ETV Bharat / bharat

Supriya Sule Attack on PM : मी पंतप्रधान मोदींवर नाराज नाही, मात्र हैराण -सुप्रिया सुळे

author img

By

Published : Feb 8, 2022, 11:37 AM IST

Updated : Feb 8, 2022, 2:59 PM IST

मी पंतप्रधान मोदींवर नाराज नाही, मी हैराण आहे अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी ( MP supriya sule attack on PM Narendra Modi ) पंतप्रधानावर केली आहे. सोमवारी संसदेत बोलताना पंतप्रधान यांनी कॉंग्रेसवर टीका केली यावेळी त्यांनी महाराष्ट्राने कोरोना देशभरात पसरवला, याविधानावर त्यांनी आज पंतप्रधानांवर टीका केली आहे.

Supriya Sule Attack on PM
सुप्रिया सुळे

नवी दिल्ली - मी पंतप्रधान मोदींवर नाराज नाही, मी हैराण आहे अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी ( MP supriya sule attack on PM Narendra Modi ) पंतप्रधानावर केली आहे. सोमवारी संसदेत बोलताना पंतप्रधान यांनी कॉंग्रेसवर टीका केली यावेळी त्यांनी महाराष्ट्राने कोरोना देशभरात पसरवला, याविधानावर त्यांनी आज पंतप्रधानांवर टीका केली आहे.

खा. सुप्रिया सुळे पत्रकार परिषदेत माहिती देताना

'महाराष्ट्राला कोविड सुपर स्प्रेडर म्हणणे हे अंत्यत वेदनादायी'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रपती यांच्या अभिभाषणवर बोलताना कॉंग्रेसवर मोठ्या प्रमाणात टीका केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रावर जे पंतप्रधान बोलले ते ऐकुन मला स्वतः वैयक्तिक खूप दुःख झाले. त्यांनी महाराष्ट्राला कोविड सुपर स्प्रेडर असे सांगितले, हे अंत्यत वेदनादायी आहे. 'सारे जहा से अच्छा हिंदुस्था हमारा' म्हणत आपण सगळे एक आहेत तेव्हा पंतप्रधान महाराष्ट्राबद्दल मुंबईबद्दल असे कसे बोलू शकतात, तसेच हे सगळे राष्ट्रवाद निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांना कोणत्याही प्रकारचा वैज्ञानिक आधार नाही तर रेल्वे मंत्रालयानेच श्रमिक रेल्वे चालवल्या होत्या असेही त्या यावेळी म्हणाल्या.

संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे झालेले भाषण

पंतप्रधान म्हणाले होते?
कोरोना वैश्विक महामारी आहे, आज भारत सुमारे 100 टक्के नागरिकांना पहिला डोस तर 80 टक्के नागरिकांना दुसरा डोस देण्याचे काम पुर्ण करत आहोत पण त्यातही राजकारण केले गेले. कोरोना काळात काॅंगेसने तर हद्द केली, मुंबईतील गर्दी कमी व्हावी यासाठी त्यांना आपआपल्या राज्यात पाठवले आणि बिहार-उत्तर प्रदेशसह देशभरात कोरोना पसरवला. सगळीकडे आफरातफरी पसरवली. दिल्ली सरकारने तर गल्ली बोळात भोंगे फिरवुन लोकांना वापस पाठवले आणि कोरोना पसरवला. कोरोना मोदीच्या प्रतिमेला धक्का बसवेल यासाठी वाट पाहत होते, अशी टीका पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर टीका केली होती.

हेही वाचा - Narendra Modi In Rajya Sabha : कोरोना काळातील भारताच्या प्रयत्नाचे जगभरात कौतुक - पंतप्रधान

Last Updated : Feb 8, 2022, 2:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.