ETV Bharat / bharat

एलपीजी सिलिंडर ते वाहन खरेदी करताना खिशावर काय होणार परिणाम? नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी 'हे' होणार बदल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 1, 2024, 10:48 AM IST

New Year 2024 : नवीन वर्षाची सुरुवात आज झाली आहे. नवीन वर्षात गॅस सिलिंडर ते वाहन खरेदी अशा विविध खरेदी करताना तुमच्या आर्थिक निर्णयावर परिणाम होणार आहे. काही नियम बदलल्यानं तुमच्या समस्या वाढू शकतात.

economic changes from today in new year
आजपासून अनेक बदल

हैदराबाद : नवीन वर्ष 2024 ची सुरुवात एलपीजी सिलेंडरचे दर कमी केले आहेत. तेल विपणन कंपन्यांनी आज LPG सिलिंडरचे नवे दर जाहीर केले आहेत. आज 1 जानेवारी 2024 पासून LPG सिलेंडर स्वस्त झाला आहे. आज व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत थोडा बदल झाला आहे, तर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

एलपीजी सिलेंडरची किंमत : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच आजपासून राजस्थानमध्ये एलपीजी सिलिंडर ४५० रुपयांना मिळणार आहे. मात्र, त्याचा लाभ केवळ उज्ज्वला लाभार्थ्यांनाच मिळणार आहे. भाजपानं निवडणूक जाहीरनाम्यात गॅस सिलिंडर स्वस्त देणार असल्याचं जाहीर केलं होतं. याशिवाय, नवीन वर्षात सरकारी तेल कंपन्या केवळ घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीबाबत निर्णय घेऊ शकतात.

व्याजदरात वाढ : सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी (जानेवारी-मार्च) सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदरात 0.20 टक्के आणि तीन वर्षांच्या मुदत ठेव योजनेवरील व्याजदरात 0.10 टक्के वाढ केली आहे. इतर सर्व छोट्या योजनांचे दर समान राहतील. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत ठेवींवरील व्याजदर सध्याच्या आठ टक्क्यांवरून 8.2 टक्के करण्यात आला आहे. तीन वर्षांच्या मुदत ठेवींवरील दर सध्याच्या सात टक्क्यांवरून 7.1 टक्के करण्यात आला आहे.

  • महागाई भत्त्याबाबत निर्णय : मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी १ जानेवारीपासून होणार आहे. या भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. भत्ता 4 टक्क्यांनी वाढल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता 50 टक्क्यांनी वाढेल. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता ५० टक्के किंवा त्याहून अधिक होताच एचआरएमध्ये सुधारणा केली जाईल.
  • आयआटीआरला उशीर झाल्यास काय होईल? आर्थिक वर्ष 2022-23 साठी दंडासह आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. या वेळेच्या मर्यादेत चूक झाल्यास, आयकर कायद्याच्या कलम 234F अंतर्गत करदात्यावर कारवाई केली जाऊ शकते. या अंतर्गत एखाद्याला तुरुंगात पाठवण्याचीही तरतूद आहे.
  • बँक लॉकर करारामध्ये सुधारणा : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार सुधारित बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2023 आहे. ही मुदत चुकली तर नवीन वर्षात लॉकरवर निर्बंध लागू होईल. ज्या ग्राहकांनी 31 डिसेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी बँक लॉकर करारनामा सादर केला आहे, त्यांनी सुधारित करारावर स्वाक्षरी करून बँक शाखेत जमा करणे आवश्यक आहे.
  • सिम कार्ड खरेदी करण्याचे नियम : नवीन वर्षात नवीन सिमकार्ड घेण्याचे नियम बदलत आहेत. कागदावर आधारित नो युवर कस्टमर (केवायसी) ऐवजी आता पेपरलेस केवायसी प्रक्रिया अवलंबावी लागणार आहे. या प्रक्रियेसह बायोमेट्रिक्सद्वारे तपशील देणे बंधनकारक आहे.
  • निष्क्रिय UPI आयडी : नवीन वर्षात निष्क्रिय UPI आयडी बंद होतील. त्याबाबत सरकारने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने पेमेंट अॅप्स (गुगल पे, पेटीएम, फोन पे) या कंपन्यांना तसे निर्देश दिले आहेत. यानुसार, जर यूपीआय आयडी एक वर्षापेक्षा जास्त काळ वापरला नाही तर तो निष्क्रिय केला जाईल.
  • वाहने महाग होतील : महागाईचा ताण आणि वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे अनेक मोठ्या कंपन्यांनी कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये मारुती सुझुकी, ह्युंदाई, मर्सिडीज आणि ऑडी या कंपन्यांच्या वाहनांचा समावेश आहे.

हेही वाचा :

  1. डार्क चॉकलेटचे अनेक आरोग्य फायदे; आहारात करा समावेश
  2. भारतात एकदा नव्हे, तर पाच वेळा साजरे केले जाते नवीन वर्ष, जाणून घ्या केव्हा आणि का साजरे केले जाते
  3. कशी सुरू झाली नवीन वर्ष साजरं करण्याची प्रथा? जाणून घ्या सर्वकाही
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.