ETV Bharat / bharat

Top News Today : दिवसभरात कोठे, काय होणार? आजच्या महत्त्वाच्या घडामोडी , वाचा एका क्लिकवर

author img

By

Published : Nov 12, 2022, 8:03 AM IST

Updated : Nov 12, 2022, 8:47 AM IST

आजचा दिवसभरात कोठे काय अस्नर, आजच्या आमच्या घडामोडी जानून घेउया किंवा बुलेटिनच्या मधातून. देशभरसह राज्यतील आमचाय बातम्यांचा अधवा वाचा एक क्लिकवर. ( Top News Today )

Top News Today
आजच्या प्रमुख बातम्या

मुंबई : आजचा दिवसभरात कोठे काय अस्नर, आजच्या आमच्या घडामोडी जानून घेउया किंवा बुलेटिनच्या मधातून. देशभरसह राज्यतील आमचाय बातम्यांचा अधवा वाचा एक क्लिकवर. ( Top News Today )

  • HP Assembly Election 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये ( Himachal Pradesh ) विधानसभेच्या 68 जागांसाठी ( Assembly Election ) आज मतदान होत आहे. राज्यातील एकूण 7884 मतदान केंद्रांवर सकाळी 8 आठ वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या 412 उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय सुमारे 56 लाख मतदार घेणार आहेत. या निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये एकूण 55,92,828 मतदार आहेत. यामध्ये 28,54,945 पुरुष तर 27,37,845 महिला मतदार आहेत. याशिवाय 38 तृतीयपंथी मतदारही मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याआधी 2017 हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत 75.57 टक्के मतदान झाले होते.
  • गजानन किर्तीकरांचा शिंदे गटात प्रवेश : शिवसेनेला लागलेली गळती अद्यापही सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुंबईतून शिवसेना नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. गजानन किर्तीकर यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर रविंद्र नाट्य मंदिर येथील एका कार्यक्रमात गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. गजानन किर्तीकर यांचा शिंदे यांना पाठिंबा हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. कारण, पुढील काही दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी आणखी एक खासदाराने पक्ष सोडणं, पक्षासाठी घातक ठरू शकते.
  • बनावट अकाऊंटच्या संख्येत झपाट्याने वाढ : ट्विटर ( Twitter ) कंपनीने पुन्हा एकदा एक मोठा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी ट्विटरवरील ब्लू टिकसाठीच्या ( Twitter Blue Tick ) पेड सबस्क्रिप्शनचा ( Twitter Paid Subscription ) निर्णय रद्द केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ट्विटरने पेड सबस्क्रिप्शन सेवा बंद केली आहे. ही सर्व्हिस सुरु झाल्यापासून बनावट अकाऊंटच्या ( Fake Account ) संख्येत झपाट्याने वाढू लागली होती, त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ब्लू टिक विकत घेण्यासाठी आठ डॉलर मोजावे लागणार नाहीत.
  • एक दिवसीय बिहार दौऱ्यावर : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या 'भारत जोडो' यात्रेवर आहेत. दुसरीकडे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते राज्यांमध्ये आपली मुळे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. बिहार काँग्रेसचे प्रवक्ते राजेश राठोड यांनी सांगितले की, 13 नोव्हेंबर रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश पाटण्यात येत आहेत. काँग्रेसच्या प्रवक्त्याने असेही सांगितले की, याशिवाय बिहार काँग्रेसचे प्रभारी भक्त चरण दास यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते 13 नोव्हेंबरला एक दिवसीय बिहार दौऱ्यावर येत आहेत.
Last Updated : Nov 12, 2022, 8:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.