ETV Bharat / bharat

Vande Bharat : वंदे भारत ट्रेनमध्ये मूत्र विसर्जनासाठी जाणे आले अंगलट; प्रवाशाला बसला 6 हजाराचा भुर्दंड

author img

By

Published : Jul 21, 2023, 3:01 PM IST

वंदे भारत ट्रेनमध्ये मूत्र विसर्जन करणे एका प्रवाशाला चांगलेच महागात पडले आहे. हा प्रवाशी मूत्र विसर्जन करण्यास ट्रेनमध्ये गेल्यानंतर ट्रेनचे दरवाजे बंद झाले. त्यामुळे या प्रवाशाला उज्जैनला जावे लागले. त्यानंतर पुन्हा परत येण्यासाठी तिकीट काढून भोपाळला परतल्यानंतर त्याची रेल्वेही निघून गेली.

Vande Bharat
संग्रहित छायाचित्र

भोपाळ : वंदे भारत ट्रेनमध्ये मूत्र विसर्जन करण्यासाठी चढलेल्या एका प्रवाशाला ट्रेनमध्ये मूत्र विसर्जन करण्याचा तब्बल 6 हजार रुपये भुर्दंड मोजावा लागला आहे. ही घटना भोपाळच्या रेल्वेस्थानकात घडली आहे. अब्दुल कादिर असे वंदे भारत ट्रेनमध्ये मूत्र विसर्जन केल्यामुळे भुर्दंड बसलेल्या प्रवाशाचे नाव आहे. वंदे भारत ट्रेनमध्ये मूत्र विसर्जन केल्याने प्रवाशाला 6 हजार रुपयाचा चुना लागल्यामुळे या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

काय आहे प्रकरण : अब्दुल कादिर हे सिंगरौलीच्या बैधन येथे राहतात. ते कुटुंबीयांसोबत भोपाळला आले होते. मात्र ते मूत्र विसर्जन करण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चढले. 15 जुलै रोजी ते कुटुंबासह भोपाळला आले होते. सिंगरौलीला परत जाण्यासाठी भोपाळ रेल्वे स्थानकावर दक्षिण एक्सप्रेसची वाट पाहत होते. इंदूरला जाण्यासाठी वंदे भारत ट्रेनही फलाटावर उभी होती. यादरम्यान अब्दुल कादिर हे मूत्र विसर्जन करण्यास स्टेशनवरील बाथरूममध्ये न जाता वंदे भारत ट्रेनमध्ये गेले. अब्दुल कादिर बाथरुममध्ये जाताच ट्रेनचे गेट बंद झाले. ट्रेनचे गेट आपोआप बंद होतात, हे त्यांना माहीत नव्हते. गेट न उघडल्याने अब्दुल कादिर प्रचंड घाबरले. त्यामुळे त्यांनी टीटी आणि पोलिसांकडे मदत मागितली. मात्र पोलिसांनी आणि टीटींनी त्यांना मदत करण्याऐवजी 1 हजार 20 रुपयांचा दंड ठोठावला. ट्रेन उज्जैनला जात असल्याने त्यांना उज्जैनचे 1020 रुपयांचे तिकीट काढावे लागले.

पुन्हा भोपाळला येण्यासाठी काढावे लागले तिकीट : अब्दुल कादिरने उज्जैनला पोहोचण्यासाठी आणि पुन्हा भोपाळला येण्यासाठी पदरचे पैसे खर्च केले. त्याचवेळी घरी परतण्यासाठी असलेल्या दक्षिण एक्स्प्रेसने त्यांच्या कुटुंबीयांना घरी पोहोचता आले नाही, त्यामुळे या ट्रेनच्या तिकिटाचेही 4 हजार रुपयांचे नुकसान अब्दुल कादिर यांना सहन करावे लागले. मूत्र विसर्जन करण्यासाठी वंदे भारत ट्रेनमध्ये चढलेल्या अब्दुल कादिरला एकूण 6 हजार रुपयांचा भुर्दंड बसल्याने त्यांना चांगलाच त्रास सहन करावा लागला.

सेल्फी काढताना झाले ट्रेनचे दरवाजे बंद : दुसऱ्या एका घटनेत भोपाळमधील एका महिलेला वंदे भारत ट्रेनमध्ये सेल्फी घेणे चांगलेच महागात पडले होते. सेल्फी घेण्यासाठी ही महिला आपल्या मुलासोबत ट्रेनमध्ये चढून सेल्फी काढू लागली. यादरम्यान ट्रेन सुरू झाल्याने दरवाजे बंद झाले. तरीही ती महिला वेगवेगळ्या पोझमध्ये सेल्फी घेत राहिली. त्यामुळे या महिलेला सेल्फीसाठी तब्बल 5 हजार 470 रुपये खर्च करावे लागले. ही महिलाही सेल्फीच्या नादात थेट झाशी रेल्वे स्टेशनवर पोहोचली होती.

हेही वाचा -

  1. Vande Bharat Fare : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! वंदे भारतसह इतर गाड्यांच्या भाड्यात होणार भरघोस कपात
  2. Vande Bharat Express Fire : भोपाळहून निजामुद्दीनला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनला भीषण आग, जीवितहानी नाही
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.