ETV Bharat / bharat

राहुल गांधी हे ड्रग पेडलर, कर्नाटक भाजपा अध्यक्षाचे वादग्रस्त वक्तव्य

author img

By

Published : Oct 19, 2021, 6:10 PM IST

Updated : Oct 19, 2021, 6:52 PM IST

राहुल गांधी एक ड्रग पेडलर आहेत. असे मी म्हणत नाही, तर मीडिया म्हणत आहे, असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटक भाजपा अध्यक्ष नलीन कुमार कातिल यांनी केले आहे.

कर्नाटक भाजपा काँग्रेस
कर्नाटक भाजपा काँग्रेस

हुबळी (कर्नाटक) - काँग्रेस नेते राहुल गांधी हे ड्रग पेडलर आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटक भाजपा अध्यक्ष नलीन कुमार कातिल यांनी केले आहे. ते हुबळीमध्ये बोलत होते. या वक्तव्याचे पडसाद उमटत असून काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे. विरोधकांवर टीका करतानाही तारतम्य बाळगायला हवे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

हेही वाचा - राहुल गांधींची इच्छा नसेल तर काँग्रेसचे अध्यक्षपद प्रियंका गांधींनी स्वीकारावे, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याची इच्छा

राहुल-सोनियांवर हल्लाबोल

सोनिया तसेच राहुल गांधी यांना आपला पक्ष सांभाळता येत नाही आणि असे लोक आपल्या पंतप्रधानांवर टीका करतात. पक्ष म्हणून काँग्रेस अस्तित्वाची लढाई लढत आहे. दुसरीकडे आपल्या पंतप्रधानांनी सात वर्षांच्या राजवटीत एक मजबूत राष्ट्र उभारले आहे. त्यांनी चीन आणि पाकिस्तानसारख्या शेजारी देशांनाही चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यांच्यामुळे भारताला जगात मानाचे स्थान आहे. आपल्या पंतप्रधानांना जगभरात आदराचे स्थान आहे. तर राहुल गांधी एक ड्रग पेडलर आहेत. असे मी म्हणत नाही, तर मीडिया म्हणत आहे, असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटक भाजपा अध्यक्ष नलीन कुमार कातिल यांनी केले आहे.

हेही वाचा - CWC Meeting : काँग्रेस अध्यक्ष पदाकरिता पुन्हा गांधींच्या नावाचा प्रस्ताव; राहुल म्हणाले, विचार करेन!

असंसदीय भाषेचा काँग्रेसकडून निषेध

  • Yesterday I said I believe we should be civil and respectful in politics, even to our opponents. I hope the BJP agrees with me, and will apologise for their state president’s abusive and unparliamentary remarks against Shri Rahul Gandhi.@RahulGandhi

    — DK Shivakumar (@DKShivakumar) October 19, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काँग्रेसचे कर्नाटक अध्यक्ष डी. के शिवकुमार यांनी नलीन कुमार यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. ट्विट करत ते म्हणाले, की माझा विश्वास आहे, की आपण राजकारणात मितभाषी असायला हवे. विरोधकांसाठीही आपण योग्य भाषेचा वापर करायला हवा. माझ्या वक्तव्याशी भाजपा सहमत असेल अशी आशा आहे. कर्नाटक भाजपाच्या अध्यक्षांनी राहुल गांधींविषयी वापरलेल्या असंसदीय भाषेचा निषेध. याविषयी त्यांनी माफी मागायला हवी.

Last Updated : Oct 19, 2021, 6:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.