ETV Bharat / bharat

Pramod Mishra : 'हो, आम्ही बिहारमधील शाळा जाळल्या, कारण...',  माओवादी नेता प्रमोद मिश्राची कबुली

author img

By

Published : Aug 12, 2023, 3:59 PM IST

Updated : Aug 12, 2023, 6:33 PM IST

१० ऑगस्ट रोजी अटक करण्यात आलेला माओवादी नेता प्रमोद मिश्रा याने बिहारमधील शाळांना लक्ष्य करून विध्वंस घडवून आणल्याचे मान्य केले आहे. यासोबतच त्याने सरकारवर टीका करताना भाजपाला 'फॅसिस्ट शक्ती' म्हटले आहे.

Pramod Mishra
प्रमोद मिश्रा

गया (बिहार) : प्रमोद मिश्रा या माओवादी नेत्याला दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्याच्या डोक्यावर तब्बल एक कोटींचे बक्षीस होते. आता त्याने त्याची संघटना बिहारमधील शाळांना जाळण्यासाठी जबाबदार असल्याचे मान्य केले आहे. 'शाळा जाळण्यात आल्या, कारण त्यांचा वापर केंद्रीय दल आणि पोलिस कर्मचार्‍यांसाठी आश्रयस्थान म्हणून केला जात होता', असे वक्तव्य त्याने केले आहे. बिहार न्यायालयात हजर करण्याआधी तो पत्रकारांशी बोलत होता.

भाजपला म्हटले फॅसिस्ट शक्ती : यासोबतच प्रमोद मिश्राने भाजप आणि केंद्राला 'फॅसिस्ट शक्ती' म्हटले आहे. 'भारतीय जनता पार्टीचे नेते मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांशी हातमिळवणी करत लोकांचे शोषण करण्याचा प्रयत्न करत आहेत. खऱ्या मुक्तीचा मार्ग मार्क्‍सवाद, नवीन लोकशाही, समाजवाद आणि साम्यवाद यांच्या तत्त्वांमध्ये दडलेला आहे', असे तो म्हणाला.

विरोधकांवर टीका : 'देशाच्या ज्वलंत प्रश्नांवर विरोधक गप्प आहेत. मणिपूरचा विचार करा. तिथे काय चाललंय? मात्र विरोधकांची भूमिका समाधानकारक नाही. असे करून ते एक प्रकारे भाजप सरकारला पाठिंबा देत आहेत', अशी टीका त्याने विरोधकांवर केली. प्रमोद मिश्रा हा माओवादी चळवळीचा ईस्टर्न झोनल कमांडर आहे. त्याच्यावर बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे.

१० ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती : बिहारमधील गया येथे एकाच कुटुंबातील चार जणांना फाशी देण्याप्रकरणी आरोपी असणारा माओवादी प्रमोद मिश्रा याला १० ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्यावर छपरा, औरंगाबाद, गया आणि धनबाद येथे नक्षलवादी कारवाईत सहभाग असल्याप्रकरणी एकूण २२ गुन्हे दाखल आहेत. या व्यतिरिक्त त्याच्यावर झारखंड, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशातही गुन्हे दाखल आहेत. याआधी त्याला २००८ मध्ये अटक करण्यात आली होती. मात्र २०१७ मध्ये त्याला पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले होते.

हेही वाचा :

  1. Intelligence Report On Moist : नक्षलवाद्यांनी विचारधारा टिकवण्यासाठी घेतली विविध संघटनांची मदत, गुप्तचर विभागाच्या अहवालात खुलासा
  2. Devendra Fadnavis on Urban Naxal : विद्यापीठात शहरी नक्षलवाद्यांचा घुसण्याचा प्रयत्न, राष्ट्रप्रेमी नागरिकांनी त्याविरुद्धात लढले पाहिजे - देवेंद्र फडणवीस
  3. Naxalites Surrendered : सुकमामध्ये सुरक्षा दलाला मोठे यश, 32 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
Last Updated :Aug 12, 2023, 6:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.