ETV Bharat / bharat

Asia Cup 2023 : आशिया चषकबाबत रविचंद्रन अश्विनचं मोठं वक्तव्य.. म्हणाला 'या' देशात खेळवा आशिया चषकाचे सामने

author img

By

Published : Feb 8, 2023, 7:54 AM IST

आशिया चषक पाकिस्तानबाहेर आयोजित करण्याबाबतचा निर्णय मार्चमध्ये घेतला जाईल. परंतू त्याआधी अनेकांकडून त्यावर विविध भाष्य केली जात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव भारताला आशिया चषकासाठी पाकिस्तानात जायचे नाही. त्यामुळे आशिया क्रिकेट परिषद आशिया चषक स्पर्धेचे ठिकाण बदलण्याचा विचार करत आहे. त्यावर रविचंद्रन अश्विननेही त्याचे मत मांडले आहे.

Asia Cup 2023
Asia Cup 2023

नवी दिल्ली : आशिया चषकाच्या यजमानपदावरून पेच अडकला आहे. यजमानपद वाचवण्यासाठी पाकिस्तानने 4 फेब्रुवारी रोजी आशिया क्रिकेट परिषदेची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत आयसीसीचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते. ज्यामध्ये आशिया चषक यजमानपदाबाबतचा निर्णय मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. आता गोलंदाज रविचंद्रन अश्विनने यावर आपले मत मांडले आहे.

निर्णय लवकरच होणार : आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पाकिस्तानने मैदान बदलण्याची मागणी केली होती. पण बीसीसीआय पाकिस्तानात न जाण्याच्या निर्णयावर ठाम आहे. आशिया चषक स्पर्धेच्या ठिकाणाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र त्याचे आयोजन पाकिस्तानबाहेर होणार हे निश्चित आहे. असे मानले जाते की ते यूएईमध्ये आयोजित केले जाऊ शकते. मार्चमध्ये आशिया क्रिकेट परिषदेची पुन्हा बैठक होणार असून त्यात निर्णय घेतला जाणार आहे.

रविचंद्रन अश्विनचे मत : यावेळी आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे असले तरी टीम इंडियाला तिथे जाऊन आशिया कप खेळण्याची इच्छा नाही. आता आशिया चषक स्पर्धेचे आयोजन कुठे करायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गोलंदाज रविचंद्रन अश्विननेही यावर आपले मत व्यक्त केले आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने त्याचे मत मांडले 'पाकिस्तान भारतात क्रिकेट खेळायला जाणार नाही, अशी विधाने याआधी पाकिस्तानकडून यायची. अशा परिस्थितीत स्पर्धा इतरत्र हलवाव्या लागायच्या. भारतालाही पाकिस्तानमध्ये खेळायचे नसेल, तर मैदान बदलले जायचे. त्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आशिया कप श्रीलंकेत व्हावा, अशी माझी इच्छा आहे, असे गोलंदाज रविचंद्रन अश्विनने म्हटले आहे.

16 वा आशिया कप : श्रीलंका हा आशिया कपचा सध्याचा प्रबळ दावेदार आहे. 2022 च्या फायनलमध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंनी पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव केला होता. भारत सात वेळा आशिया कपचा विजेचा ठरला आहे. 16 व्या आशिया कपची सध्या जोरदार चर्चा आहे. मात्र ती कुठे होणार याबाबत साशंकता आहे. मात्र, अशा परिस्थीतीत आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानच्या हातून नक्कीच हिसकावले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जावेद मियाँदादला चोखप्रत्यूत्तर : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद एक वक्तव्य केले होते. जर भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळायला यायचे नसेल तर तो नरकात जाऊ देत आपण आपले आपले खेळू. त्यावर आशिया चषक श्रीलंकेला नेण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. आत्तापर्यंत दुबईमध्ये अनेक स्पर्धा झाल्या आहेत. श्रीलंकेला नेले तर मलाही आनंद होईल.” असे रविचंद्रन अश्विनने म्हटले आहे.

हेही वाचा : Abu Dabhi open tournament : सानिया मिर्झा अबू धाबी ओपनच्या पहिल्या फेरीत बाहेर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.