ETV Bharat / bharat

Top News Today : दिवसभरात कोठे, काय होणार? आजच्या महत्त्वाच्या घडामोडी , वाचा एका क्लिकवर

author img

By

Published : Nov 14, 2022, 7:06 AM IST

आज दिवसभरात कोठे, काय होणार? देशभरसह राज्यतील महत्त्वाच्या बातम्यांचा अढावा वाचा ( Read Important Top News Today ) एक क्लिकवर. ( Top News Today )

Top News Today
दिवसभरात कोठे, काय होणार

मुंबई : आज दिवसभरात कोठे, काय होणार? देशभरसह राज्यतील महत्त्वाच्या बातम्यांचा अढावा वाचा ( Read Important Top News Today ) एक क्लिकवर. ( Top News Today )

आमदार जितेंद्र आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा : पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४. मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार आहे. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा (MLA Jitendra Avhad to resign) देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या आहे, उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत नाही असे त्यांनी ट्विट (Avhad to resign from MLA due to police case) केले.

भारत जोडो यात्रेचा आज आठवा दिवस : रविवारच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा प्रवास सुरू होणार आहे. आज सकाळी 6.30 वाजता कळमनुरी, हिंगोलीतून पदयात्रेला सुरूवात होणार आहे. तर सायंकाळी 7 वाजता हिंगोलीतील माळहीवरा येथे कॉर्नर सभा होणार आहे आणि त्याच ठिकाणी आजचा मुक्काम असणार आहे.

नामनिर्देशित 12 आमदारांच्या याचिकेसंबंधी आज सुनावणी : विधान परिषदेवरील 12 नामनिर्देशित आमदारांच्या प्रलंबित नियुक्तीसंदर्भातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यातील शीतयुद्धात बारगळलेल्या नियुक्त्या सरकार बदलले तरीही अद्याप प्रलंबितच आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने जुनी यादी रद्द केली असली तरी नव्या नियुक्त्या कधी हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे. त्यासंदर्भात हायकोर्टात दाखल याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

महागाईच्या दराचे आकडे जाहीर होणार : ऑक्टोबरमधील महागाई दराचे आकडे आज सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून जाहीर केले जाणार आहे. सणासुदीच्या काळात महागाई वाढ झाली आहे की सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा मिळाला हे यातून कळणार आहे. दरम्यान, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ऑक्टोबर महिन्यातील महागाई दर 7 टक्क्यांपेक्षा कमी असेल असे भाकीत वर्तवले. त्यामुळे महागाईपासून दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती : आज 14 नोव्हेंबर. म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस (Jawaharlal Nehru Birth Anniversary ) . पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 साली अलाहाबादमध्ये झाला. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण घरी खासगी शिक्षकांकडून घेतले. वयाच्या पंधराव्या वर्षी ते इंग्लंडला गेले आणि हॅरो येथे दोन वर्षे राहिल्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. या विद्यापीठातून त्यांनी विज्ञानात पदवी प्राप्त केली. 1912 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला. विद्यार्थीदशेत असतानाही, परकीय जुलमी राजवटीखालील देशांच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांना रुची होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.