ETV Bharat / bharat

UP Election 2022 : पाहा, उत्तरप्रदेशात कोणी किती केला प्रचार?

author img

By

Published : Mar 9, 2022, 3:39 PM IST

up election 2022
भाजपच्या प्रचाराचा आकडा

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 10 मार्चला (Five State Assembly Election 2022 Result) जाहीर होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. सर्वच पक्षांसाठी उत्तरप्रदेश निवडणूक महत्त्वाची (Uttar Pradesh Assembly Election 2022) होती. पंतप्रधान मोदी यांनी 31, अमित शाह यांनी 61 तर मुख्यमंत्री योगींनी 200 हून अधिक सभा घेतल्या. तसेच अखिलेश यादव, प्रियंका गांधी यांनीही 400 हून अधिक सभा घेतल्या आहेत.

हैदराबाद - पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 10 मार्चला (Five State Assembly Election 2022 Result) जाहीर होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. सर्वच पक्षांसाठी उत्तरप्रदेश निवडणूक महत्त्वाची (Uttar Pradesh Assembly Election 2022) होती. उत्तरप्रदेशात 403 जागांसाठी मतदान झाले असून, 10 मार्चला निकाल लागणार आहे. दरम्यान, निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी हजारोंच्या संख्येने प्रचार सभा, रॅली, बैठका घेत प्रचाराचा धुराळा उडवून दिला होता.

  • यूपीत पंतप्रधान मोदींच्या 31 सभा, तर शहांच्या 61 रॅली -

यूपी विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या उमेदवारांच्या बाजूने वातावरण तयार करण्यासाठी सुमारे 31 रॅली आणि रोड शो केले. त्यांनी 21 जानेवारी ते 5 मार्चपर्यंत झंझावात प्रचार केला. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान मोदींनी 5 ऑनलाइन रॅलींनाही संबोधित केले होते. बस्ती, महाराजगंज, अमेठी, प्रयागराज, बहराइच, हरदोई, पूर्वा, उन्नाव, रायबरेली, बिजनौर, सहारनपूर, बागपत, शामली, मुझफ्फरनगर, नोएडा, सीतापूर, हरदोई, कानपूर, वाराणसी, गाझीपूर, बलिया, मिर्झापूर आणि जौनपूर जिल्ह्यात पंतप्रधान मोदी रॅलींना संबोधित केले.

bjp
भाजपच्या प्रचाराचा आकडा
  • योगी आदित्यनाथांनी तब्बल 200 हून अधिक सभांना केले संबोधित -

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 2022 च्या निवडणूक प्रचारात सर्वाधिक सभा घेतल्या, त्यांनी राज्यभरात सुमारे 204 सभा आणि रॅली घेतल्या. यानंतर उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी 100 हून अधिक रॅली आणि सभा घेतल्या, तर उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांनी सुमारे 75 जाहीर सभांना संबोधित करून पक्षाच्या उमेदवारांच्या बाजूने वातावरण निर्माण केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुमारे 61 रॅली आणि रोड शो केले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सुमारे 31 रॅली आणि रोड शोद्वारे उमेदवारांचा प्रचार केला.

  • 500 हून अधिक सभा, रॅलीद्वारे प्रियंका गांधींनी केला प्रचार -

काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिवर प्रियंका गांधी यांनीही उत्तरप्रदेशात जोरदार प्रचार केला. डोअर-टू-डोअर, रॅली, सभा, रोड शो घेत प्रियंका गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. प्रियंका गांधी यांनी जवळपास 500हून अधिक रॅली, जाहीर सभा, व्हर्च्यु्अल सभा, गावोगाव बैठका घेत प्रचाराचा सपाटा लावला होता. प्रियंका गांधी यांनी 42 रोड शो, 167 रॅली, 291 हून अधिक ऑनलाईन पद्धतीने रॅली, तसेच 340 हून अधिक विधानसभा क्षेत्रामध्ये प्रियंका गांधी यांनी बैठका घेत प्रचार केला होता. या प्रचारादरम्यान लखीमपूर खैरी येथे जाण्यास प्रियंका गांधी मात्र यावेळी विसरल्याचे पाहायला मिळाले.

  • राकेश टिकैत यांचा निकालावर प्रभाव?

भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष व शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी उत्तरप्रदेशात भाजपविरोधात जोरादार प्रचार केला आहे. लखनौ, प्रयागराज, मेरठसह 15 जिल्ह्यांमध्ये टिकैत यांनी सभा घेतल्या. मुख्य जिल्ह्यांमध्ये 20 पेक्षा अधिक बैठका आणि पत्रकार परिषद घेत भाजपविरोधात टिकैत यांनी प्रचार केला आहे. त्यामुळे जवळपास 60 विधानसभा जागांवर टिकैत यांना प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.