ETV Bharat / bharat

Top News Today : दिवसभरात कोठे काय असणार आज महत्त्वाच्या घडामोडी , वाचा एका क्लिकवर

author img

By

Published : Nov 7, 2022, 7:49 AM IST

आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेवू या. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. (Read Top News Today )

Top News Today
महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

मुंबई : आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेवू या. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. (Read Top News Today )

  1. 103 वी घटनादुरुस्ती वैध की अवैध? : मोदी सरकारने (Modi Government) दिलेल्या दहा टक्के आर्थिक आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज निर्णय येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दीर्घ सुनावणी केल्यानंतर हा निकाल राखून ठेवला होता. 103 वी घटनादुरुस्ती वैध की अवैध? याचा निर्णय आज होणार आहे.

2. काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात दाखल : राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता राहुल गांधी मशाल घेऊन नांदेडमध्ये येणार आहे. भारत जोडो यात्रेचा 14 दिवस महाराष्ट्रात मुक्काम असेल. काँग्रेस नेते अशोक चव्हाण, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत भारत जोडो यात्रेबद्दल माहिती दिली. भारत जोडो या यात्रेची महाराष्ट्रातील जबाबदारी अशोक चव्हाण यांच्याकडे आहे.

3.भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने : टी20 विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2022) सुरु झाल्यापासून अगदी रंगतदार सामना पाहायला मिळत आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सलामीच्या सामन्यात झालेला चुरशीचा खेळ, मग झिम्बाब्वेने पाकिस्तानला मात दिली, आयर्लंडने इंग्लंडला नमवले. अशा बऱ्याच हायवोल्टेज सामन्यानंतर आता स्पर्धेची फायनलही तुफान रंगतदार होऊ शकते आणि जागतिक क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) पुन्हा आमने-सामने येऊ शकतात.

4. सिल्लोडमध्ये आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदेंची सभा : सिल्लोडमध्ये आज आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदेंची एकाचवेळी सभा होणार आहे. आदित्य ठाकरे संध्याकाळी सहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील मोकळ्या जागेत शेतकऱ्यांशी संवाद साधतील. तर श्रीकांत शिंदेंची सायंकाळी चार वाजता सिल्लोडच्या जिल्हा परिषद ग्राउंडवर सभा होणार आहे.

5. चित्रा वाघ यांचा महाराष्ट्र दौरा : भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चित्रा वाघ यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून सुरुवात होणार आहे. बुलडाण्याच्या सिंदखेडराजा येथे जिजाऊंना अभिवादन करुन आज या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. तसेच त्या महिला मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी दहा वाजता चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.