ETV Bharat / bharat

Top News Today : दिवसभरात कोठे, काय होणार? आजच्या महत्त्वाच्या घडामोडी , वाचा एका क्लिकवर

author img

By

Published : Nov 18, 2022, 7:24 AM IST

आज दिवसभरात कोठे, काय होणार? देशभरसह राज्यतील महत्त्वाच्या बातम्यांचा अढावा वाचा ( Read Important Top News Today ) एक क्लिकवर. ( Top News Today )

Top News Today
महत्त्वाच्या घडामोडी

मुंबई : आज दिवसभरात कोठे, काय होणार? देशभरसह राज्यतील महत्त्वाच्या बातम्यांचा अढावा वाचा ( Read Important Top News Today ) एक क्लिकवर. ( Top News Today )

शिखर बँक घोटाळा प्रकरणी आज महत्वाची सुनावणी : ( Shikhar Bank scam ) : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील हजारो कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पवारांसह एकूण 75 जणांना दोन वर्षांपूर्वी 'क्लीन चीट' देणाऱ्या मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं याप्रकरणी नव्यानं तपास सुरू केला आहे. तशी माहिती आज इओडब्ल्यूतर्फे मुंबई सत्र न्यायालयात देण्यात आली आहे. यावर आज शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

आजपासून भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात : टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धेनंतर आता पुन्हा एकदा टीम इंडिया (Team India) मैदानात उतरणार आहे. भारतीय क्रिकेट संघ (Team India) सद्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात प्रत्येकी तीन टी-20 आणि एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. दरम्यान यावेळी संघात बऱ्याच युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून काही खेळाडू संघात पुनरागमनही करत आहेत. या सर्वांना घेऊन कुंग फू पांड्या अर्थात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) कर्णधार बनून मैदानात उतरणार आहे. भविष्यातील टी20 सामन्यांच्या दृष्टीनं ही मालिका महत्त्वाची असणार आहे. विशेष म्हणजे भारतीय संघात बदलाची शक्यता असून या मालिकेतून खेळाडूंचा खेळ तपासण्याची संधी बीसीसीआयकडे आहे. भारतीय वेळेनुसार आजचा भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना दुपारी 12 वाजता खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. आजचा हा भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील पहिला टी20 सामना वेलिंग्टनच्या स्काय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) 20 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर : नर्‍हे आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'शिव सृष्टी' (Shiv Srushti) या थीम पार्कच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पाची संकल्पना पद्मविभूषण पुरस्कार विजेते बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांची होती. त्यांना 'शिवशाहीर' बाबासाहेब पुरंदरे म्हणूनही ओळखले जाते. या प्रकल्पासाठी बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांनी महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानची स्थापना केली.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा हेही उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम यांनी सांगितले. अमित शाह यांच्या दौऱ्याची तयारीही जोरात सुरू आहे. राज्य सरकारचे उच्चपदस्थ अधिकारी तयारीचा आढावा घेत आहेत.

दहशतवादविरोधी वित्तपुरवठा विषयक तिसर्‍या मंत्रिस्तरीय परिषदेत पंतप्रधान उद्घाटनपर भाषण करणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी दिल्लीत 'नो मनी फॉर टेरर' या मंत्रिस्तरीय परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) गुरुवारी एका निवेदनात ही माहिती दिली. 18-19 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय परिषदेत सहभागी देश आणि संघटनांना दहशतवादविरोधी वित्तपुरवठा संदर्भात विद्यमान आंतरराष्ट्रीय शासनाच्या प्रभावीतेवर तसेच उदयोन्मुख आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक पावले यावर चर्चा करण्याची संधी मिळेल मोदी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.