ETV Bharat / bharat

NIA Wanted Terrorist : NIA ला हवेत हे चार अतिरेकी, खोऱ्यात सर्वत्र लावले पोस्टर्स

author img

By

Published : Dec 10, 2022, 3:56 PM IST

NIA Wanted Terroristt
NIA Wanted Terrorist

एनआयएने (NIA) (National Investigation Agency) आपला ईमेल, फोन नंबर तसेच व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम नंबर शेअर करून त्यावर लोकांना माहिती पाठविण्यास सांगितले आहे. माहिती देणार्‍याची ओळख गुप्त ठेवली जाईल, असे आश्वासन एनआयएने दिले आहे. (NIA Wanted Terrorist)

खोऱ्यात लावले पोस्टर्स

पुलवामा : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) (National Investigation Agency) काश्मीरच्या अनेक भागात पोस्टर लावले आहेत. या पोस्टरमार्फत यंत्रणेने प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाची आघाडीची संघटना द रेझिस्टन्स फ्रंट (The Resistance Front) (TRF) च्या चार अतिरेक्यांची माहिती मागितली आहे. या चार अतिरेक्यांवर जम्मू आणि काश्मीरमधील तरुणांना कट्टरपंथी बनवण्याच्या व भारतात हिंसाचार घडवून आणण्याच्या कट रचण्याचा संशय आहे. एनआयएला या संदर्भात माहिती हवी आहे. तपास यंत्रणेने या आधीच या चारही अतिरेक्यांवर प्रत्येकी १० लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

माहिती देणार्‍याची ओळख गुप्त राहील : पोस्टर्समार्फत एनआयएने पाकिस्तानी नागरिक सलीम रहमानी उर्फ 'अबू साद', कसूरमधील शांगमंगा येथील सैफुल्ला साजिद जट, श्रीनगरमधील सज्जाद गुल आणि दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील बासित अहमद दार या चौघांची माहिती मागवली आहे. एनआयएने आपला ईमेल, फोन नंबर तसेच व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम नंबर शेअर करून त्यावर लोकांना माहिती पाठविण्यास सांगितले आहे. माहिती देणार्‍याची ओळख गुप्त ठेवली जाईल, असे आश्वासन एनआयएने दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.