ETV Bharat / bharat

रत्नागिरीतील व्यक्तीला 97 लाख रुपयांसह राजस्थानमध्ये अटक, हवालाची रक्काम असल्याचा अंदाज

author img

By

Published : Apr 21, 2023, 7:57 PM IST

Updated : Apr 22, 2023, 7:50 AM IST

राजस्थानमधील जीआरपी पोलिस स्टेशनने एका व्यक्तीकडून 97 लाख रुपये जप्त केले. ही रक्कम हवालाची असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अटक करण्यात आलेली व्यक्ती महाराष्ट्रातील रत्नागिरीची रहिवासी असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

आरोपी आणि रकमेसह पोलीस
आरोपी आणि रकमेसह पोलीस

कोटा (राजस्थान) - जीआरपी पोलिसांनी ९७ लाख रुपयांसह एकाला पकडले आहे. ही रक्कम हवालाची असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. संशयास्पद रक्कम सापडल्यामुळे यासंबंधित तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याची चौकशी करण्यात येत आहे. ही संपूर्ण रक्कम कलम 102 अंतर्गत जप्त करण्यात आली आहे.

रेल्वे जंक्शनवर जीआरपी पोलिसांनी 97 लाख रुपयांसह एका व्यक्तीला सुरुवातीला पकडले आहे. ही रक्कम हवाला असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या तरुणाला पोलिसांनी नंतर अटक केली आहे. तसेच त्याची यासंदर्भात कसून चौकशी करण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई रात्री उशिरा 1 वाजता करण्यात आली. हा तरुण कोटाहून मुंबईला रेल्वेने जाण्याचा प्रयत्न करत होता. यासोबतच जीआरपी पोलिसांनी संपूर्ण माहिती प्राप्तिकर विभागाला दिली आहे. जीआरपी पोलिस स्टेशनचे अधिकारी मनोज सोनी यांनी सांगितले की, आरोपी 31 वर्षीय नीलेश नारायण येद्रे असून तो महाराष्ट्रातील रत्नागिरीचा रहिवासी आहे.

कारवाईबाबत त्यांनी सांगितले की, जीआरपी पोलिसांचे पथक स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर गस्त घालत होते. नीलेशला संशयावरून थांबवण्यात आले. त्याच्याकडे असलेल्या बॅगच्या कप्प्यामध्ये बरीच रोख रक्कम होती. ही रक्कम मोजून एकूण हिशेब केला असता ही रक्कम 97 लाख रुपये असल्याचे समोर आले आहे. मात्र, आरोपी नीलेश याबाबत काहीही सांगत नाही. तो म्हणतो की ही रक्कम तो मुंबईत घेऊन जात होता आणि ही रक्कम कोटातील एका व्यावसायिकाची होती. मात्र, आता ही रक्कम कोणत्या व्यापाऱ्याची आहे आणि ती कोणत्या वापरासाठी नेण्यात येणार होती, याचा तपास जीआरपी पोलिस ठाणे करत आहेत. नीलेशच्या म्हणण्यानुसार पोलीस त्या व्यावसायिकाचीही चौकशी करू शकतात.

यासंदर्भातील माहिती आयकर विभागालाही देण्यात आली आहे. सध्या पोलिसांनी संपूर्ण रक्कम जप्त केली आहे. पोलीस अधिकारी मनोज सोनी यांनी सांगितले की, नीलेश नारायण येद्रे यांच्या खिशातून कोणत्याही प्रकारचे तिकीट सापडले नाही, परंतु चौकशीत त्याने मुंबईला जात असल्याचे सांगितले. सोनी यांनी असेही सांगितले तो यापूर्वीही अशा प्रकारे पैसे घेत होता का, याचाही तपास करण्यात येणार आहे.

हेही वाचा - Satya Pal Malik summoned by CBI : सत्यपाल मलिक यांना CBI चे समन्स, 28 एप्रिल रोजी चौकशीसाठी बोलावले

Last Updated : Apr 22, 2023, 7:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.