ETV Bharat / bharat

Top News Today : दिवसभरात कोठे, काय होणार? आजच्या महत्त्वाच्या घडामोडी , वाचा एका क्लिकवर

author img

By

Published : Nov 11, 2022, 7:15 AM IST

आज दिवसभरात कोठे काय असणार, आजच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया या बुलेटीनच्या माध्यमातून. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर. (Read Top News Today )

Top News Today
आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

मुंबई : आज दिवसभरात कोठे काय असणार, आजच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया या माध्यमातून. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर. (Read Top News Today )

  • संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी : शिवसेना खासदार संजय राऊतांचा (Sanjay Raut) जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर आज (11 नोव्हेंबर) हायकोर्टात सुनावणी होणार आहे. गुरुवारी वेळेअभावी ही सुनावणी होऊ झाली नव्हती. संजय राऊत यांचा जामीन रद्द व्हावा अशा आशयाची याचिका ईडीने (ED) उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी होणार आहे. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत पीएमएलए कोर्टानं ईडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहे. दिवाणी खटल्यासाठी पीएमएलए कायदा लागू केला असल्याचे ताशेरे कोर्टाने ओढले आहेत.
  • भारत जोडो यात्रेचा आज राज्यात पाचवा दिवस ( Bharat Jodo Yatra ) : राहुल गांधींनी सुरू केलेल्या पदयात्रेचा आज 64 वा आणि महाराष्ट्रातला आज पाचवा दिवस आहे. सकाळी 6 वाजल्यापासून राहुल गांधी पदयात्रेला नांदेडच्या लोहा येथून सुरूवात करतील. दुपारी 4 वाजता देगलूर नाका येथून पुन्हा पदयात्रेला सुरूवात होईल. संध्याकाळी 6 वाजता न्यू मुंडा मैदान येथे राहुल गांधीची सभा होणार आहे. राष्ट्रवादीचे जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार आज यात्रेत सहभागी होणार आहेत.
  • पंतप्रधान आज कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला दौऱ्यावर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) 11 आणि 12 नोव्हेंबर 2022 रोजी कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला भेट देतील. आज सकाळी 9:45 वाजता पंतप्रधान महर्षी वाल्मिकी आणि संत कवी श्री कनक दास यांच्या विधान सौधा, बेंगळुरू येथील प्रतिमांना पुष्पहार अर्पण करतील. सुमारे 10:20 वाजता, पंतप्रधान बेंगळुरूमधील KSR रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेस आणि भारत गौरव काशी दर्शन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. पंतप्रधान केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 चे सकाळी 11:30 वाजता उद्घाटन करतील. यानंतर दुपारी 12 वाजता पंतप्रधान नादप्रभू केम्पेगौडा यांच्या 108 फूट कांस्य पुतळ्याचे अनावरण केले जाईल, त्यानंतर दुपारी 12:30 वाजता बेंगळुरूमध्ये सार्वजनिक कार्यक्रम होईल. दिंडीगुल, तामिळनाडू येथे गांधीग्राम ग्रामीण संस्थेच्या ३६ व्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधान दुपारी साडेतीन वाजता उपस्थित राहतील.
  • iPhone मध्ये 5G सुरु, तुमच्या आयफोनमधील अपडेट करा चेक : आयफोन युजर्ससाठी चांगली बातमी आहे. ॲपल कंपनीने युजर्ससाठी 5 सर्व्हिस लाँच केली आहे. पण सध्या ही सेवा काही ठराविक मॉडेल्ससाठी मर्यादित आहे. ॲपल कंपनीने काही आयफोन मॉडेल्ससाठी नवीन 5G अपडेट जारी केलं आहे. हे अपडेट सध्या आयफोन 14, आयफोन 13, आयफोन 12 आणि आयफोन SE या मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. कंपनीच्या या नव्या अपडेटमुळे या एअरटेल आणि जिओ युजर्सना त्यांच्या आयफोनमध्ये 5G नेटवर्क वापरता येणार आहे.
  • वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आज आंदोलन : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भातील खासदारांच्या घरासमोर विदर्भवाद्यांकडून आज घेराव घातला जाणार आहे. नागपुरात केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या घराजवळही विदर्भवादी आंदोलन करणार आहेत. चंद्रपुरात वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी खासदार बाळू धानोरकर यांच्या घरासमोर आंदोलन होणार आहे.
  • अजित पवार आज तळेगाव दाभाडे येथील कार्यक्रमांना उपस्थिती लावणार : राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार पुण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. त्यांच्या हस्ते तळेगाव दाभाडे येथे टीजीएच ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटरचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर इंद्रायणी भात खरेदीचा शुभारंभ त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. अजित पवार शिर्डी अधिवेशनात शरद पवार आले त्यादिवशी उपस्थित नव्हते. तसेच सुप्रिया सुळेंबाबत सत्तारांनी केलेल्या वक्तव्यावरही ते बोलले नव्हते. त्यानंतर ते प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत.
  • जॅकलिनच्या नियमित जामीन अर्जावर आज निकाल : सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या नियमित जामीन अर्जावर आज निकाल लागणार आहे. याप्रकरणी गुरुवारी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली. या दरम्यान ईडीने सांगितले की, जॅकलिनविरोधात पुरेसे पुरावे आहेत, त्यामुळे तिला नियमित जामीन देऊ नये.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.