ETV Bharat / bharat

VIDEO: गोव्यात मंगळवारी आमदारांनी घेतली शपथ, इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' प्रकार.. वाचा

author img

By

Published : Mar 16, 2022, 8:28 AM IST

गोवा विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या आमदारांनी मंगळवारी विधानसभेत शपथ ( MLAs sworn in Goa ) घेतली. हंगामी सभापती गणेश गावकर यांनी सर्व उपस्थित आमदारांना आमदारकीची शपथ दिली.

Acting Speaker Ganesh Gavkar
आमदार शपथ गोवा विधानसभा

पणजी (गोवा) - गोवा विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या आमदारांनी मंगळवारी विधानसभेत शपथ ( MLAs sworn in Goa ) घेतली. हंगामी सभापती गणेश गावकर यांनी सर्व उपस्थित आमदारांना आमदारकीची शपथ दिली.

शपथविधीची दृश्ये

हेही वाचा - MP Arvind Sawant in Parliament : खासदार अरविंद सावंत यांनी संसदेत या केल्या मागण्या

गोवा विधानसभेचा कार्यकाळ बुधवारी 16 मे ला संपुष्टात येत आहे. त्यामुळे, हा कार्यकाळ संपण्यागोदार सर्व आमदारांना मंगळवारी शपथ देण्यात आली आहे. त्यामुळे, गोवा विधानसभेच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री शपथ घेण्याअगोदर आमदारांनी शपथ घेतली आहे.

इतिहासात पहिल्यांदाच आमदारांना शपथ

गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे, मात्र विधिमंडळ नेता निवडीवरून भाजपात अंतर्गत धुसफूस सुरू आहे. अद्याप मुख्यमंत्री कोण होणार याच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला नाही. त्यातच गोवा विधानसभेचा कार्यकाळ बुधवारी 16 मार्च ला संपुष्टात येत आहे. त्यामुळे, हा कार्यकाळ संपण्यागोदार सर्व आमदारांना मंगळवारी शपथ देण्यात आली आहे. त्यामुळे, गोवा विधानसभेच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री शपथ घेण्याअगोदर आमदारांनी शपथ घेतली आहे.

काँग्रेसचे स्वप्न भंगले

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपणच सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला होता. मात्र, बहुमताचा आकडा प्राप्त न झाल्यामुळे काँग्रेसचे सत्ता स्थापनेचे स्वप्न अपुरे राहिल्याची खंत काँग्रेस आमदारांनी शपथ विधिवेळी व्यक्त केली.

मगो चे स्वप्नही अधुरेच राहणार

सध्या भारतीय जनता पक्षाकडे अपक्षाच्या मदतीने पूर्ण बहुमत आहे. त्यातच महाराष्ट्र गोमंतक पक्षाने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे, तुर्तास तरी मगोला सत्तेत सहभागी करून घेण्यास भाजपच्या 80 टक्के आमदारांनी विरोध दर्शविला आहे.

सर्वात तरुण आमदार

गोवा विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व आमदारांना मंगळवारी आमदारकीची शपथ देण्यात आली. मात्र, या सर्व आमदारांत चर्चा आहे ती सर्वात तरुण आमदार विरेश बोरकर यांची.

विरेशची बुलेटवरून एन्ट्री

विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत सेंट आंद्रे चे आमदार विरेश बोरकर सर्वात तरुण आमदार आहेत. २९ वर्षीय विरेश बोरकर यांनी सेंट आंद्रे मतदारसंघात पहिल्यांदा निवडणूक लढवून विजय मिळवला. त्यांनी सेंट आंद्रे चे माजी आमदार फ्रान्सिस सिल्व्हरा यांचा अवघ्या 76 मतांनी पराभव करून विधानसभेत प्रवेश केला. बोरकर यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असून, ते आरजी पक्षाचे पदाधिकारी म्हणून राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.

हेही वाचा - Sonia In Action Mode : सोनिया गांधी कडाडल्या, मागितला उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूरच्या काॅंग्रेस प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.