ETV Bharat / bharat

Kantar Report About Job And Inflation : चारपैकी एका भारतीयाला आहे नोकरी गमावण्याची भीती, कंटार कंपनीचा रिपोर्ट

author img

By

Published : Jan 25, 2023, 6:00 PM IST

Updated : Jan 25, 2023, 7:34 PM IST

वर्ष 2023 मध्ये कंपन्या ज्या प्रकारे टाळेबंदी करत आहेत. त्यामुळे नोकरी जाण्याची भीती बहुतांश लोकांच्या मनात घर करून बसली आहे. मार्केटिंग डेटा आणि ॲनालिटिक्स कंपनी कंतारने नुकतेच एक सर्वेक्षण केले आहे, ज्यामध्ये असे आढळून आले आहे की, चारपैकी एक भारतीयाला नोकरी गमावण्याची भिती आहे. त्याचवेळी 75 टक्के लोक महागाईमुळे चिंतेत आहेत. या रिपोर्टमध्ये आणखी काय म्हंटले आहे ते जाणून घेऊया.

Kantar Report About Job And Inflation
कंटार कंपनीचा रिपोर्ट

नवी दिल्ली : प्रत्येक चार भारतीयांपैकी एकाला (25 टक्के) नोकरी गमावण्याची भिती आहे. तर चारपैकी तीन भारतीय (७५ टक्के) वाढत्या महागाईमुळे चिंतेत आहेत. असे असूनही, सुमारे निम्म्या लोकांचा असा विश्वास आहे की 2023 मध्ये देशाची अर्थव्यवस्था सुधारेल आणि वाढेल. मार्केटिंग डेटा आणि ॲनालिसिस कंपनी कंटारने केलेल्या सर्वेक्षणात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 'इंडिया जनरल बजेट सर्व्हे'च्या दुसऱ्या आवृत्तीत, कंटार कंपणीला असे आढळून आले की, ग्राहक आयकराच्या संदर्भात धोरणात्मक बदलांच्या घोषणेची अपेक्षा करत आहेत. ज्यामध्ये सध्याची मूळ आयकर सूट मर्यादा 2.5 लाख रुपये आहे, ती सामान्य आहे; ती वाढवणे गरजेचे आहे, असे देखील अनेकांचे म्हणणे आहे.

50 टक्के सकारात्मक : 50 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की 2023 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था वाढेल. कांतरच्या मते, 'बहुतांश लोकांची विचारसरणी सकारात्मक आहे. 50 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, 2023 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था वाढेल. त्याचा वेग कमी होईल असे 31 टक्के लोकांना वाटते. 54 टक्के असलेल्या महानगरांपेक्षा लहान शहरांमधील समज अधिक सकारात्मक आहे. तथापि, जागतिक आर्थिक मंदी आणि कोविड-19 चे पुनरुत्थान होण्याची शक्यता भारतीयांना सतावत आहे. अहवालानुसार, 'चार पैकी तीन लोक वाढत्या महागाईबद्दल चिंतित आहेत आणि सरकारने याला सामोरे जाण्यासाठी निर्णायक पावले उचलावीत अशी त्यांची इच्छा आहे.'

नोकरी गमवण्याची भीती : सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, 'चार भारतीयांपैकी एकाला नोकरी गमवण्याची भीती वाटते. श्रीमंतांमध्ये (32 टक्के), 36-55 वयोगटातील (30 टक्के) आणि पगारदार वर्गात (30 टक्के) हे प्रमाण तुलनेने जास्त आहे.' आगामी अर्थसंकल्पाकडून अपेक्षांच्या संदर्भात, सर्वेक्षण असे आढळले की ग्राहक आयकर संबंधित धोरणातील बदलांच्या घोषणेची वाट पाहत आहे. त्यात म्हटले आहे, 'बहुतेकांनी मूळ आयकर सवलत मर्यादा सध्याच्या 2.5 लाख रुपयांवरून वाढवणे अपेक्षित आहे. याशिवाय, ग्राहकांना सर्वाधिक 30 टक्के कर दराची मर्यादा (विद्यमान रु. 10 लाखांवरून) वाढवायची आहे. पहिली मागणी पगारदार वर्गात सर्वाधिक ४२ टक्के आहे. व्यापारी/स्वयंरोजगार श्रेणी (३७ टक्के) आणि ३६-५५ वयोगटात (४२ टक्के) नंतरची अपेक्षा जास्त आहे.

भारताच्या विकासावर विश्वास : या सर्वेक्षणात १२ भारतीय शहरांतील लोकांचा समावेश करण्यात आला. १2 भारतीय शहरांमध्ये (मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, पुणे, हैदराबाद, बेंगळुरू, अहमदाबाद, इंदूर, पाटणा, जयपूर आणि लखनऊ) २१ ते ५५ वर्षे वयोगटातील लोकांमध्ये सर्वेक्षण, डिसेंबर 2022 ते 15 जानेवारी 2023 या काळात करण्यात आले. 'भारतीय 2023 मधील देशाच्या स्थूल आर्थिक कामगिरीबद्दल व्यापकपणे सकारात्मक आहेत. त्यांचा भारताच्या विकासावर विश्वास आहे.', असे मत कांतर कंपणीचे (दक्षिण आशिया-इनसाइट विभाग) कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक दीपेंद्र राणा यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा : UNION BUDGET 2023 : जाणून घ्या बजेटशी संबंधित काही रंजक गोष्टी

Last Updated : Jan 25, 2023, 7:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.