ETV Bharat / bharat

Ram Navami 2023 रामाची अनोखी बँक: भाविकांना रामनामाचा जप करण्याकरिता दिले जाते कर्ज, 96 वर्षांपासून चालते कामकाज

author img

By

Published : Mar 30, 2023, 1:24 PM IST

वाराणसीमध्ये राम नावाची एक अनोखी बँक आहे. या बँकेत जगभरातील लोकांनी आपली खाती उघडली आहेत. रामनवमीला येथे मोठ्या संख्येने लोक येतात. रामनवमीनिमित्त या बँकेविषयी अधिक सविस्तर जाणून घ्या.

जपाचा संग्रह
जपाचा संग्रह

भाविकांना रामनामाचा जप करण्याकरिता दिले जाते कर्ज

वाराणसी : तुम्हाला आर्थिक व्यवहार करणाऱ्या बँकांची माहिती असेल, पण वाराणशीमध्ये राम नावाची अनोखी बँक आहे. या बँकेत पैसे नाही, तर भाविक राम नामाचा जप लिहिलेल्या वह्या जमा करतात. देशभरातून भाविक येथे रामनवमीला येथे येतात. या बँकेत 19 अब्जांहून अधिक राम नाम जपाचा संग्रह आहे. जगभरातील भाविक या बँकेचे खातेदार आहेत. ही बँक लोकांना संसारात आणि मोक्ष मिळविण्यासाठी मदत करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

जपाचा संग्रह
जपाचा संग्रह

96 वर्षांपासून चालविली जाते बँक: वाराणसीमधील त्रिपुरा भैरवी परिसरात राम रमापती बँक ही कार्यरत आहे. तुम्हाला रामाच्या नावावर कर्ज मिळते. ही बँक श्री काशी विश्वनाथ मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. ही बँक मेहरोत्रा ​​कुटुंबीयांकडून 96 वर्षांपासून चालविली जात आहे. नेहमीच्या बँकेप्रमाणेदेखील या बँकेत विविध पदे आहेत. दास कृष्ण चंद्र येथे सध्या व्यवस्थापकाची भूमिका बजावित आहेत. दिवसेंदिवस बँकेच्या खातेदारांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रामनामाचा संग्रहदेखील वाढत आहे.

लाल बहादूर शास्त्री यांच्या कुटुंबियांनीही उघडले खाते खातेदार स्वतःच्या इच्छेने येथे खाते उघडतात, त्यासाठी त्यांना कोणताही आग्रह करण्यात येत नाही. भगवान रामललाला तुमची इच्छा सांगितल्यानंतर, तुम्ही जप सुरू करू शकता. लाल बहादूर शास्त्री यांच्या आई आणि सिनेस्टार शत्रुघ्न सिन्हा यांच्या कुटुंबीयांनीही यापूर्वी येथे खाते उघडले होते. रामनवमीच्या दिवशी 1926 मध्ये बाबा सत्यराम दास यांच्या सूचनेनुसार दास छन्नूलाल यांनी या बँकेची स्थापना केली होती. तेव्हापासून आजतागायत राम नावाची ही जगभरात अनोखी असणारी बँक कार्यरत आहे. बँकेचे खातेदार केवळ भारताच नाही, तर कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, जपान यांसारख्या देशात आहेत. बँकेचे फेस्टिव्हल मॅनेजर सुमित मेहरोत्रा ​​म्हणाले, ही रामाच्या नावावर असलेली बँक आहे, लाखो सनातनी लोक या बँकेशी जोडले गेले आहेत. रामाची 19 अब्ज, 42 कोटी, 34 लाख, 25 हजार हस्तलिखित राम जप येथे जमा आहेत. बँकेच्या खातेदार मीरा देवी यांनी सांगितले की, इच्छा पूर्ण करण्यासाठी एक-दोनदा नव्हे तर अनेक वेळा राम नामाचा जप केला आहे. प्रत्येक वेळी प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद लाभला आहे.

काय आहेत बँकेत खाते काढण्याचे नियम-

  • बँकेची लोकप्रियता वाढत असताना तरुणांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. बँकेत खाते उघडण्यासाठी काही नियमदेखील आहेत.
  • रामाचे नाव लिहिण्यासाठी बँकेच्या बाजूलाच किलविश वृक्षाची काठी दिली जाते.
  • ब्राह्म मुहूर्तावर अर्था पहाटे 4 ते 7 या वेळेतच रामाचे नाव लिहावे लागते. 1.25 लाख राम असे नाव लिहून 8 महिने 10 दिवसात जमा करायचे असते.
  • या दरम्यान कांदा, लसूण आणि बाहेरील अन्न खाऊन सात्विक आहार घ्यावा लागतो.

हेही वाचा-Ram Navami 2023 : काय आहे रामनवमीचा इतिहास, का साजरी करण्यात येते रामनवमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.