ETV Bharat / bharat

MLA Son Suicide -'माझा मित्र गेला, मी त्याच्याकडे जात आहे';आमदाराच्या मुलाची आत्महत्या

author img

By

Published : Nov 12, 2021, 10:28 AM IST

विभोर संजय यादव (मृत)
विभोर संजय यादव (मृत)

काँग्रेसचे आमदार संजय यादव यांच्या मुलाने स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विभोर संजय यादव असे त्याचे नाव आहे. विभोरने (My Friend went, I am Going ) माझा मित्र गेला, मी त्याच्याकडे जात आहे असे त्याने आत्महत्येपुर्वी लिहलेल्या चिठ्ठीमध्ये लिहले आहे.

मध्य प्रदेश (जबलपुर) - काँग्रेसचे आमदार संजय यादव यांच्या मुलाने स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विभोर संजय यादव असे त्याचे नाव आहे. विभोरने (My Friend went, I am Going ) माझा मित्र गेला, मी त्याच्याकडे जात आहे असे त्याने आत्महत्येपुर्वी लिहलेल्या चिठ्ठीमध्ये लिहले आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, विभोरने आपल्या आत्महत्येला कोणालाही दोषी ठरवले नाही.

माहिती देताना पोलीस

MLA Son Suicide Case - माझा मित्र गेला, मी त्याच्याकडे जात आहे

काँग्रेसचे आमदार संजय यादव यांच्या मुलाने आत्महत्या केली आहे. दरम्यान, विभोरने लिहले आहे की, माझे आई-वडिल खूप चांगले आहेत. तसेच, त्याने आपला मित्र गेला, मीही चाललो आहे असा एक एसएमएस पाच लोकांना पाठवला होता. त्यामध्ये तो म्हणतो, तुम्ही खूप चांगले आहात. पण मी आता चाललो आहे. विभोरचा एकही मित्र राहिला नाही, त्यामधून आलेल्या नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलले असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

MLA Son Suicide Case - कामासंबंधी बैठक सुरू होती

आमदार संजय यादव यांची महाराजपुर येथे कामासंबंधी बैठक सुरू होती. या बैठकी दरम्यान, सुरक्षारक्षकाने बैठक रुममध्ये येण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला अडवण्यात आले. मात्र, त्याने घाबरलेल्या अवस्थेत त्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर आमदरा यादव हे गडबडीने बैठक सोडून तिथून आपल्या निवास्थानाकडे रवाना झाले. दरम्यान, विभोरने आत्महत्या केली तिथे कोणीही नव्हते.

आपल्या मुलाकडे पाहून पुर्णपणे हतबल झाले

विभोरची आई भोपाळला जात होती. मात्र, ही माहिती कळल्यानंत तिथूनच त्या वापर आल्या. त्यांनी ज्यावेळी मुलाचा मृतदेह पाहिला त्यावेळी त्यांना चक्कर आली. त्या जागेवर बेशुद्ध पडल्याची माहिती आहे. तसेच, आमदार यादव आपल्या मुलाकडे पाहून पुर्णपणे हतबल अवस्थेत होते. यावेळी परिसरासह राजकीय क्षेत्रातील लोकांची यादव यांच्या निवास्थानाकडे गर्दी वाढत होती.

हेही वाचा - Surgery on Uddhav Thackeray: मुख्यमंत्र्यांवरील शस्त्रक्रिया यशस्वी, एच.एल.रिलायन्स रुग्णालयात आहेत दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.