ETV Bharat / bharat

Narges Mohammadi Hunger Strike : नोबेल पारितोषिक विजेत्या नर्गिस मोहम्मदी यांनी तुरुंगात सुरू केलं उपोषण, जाणून घ्या काय आहे कारण

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2023, 3:17 PM IST

Updated : Nov 7, 2023, 3:26 PM IST

Narges Mohammadi Hunger Strike : काही दिवसांपूर्वी, इराणी कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांच्या कुटुंबीयांनी त्या फुफ्फुसाच्या रोगानं त्रस्त असल्याचं सांगितलं. मात्र, असं असूनही इराण तुरुंगातील अधिकाऱ्यांनी मोहम्मदींना हिजाब न घातल्यामुळं रुग्णालयात नेण्यास नकार दिला. त्यांनी उपोषण सुरू केलंय.

Narges Mohammadi
नोबेल पारितोषिक विजेत्या नर्गिस मोहम्मदी

दुबई Narges Mohammadi Hunger Strike : गेल्या महिन्यात शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी निवड झालेल्या नर्गिस मोहम्मदी यांनी इराणच्या तुरुंगात उपोषण सुरू केलं आहे. मोहम्मदींच्या सुटकेसाठी आंदोलन करत असलेल्या आंदोलकांनी सांगितलं की, इराणच्या कुख्यात इव्हियन तुरुंगात कैद असलेल्या मोहम्मदींनी तुरुंगवासाच्या अटींविरोधात आणि महिलांना हिजाब घालणे अनिवार्य केल्या विरोधात उपोषण सुरू केलंय.

औषधं घेणं देखील केलं बंद : नर्गिस मोहम्मदी यांच्या कुटुंबीयांनी सोमवारी एका निवेदनात म्हटलंय की, नर्गिस मोहम्मदी यांनी तुरुंगातून एका संदेशात सांगितलं होतं की तिनं काही तासांपूर्वी उपोषण सुरू केलंय. नर्गिसच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे. एक्स वरील एका पोस्टमध्ये कुटुंबीयांनी सांगितलं की, नर्गिस जेलमध्ये फक्त पाणी, साखर आणि मीठाचे सेवन करत आहे. तिने औषधं घेणं सुध्दा बंद केलंय.

हिजाब घालण्याची सक्ती : नर्गिस मोहम्मदी हिजाब घालण्याच्या सक्तीच्या नियमाला विरोध करत आहेत. इराणमध्ये 1979 च्या इस्लामिक क्रांतीपासून महिलांना सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमाला वेळोवेळी विरोध होत असल्याचं बघायला मिळतंय. इराणच्या मॉरॅलिटी पोलिसांच्या कोठडीत महसा अमिनी नावाच्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर गेल्या सप्टेंबरमध्ये देशभरात निदर्शने झाली होती. हिजाब न घातल्यामुळं मॉरॅलिटी पोलिसांनी महसाला अटक केली होती.

कोण आहेत नर्गिस मोहम्मदी : 51 वर्षीय नर्गिस या 'डिफेंडर्स ऑफ ह्युमन राइट्स सेंटर'च्या उपसंचालक असून, सध्या त्या तेहरानच्या इव्हियन तुरुंगात आहेत. त्यांना 13 वेळा तुरुंगवास आणि पाच वेळा दोषी ठरवण्यात आलं आहे. तसंच त्यांना फटके मारण्याची शिक्षाही देण्यात आली. नर्गिस यांना सुमारे 31 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, मोहम्मदी यांना 2011 मध्ये पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. तुरुंगात असलेल्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याच्या प्रयत्नांमुळे त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. मोहम्मदी यांनी 1999 मध्ये त्यांचे सहकारी कार्यकर्ते आणि लेखक तघी रहमानी यांच्याशी लग्न केलं. या दोघांना जुळी मुलं असून ती सध्या फ्रान्समध्ये राहतात. 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगल्यानंतर रहमानी इराणमध्ये स्थलांतरित झाले. तर मोहम्मदी यांनी आपलं काम चालू ठेवलं.

हेही वाचा -

  1. Nobel Prize 2023: भारताचीही आहे नोबेल पुरस्कारांवर छाप; आतापर्यंत भारतानं 10 नोबेल पारितोषिकांवर उमटवली मोहर
  2. Nobel Peace Prize 2023 : तुरुंगात शिक्षा भोगत असताना मिळाला नोबेल पुरस्कार, जाणून घ्या कोण आहेत नर्गिस मोहम्मदी
  3. Nobel Peace Prize 2023 : २०२३ चा नोबेल शांतता पुरस्कार नर्गिस मोहम्मदी यांना जाहीर
Last Updated : Nov 7, 2023, 3:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.