समाविष्ट करत नाही तोपर्यंत भरती प्रक्रियाला स्थगिती देण्यासंदर्भात जिल्हाभरातील होमिओपॅथिक डॉक्टरांच्या वतीने आज सकाळी 11वाजता होमिओपॅथिक डॉक्टर्स अँड स्टुडंट्स असोसिएशनच्या वतीने अंबड चौफुली ते कलेक्टर ऑफिस पायी मोर्चा काढणार आहेत.
  • बेळगावात महामेळावा : एकीकरण समितीचा बेळगावात महामेळावा होणार आहे. कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन बेळगावात सोमवारपासुन सुरु होत आहे. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास महाराष्ट्रातील नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. कर्नाटक सरकारने मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश देणार नसल्याच जाहीर केले आहे.
  • रिक्षा चालक मालकांचे पुण्यात आंदोलन : टू व्हिलर प्रवासी वाहतूकीच्या विरोधात कौन्सिल हॉल येथे रिक्षा चालक मालकांचे सकाळी 11.30 वाजता आंदोलन होणार आहे.
  • शुक्ला यांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी : फोन टैपिंग प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठा रश्मी शुक्ला यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी. रश्मी शुक्लांविरोधात तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे हायकोर्टाचे निर्दोश.
  • पार्किंगच्या समस्येवर हायकोर्टात सुनावणी : नवी मुंबईतील पार्किंगच्या समस्येवर हायकोर्टात सुनावणी होईल. आरटीआय कार्यकर्ता संदीप ठाकूर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होईल.
  • पंतप्रधानांनी अर्जेंटिनाचे अभिनंदन केले : 2022 मध्ये तिसऱ्यांदा फुटबॉल विश्वचषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अर्जेंटिनाचे अभिनंदन केले. अर्जेंटिनाचे अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस यांना टॅग करत मोदींनी ट्विट केले की, 'हा सर्वात रोमांचक फुटबॉल सामना म्हणून लक्षात राहील, चॅम्पियनचा मुकुट जिंकल्याबद्दल अर्जेंटिनाचे अभिनंदन केले.
  • मुख्यमंत्री सुखविंदर सिंग यांची पंतप्रधान मोदींसोबत भेट : मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांची ही पहिलीच सभा असेल. सीएम सुखविंदर सिंग सुखू यांची पीएम मोदींसोबतची भेट सौजन्यपूर्ण आहे, पण ते हिमाचलसाठी केंद्राकडूनही सहकार्याचे आवाहन करतील असे मानले जात आहे.
  • गुजरातमध्ये नवनिर्वाचित आमदार घेणार शपथ : गुजरात विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार दोन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील.
  • राजस्थानमध्ये भारत जोडो यात्रेचा शेवटचा टप्पा : काँग्रेस राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये सुरू आहे. आज राहुल राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात भारत जोडो यात्रा करणार आहेत. त्यानंतर ही यात्रा हरियाणात दाखल होईल. त्यादृष्टीने अलवर जिल्ह्यातील मालाखेडा येथे मोठा मेळावा आयोजित केला जाणार आहे.
Last Updated : Dec 19, 2022, 7:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.