ETV Bharat / bharat

Protesters To Be Arrested : नुपूर शर्मांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांच्या अटकेचे कुवैत सरकारचे आदेश

author img

By

Published : Jun 13, 2022, 10:30 AM IST

मोहम्मद पैगंबरांसदर्भात भाजपच्या निलंबित प्रवक्या नुपूर शर्मा ( Nupur Sharma ) यांनी कथित वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याविरोधात कुवैतमध्ये आंदोलन ( Protests in Kuwait ) करणाऱ्या विदेशी नागरिकांनी ( Foreign Nationals ) आंदोलन केले. या आंदोलकांना अटक करून मायदेशी पाठविण्याचे ( arrested-and-deported ) आदेश कुवैत सरकारने दिले आहेत. या आंदोलकांमध्ये भारतीय मुस्लिम देखील आहेत. कुवैतच्या कायद्यानुसार त्या देशात राहणाऱ्या विदेशी नागरिकांना कोणतेही आंदोलन करण्याचा अधिकार नाही. असे कृत्य कुवैतमध्ये कायद्याचे उल्लंघन ठरते.

Nupur Sharma
Nupur Sharma

दिल्ली - मोहम्मद पैगंबरांसदर्भात भाजपच्या निलंबित प्रवक्या नुपूर शर्मा ( Nupur Sharma ) यांनी कथित वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याविरोधात कुवैतमध्ये आंदोलन ( Protests in Kuwait ) करणाऱ्या विदेशी नागरिकांनी ( Foreign Nationals ) आंदोलन केले. या आंदोलकांना अटक करून मायदेशी पाठविण्याचे ( arrested-and-deported ) आदेश कुवैत सरकारने दिले आहेत. या आंदोलकांमध्ये भारतीय मुस्लिम देखील आहेत. कुवैतच्या कायद्यानुसार त्या देशात राहणाऱ्या विदेशी नागरिकांना कोणतेही आंदोलन करण्याचा अधिकार नाही. असे कृत्य कुवैतमध्ये कायद्याचे उल्लंघन ठरते.

कुवैतमधून हद्दपार करणार - आंदोलन करणाऱ्या नागरिकांना कुवैत सरकारने अटकेचे आदेश दिले आहेत. त्यासोबतच या सर्व नागरिकांना देशाच्या कायद्यानुसार कुवैतमधून हद्दपार केले जाणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. कुवैतमध्ये झालेल्या आंदोलनाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कुवैत सरकार या सर्व लोकांना अटक करण्याची प्रक्रिया पूर्ण करीत आहे. कतर येथील निर्वासन केंद्र या सर्व लोकांच्या हद्दपारीसंदर्भात कार्यवाही करीत आहे. या सर्वांना पुन्हा कधीही कुवैतमध्ये प्रवेश मिळणार नाही.

कायद्याचा मान ठेवा - कुवैत सरकारचे म्हणणे आहे की, सर्वांनी आमच्या देशाच्या कायद्याचा मान ठेवावा. विदेशी नागरिकांना आंदोलनांची परवानगी आमचा कायदा देत नाही. त्यामुळे त्यांनी आंदोलनांमध्ये सहभागी होऊ नये. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई आमच्या कायद्यानुसार केली जाते. नुपूर शर्मा यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्यावर सर्वच मुस्लिम देशांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. कुवैत सरकारनेही या वक्तव्याचा निषेध केला आहे. तेथील भारतीय राजदूत सीबी जॉर्ज यांना बोलावून या वक्तव्याचा निषेध करणारे पत्र देण्यात आले होते. तथापि, भारतीय जनता पार्टीने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले, त्याचेही कुवैत सरकारने स्वागत केले होते.

हेही वाचा - 'राष्ट्रपती निवडणुकीनंतर महाराष्ट्र, पश्चिम बंगालमधील सरकार बरखास्त होणार'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.